चाचा नेहरूंचे स्मरण अन्‌ लहानग्यांच्या समस्या!

चाचा नेहरूंचे स्मरण अन्‌ लहानग्यांच्या समस्या!

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती संपूर्ण देशभर राष्ट्रीय बालदिन म्हणून साजरी केली जाते. नेहरूंना लहान मुले खूप आवडायची. आधुनिक भारताचे शिल्पकार या दृष्टीने ते लहान मुलांकडे पाहत. आज लहान मुलांचे आवडते चाचा नेहरू यांचे स्मरण करताना मात्र या लहानग्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करणे योग्य ठरणार नाही. मुलांवरील संस्कार, त्यांची जडणघडण, शिक्षणातील त्रुटी तसेच व्यवस्थेतील दोष यासोबतच अनेक समस्या नव्याने समोर येत आहेत. लहान मुलांकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टीकोन त्यांच्या जडणघडणीवर परिणाम करतोच. पण, नवीन समस्याही निर्माण करतो. "तू लहान आहेस. तुला काय कळतय त्यातलं?' असं दरडावून तात्पुरती वेळ मारून नेण्यात भविष्यातील धोका टाळू शकत नाही हे प्रत्येकाने आपल्या मनावर बिंबवलं पाहिजे. लहान मुलांच्या मतांचा, छोट्या-छोट्या प्रश्‍नांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या शंकेचं समाधान योग्य पद्धतीने केले पाहिजे.

"लहानांनी मोठ्यांचा आदर केला पाहिजे.' या पारंपारिक विचाराचा गैरफायदा मुलाच्या परिचितांपैकीच अनेकजण घेतात असं चित्र सार्वत्रिक झालं आहे. असा गैरफायदा घेवून मुलांचं लैंगीक शोषण करणाऱ्यांमध्ये मुलाच्या जवळचे नातेवाईक, शेजारी, घरातले नोकर, शाळेतले, कोचिंक क्‍लासचे शिक्षक, शिपाई, स्कूल बसचे ड्रायव्हर-कंटक्‍टर, वॉचमन यापैकी मुलांशी नियमित संपर्कात असणारं कुणीही असू शकतं. यासाठी मुलांना चांगला, वाईट स्पर्श ओळखायला शिकवावं, हातात हात देणं किंवा आईने मिठी मारणं हे चांगले आदर्श आहेत. पण मुलांच्या खासगी अवयवांना केलेला स्पर्श हा वाईट स्पर्श असतो. मुलांना असे स्पर्श कळण्यासाठी त्यांना खासगी अवयवांबद्दल ओळख असणे आवश्‍यक आहे. आई-बाबा स्वच्छतेसाठी त्याला हात लावू शकतात. डॉक्‍टरही आई-बाबा असताना त्याला हात लावू शकतात; मात्र इतर कुणी त्याला हात लावला, तर तो वाईट स्पर्श आहे.

मुलांना कपडे काढायला सांगणं वा मुलांसमोर एकटे असताना कपडे काढणं चुकीचं आहे. कुणी कपडे न घातलेले फोटो, व्हिडीओ दाखवत असेल तर तेही चुकीचं आहे. मुलांचे कपडे काढून फोटो, व्हिडिओ दाखवत असेल तर तेही चुकीचं आहे. त्यस विरोध करावा, हे मुलांना समजावणे आवश्‍यक आहे.

काह चुकीचं घडलं तर मुलाने आपल्या आईला, विश्‍वासू व्यक्तिला सांगावं किंवा 1098 या मोफत चाईल्ड हेल्पलाईनवर फोन करावा. 1098 या नंबरवर देशभरातून कुठूनही फोन करून संरक्षण घेता येते. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी ही सेवा 24 तास कार्यरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com