Breast Cancer Awareness Month: जाणून घ्या Breast Cancer ची लक्षणं: 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

भारतात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण अधिक आहेत. स्तन हा महिलांच्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. ब्रेस्ट टिश्यूच्या माध्यमातून दूध तयार होतं. हे टिश्यू डक्टच्या मार्फत निप्पलशी जोडले गेलेले असतात.

1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ राबवण्यात येणार आहे. या संपूर्ण महिन्यात लोकांना स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूक करण्यात येणार आहे. तसेच या कर्करोगाची लक्षणं आणि त्यावरील उपाय यांच्याबद्दल योग्य ज्ञान दिलं जाणार आहे. 

भारतात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण अधिक आहेत. स्तन हा महिलांच्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. ब्रेस्ट टिश्यूच्या माध्यमातून दूध तयार होतं. हे टिश्यू डक्टच्या मार्फत निप्पलशी जोडले गेलेले असतात. स्तनाचा कर्करोग हा जास्तीत जास्त छोट्या कॅल्शिफिकेशनच्या जमण्याने किंवा स्तनाच्या टिश्यूत गाठ झाल्याने होतो. यानंतर या गाठी वाढून कर्करोगाचं रूप घेतात.  

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं: 
- स्तनाच्या कर्करोगाचे मुख्य लक्षण म्हणजे स्तनात गाठी तयार होतात. याशिवाय काही महिलांमध्ये आजूबाजूचे काही टिश्यू एकत्र होतात आणि त्यांचा आकार वाढतो. हा आकार स्पर्श केल्यावरही जाणवू लागतो.

-या रुग्णांच्या स्तनाच्या आकारातही बदल होतो. सुरुवातीला आकारात झालेला बदल जाणवत नसला तरी नंतर तो स्पष्ट रुपाने जाणवू लागतो.

- स्तनाजवळच्या त्वचेतही बदल झालेले दिसून येतात. स्तनावर खड्डे (डिंपल) झाल्यासारखं झालेलं दिसून येतं. स्तनाजवळची त्वचा लाल आणि नारंगी रंगाची होऊ लागते.

- स्तनाचा कर्करोग झालेल्या काही महिलांच्या निपलचा आकार बदलतो आणि ते उलट्या दिशेला वाढू लागतात.

- निप्पल किंवा हाडाच्या आसपासच्या त्वचेजवळ पापुद्रे यावेत तशी त्वचा होते.

(Disclaimer: ही माहिती वाचकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे. उपचार किंवा अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people aware of breast cancer symptoms