अशी बोलते माझी कविता (प्रा. पेश देशमुख)

प्रा. पेश देशमुख, रोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) (८३०८०८०९९९)
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

उन्हे पेरतो कोण...?

घडे हेच दररोज पश्‍चात माझ्या
उन्हे पेरतो कोण रस्त्यात माझ्या?

उगाळू नको तीच ती रडकथा तू
अता राहिले काय हातात माझ्या?

कसा तोंड देऊ कळेना मलाही
उगवती किती प्रश्‍न देहात माझ्या!

कुठे भेटलो मी तुला, आठवेना -
तशी नोंद नाही हिशेबात माझ्या!

किती रोज अंधार आतूर होतो...
असे काय आहे उजेडात माझ्या?

तुझी उत्तरे हाय खाऊन मेली...
नको तेच असणार प्रश्‍नात माझ्या!

उन्हे पेरतो कोण...?

घडे हेच दररोज पश्‍चात माझ्या
उन्हे पेरतो कोण रस्त्यात माझ्या?

उगाळू नको तीच ती रडकथा तू
अता राहिले काय हातात माझ्या?

कसा तोंड देऊ कळेना मलाही
उगवती किती प्रश्‍न देहात माझ्या!

कुठे भेटलो मी तुला, आठवेना -
तशी नोंद नाही हिशेबात माझ्या!

किती रोज अंधार आतूर होतो...
असे काय आहे उजेडात माझ्या?

तुझी उत्तरे हाय खाऊन मेली...
नको तेच असणार प्रश्‍नात माझ्या!

Web Title: pesh deshmukh's poem in saptarang

टॅग्स