अशी बोलते माझी कविता (प्रभा सोनवणे)

प्रभा सोनवणे, पुणे sonawane.prabha@gmail.com, ९२७०७२९५०३
रविवार, 8 जानेवारी 2017

उत्तरायण

माहीत नाही यापुढचं
आयुष्य कसं असेल?
वय उतरणीला लागल्यावर
आठवतात
तारुण्यातले अवघड घाट
वळण-वळसे...
स्वप्नवत्‌ फुलपंखी
अभिमंत्रित वाटा...

ठरवून थोडीच लिहिता येते
आयुष्याची कादंबरी?
काय चूक आणि काय बरोबर
हेही कळेनासं होतं
काळाच्या निबिड अरण्यातले सर्प
भिववतात मनाला
कुठल्या पाप-पुण्याचा
हिशेब मागेल काळ?

उत्तरायण

माहीत नाही यापुढचं
आयुष्य कसं असेल?
वय उतरणीला लागल्यावर
आठवतात
तारुण्यातले अवघड घाट
वळण-वळसे...
स्वप्नवत्‌ फुलपंखी
अभिमंत्रित वाटा...

ठरवून थोडीच लिहिता येते
आयुष्याची कादंबरी?
काय चूक आणि काय बरोबर
हेही कळेनासं होतं
काळाच्या निबिड अरण्यातले सर्प
भिववतात मनाला
कुठल्या पाप-पुण्याचा
हिशेब मागेल काळ?

मनात फुलू पाहताहेत
आजही कमळकळ्या
त्या उमलू द्यायच्या की
करायचं पुन्हा परत
भ्रूणहत्येचं पाप?
की निरीच्छ होऊन
उतरायचं नर्मदामैयेत
मगरमत्स्यांचं भक्ष्य होण्यासाठी ?

Web Title: prabha sonawane's poem in saptarang