थंडीत सर्दी, फ्लू टाळण्यासाठी...

Sickness
Sickness

आरोग्यमंत्र - डॉ. दीपक जगदाळे, वैद्यकीय तज्ज्ञ 
हिवाळ्याची सुरुवात म्हणजे सर्दी, असे समीकरण रूढ झाले आहे. वातावरणात झालेल्या बदलांमुळे सर्दी होते, असे आपण बोलीभाषेत म्हणतो. पण, शास्त्री विचार करता, बदलत असलेल्या वातावरणाला आपले शरीर जुळवून घेत असते. ऑक्‍टोबर हीटनंतर नोव्हेंबरमध्ये हवेत गारठा जाणवू लागतो. डिसेंबरमध्ये तर थंडीचा कडाका वाढलेला असतो. त्यामुळे सर्वसाधारणातः नोव्हेंबरचा शेवट आणि डिसेंबरची सुरुवात यादरम्यान आपल्या आजू-बाजूच्या लोकांना सर्दी, खोकल्याचे झाल्याचे दिसते. 

सर्दी आणि फ्लू - आपल्याकडे गेल्या दहा वर्षांपासून फ्लू म्हणजे स्वाइन फ्ल्यू असा समज होऊ लागला आहे. पण, फ्लूचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी स्वाइन फ्ल्यू हा एक आहे. तो एच1एन1 या विषाणूंमुळे होते. फ्लूच्या तापामुळे रुग्ण अशक्त होतो. त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे मधुमेह, क्षयरोग, गर्भवती, हृदयविकार अशा जोखमीच्या रुग्णांना मोठा धोका असतो. फ्लूपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे फ्लू प्रतिबंधक लस टोचून घेणे किंवा एच1एन1 विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी नाकाद्वारे लस घेणे. फ्लूच्या लसीमुळे उत्तम सुरक्षा मिळते आणि त्याचा परिणाम वर्षभर टिकतो. 

घसा बसणे - घसा बसणे ही हिवाळ्यातील एक सर्वसाधारण समस्या दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे जंतुसंसर्ग. उबदार खोलीतून बाहेरच्या थंड वातावरणात आपण जातो. यामुळे तापमानात पटकन बदल होतो. त्याचा परिणाम थेट आपल्या शरिरावर होत असतो. त्यातच थंड पाणी पिणे, थंड पदार्थ खाण्यातून किंवा थंड पेये पिण्यातूनही घसा बसतो. यावर घरगुती औषध उपुयक्त ठरते. त्यात पुदिन्याचा चहा, मध आणि गरम पाणी असे अगदी साधे घरगुती उपाय परिणामकारक ठरतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com