"दहा मिनिटांची शांतता मोलाची' (प्रिया बापट)

priya bapat
priya bapat

"वेलनेस' म्हणजे शरीरापासून मनापर्यंत सगळ्या गोष्टींच्या आरोग्याचं संतुलन. हे सदर त्यासाठीच. या सदरात विविध सेलिब्रिटी शरीर फिट कसं ठेवायचं, मानसिक आरोग्य कसं राखायचं, आहाराबाबत काय दक्षता घ्यायची, दिनचर्या कशी ठेवायची आदींबाबत कानमंत्र देतील आणि स्वतःच्या "वेलनेस'चं रहस्यही उलगडून दाखवतील.

तुमचं मन आणि शरीर यांचं एकमेकांशी कनेक्‍शन असतं. त्यामुळं आनंदी राहण्यासाठी आनंदी विचार करणं हेही महत्त्वाचं असं मला वाटतं. तुमचं शरीरही तुमच्या विचारांना रिऍक्‍ट करायला लागतं. मला हे गेल्या वर्षाच्या शेवटाकडे जास्त कळलं. कारण इतर काही आरोग्यविषयक समस्यांमुळं मला मेडिटेशन करावं लागलं; पण आता मात्र मी त्याचा खूप नियमितपणे वापर करते. मी रोज दहा मिनिटं काहीही न करता शांत बसते. आपल्याला इतकं सतत काही तरी करण्याची किंवा बिझी असण्याची सवय लागलीय, की ती दहा मिनिटांची शांतता मेंदूसाठी खूप महत्त्वाची असते.

तुमचं मन आणि शरीर यांचं एकमेकांशी कनेक्‍शन असतं, असं आमचे फिटनेस कोच शैलेश परुळेकर नेहमी सांगतात. तुम्हाला भीती वाटली, की पाय लटपटतात. आनंद झाला, की ऊर भरून येतो, राग डोक्‍यात जातो. त्यामुळं एकूणच या दोन्हींचं नातं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं आनंदी राहण्यासाठी आनंदी विचार करणं हेही महत्त्वाचं असं मला वाटतं. तुमचं शरीरही तुमच्या विचारांना रिऍक्‍ट करायला लागतं. मला हे गेल्या वर्षाच्या शेवटाकडे जास्त कळलं. कारण इतर काही आरोग्यविषयक समस्यांमुळं मला कंपल्सरी मेडिटेशन करावं लागलं; पण आता मात्र मी त्याचा खूप नियमितपणे वापर करते. मी रोज दहा मिनिटं काहीही न करता शांत बसते. आपल्याला इतकं सतत काही तरी करण्याची किंवा बिझी असण्याची सवय लागलीय, की ती दहा मिनिटांची शांतता मेंदूसाठी खूप महत्त्वाची असते. शारीरिक फिटनेसबरोबर मानसिक फिटनेसही तितकाच महत्त्वाचं असतं. नुसते शरीरानं फिट असाल आणि मनानं फिट नसाल तर काहीच उपयोग नाही.

मी परुळेकर सरांकडं 2014पासून जायला लागले. मी चार वर्षांपासून त्यांच्याकडं जातेय. सरांमुळं खरं तर व्यायामाची गोडी लागली. मी काहीही झालं, तरी रोज एक तास व्यायाम करतेच. मी आणि माझा पती उमेश कामत दोघंही व्यायाम अजिबात न चुकवण्याबाबत अतिशय जागरूक असतो. खरं तर व्यायाम करायची सुरवात मी उमेशमुळंच केली. म्हणजे चालणं किंवा इतर प्राथमिक गोष्टी मी त्याच्यामुळं करायला लागले. उमेशला व्यायामाची आवड खूप आहे. तो जिम वगैरे करायचा, करतो. त्याचं बघून मी थोडंथोडकं का होईना करायला सुरवात केली. नंतर चित्रपटाची गरज म्हणून व्यायाम करायला लागले आणि आता मी नियमितपणे व्यायाम करते.

जेवणाच्या वेळा पाळण्याची शिस्त
माझ्या लहानपणी कुटुंबात तशी व्यायामाची वगैरे प्रथा नसली, तरी आई-बाबा ऍक्‍टिव्ह खूप आहेत. बाबा आजही 75 वर्षांचे असूनही रोज दोन-तीन किलोमीटर चालतात. व्यायामापेक्षा घरात आहाराची, आहाराच्या वेळा पाळण्याची शिस्त लागली, ती मला उपयुक्त वाटते. लहानपणी आम्ही रात्री आठच्या ठोक्‍याला जेवायचो आणि साडेदहाला झोपायचोच. आज जे डाएटिशियन सांगतात, ते आई-बाबा लहानपणापासून सांगायचे. जेवणातसुद्धा पोळी-भाजी, भात-आमटी, कोशिंबिर, उसळी असं सगळं असायचं. त्यामुळं पोटामध्ये सगळ्या गोष्टी जायच्या. असा सर्वसमावेशक, पूर्ण आहार घेण्याची सवय तेव्हापासून लागली. हॉटेलात जाणं वगैरे लाड व्हायचे नाहीत. त्या फारच स्पेशल मोमेंट्‌स असायच्या; पण आहाराची ही जी शिस्त आई-बाबांनी लावली, त्यामुळं फिटनेसचा एक चांगला पाया नक्की तयार झाला. आजही मी रात्रीचं जेवण सात-साडेसात वाजता करतेच. माझे मदतनीस ते जुळवून आणण्यासाठी मदत करतात; पण मी ही गोष्ट इतक्‍या काटेकोरपणे पाळते, की एखादे वेळी मी बाहेर शूटिंगमध्ये असले, तर चक्क दुपारच्या जेवणातलं थोडं वाचवून ते रात्री खाईन; पण वेळ पाळीन. माझ्या खाण्यापिण्याच्या तशा फार आवडीनिवडी नाहीत; पण जेवणाच्या वेळा नक्की पाळते. दुपारचं जेवण एक ते दीडदरम्यान आणि रात्रीचं सात-साडेसातदरम्यान हे नक्की असतं.
व्यायाम करायला लागल्यापासून सकाळचा ब्रेकफास्ट चुकवायचा नाही, हेही मी अगदी काटेकोरपणे पाळते. ब्रेकफास्ट सगळ्यांत महत्त्वाचा असतो- कारण रात्रीच्या जेवणानंतर बारा-तेरा तासांची गॅप गेलेली असते. मी थोड्याथोड्या तासांनी खा, दोन-तीन तासांनी खा वगैरे काही गोष्टी पाळत नाही; पण दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळा चुकवत नाही हेही तितकंच खरं. दिवसातून तीन लिटर पाणी नक्की पिते. सकाळ, दुपारी फळं खाते आणि संध्याकाळनंतर फळं, गोड खाणं टाळते. कारण सूर्यास्तानंतर नॅचरल शुगर पचवण्यासाठी आपण विशेष कष्ट करत नाही. त्यामुळं ते नक्की लक्षात घेते.

संगीतामुळं ताण हलका
ताण घालवण्यासाठी संगीत मला खूप महत्त्वाचं वाटतं. मूड नसेल, तेव्हा गाणी ऐकते. मला जितकं लोकांच्यात राहायला आवडतं तितकं एकटं राहायलाही आवडतं. एकटं स्वतःबरोबर राहायची आवड असली, की तुम्ही स्वतःचे मार्गही शोधता. मी म्युझिक ऐकते, वाचते. उमेशशी बोलणं हेही फार महत्त्वाचं असते. तो माझ्यासाठी एक सायकियाट्रिस्टच आहे. हे सगळं ताण घालवण्यासाठी आवश्‍यक वाटतं.
मी खूप देवदेव करणारी नसले, रोज दहा मिनिटं देवासमोर हात जोडून बसत नसले, तरी पॉझिटिव्ह एनर्जीवर माझा खूप विश्‍वास आहे. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या एनर्जी असतात. त्यांच्यावर फोकस करून मन स्थिर करणं, शांत करणं, मन एकाग्र करणं जास्त महत्त्वाचं असतं. हात जोडून नमस्कार करणं, खाली वाकून नमस्कार करणं या गोष्टी रक्ताभिसरणाशी संबंधित असतात असं लहानपणी माझे आई-बाबा सांगायचे. त्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे. देवासमोर बसले काय किंवा कुठंही दहा मिनिटं बसले काय, मन शांत करणं हे जास्त महत्त्वाचं. अध्यात्म वगैरे फार मोठ्या गोष्टी आहेत; पण दहा मिनिटं मन शांत करणं हेसुद्धा फार मोलाचं वाटतं. ते मी नक्की करते. कुटुंबव्यवस्थाही वेलनेससाठी खूप महत्त्वाची असते. तुमचे आई-वडील कसे वागतात, तुम्ही इतरांशी कसे वागता यावरसुद्धा तुमचा वेलनेस अवलंबून असते. प्रत्येक गोष्टीत कुटुंबाची खूप महत्त्वाची भूमिका असते. आरोग्यासाठी किंवा फिटनेससाठी मी कोणत्याही गोष्टी मुद्दाम सोडलेल्या नाहीत किंवा आवडत नसूनही स्वीकाराव्या लागल्या असंही नाही. अतिशय सहजपणे गोष्टी करत आणि त्याच वेळी काही नियमांवर ठाम राहत दिनक्रम सुरू ठेवला, तर तुमचा "वेलनेस' नक्की चांगला होतो.

"सोळा किलो वजन वाढवलं आणि कमी केलं'
"वजनदार' या चित्रपटासाठी मला सोळा किलो वजन वाढवावं लागलं आणि नंतर तितकंच कमीही करावं लागलं. त्यासाठी व्यायाम आणि आहार या दोन्ही गोष्टींचं पालन केलं. मी तेव्हा खूप गोड, दुधातले-तुपातले पदार्थ खायचे. परुळेकर सर तुमच्या एकूण जडणघडणीचाही विचार करतात. माझ्या घरात गोड खाणं आहे. त्यामुळं त्याचा विचार करून तसा आहार सरांनी ठरवला; पण हे खात असताना मी तेवढाच व्यायामही करायचे. हेवी वेट्‌स करायचे. खातोय ते पचायला व्यायाम करायला पाहिजेच; पण बाकी शरीराचा आकारही त्या प्रमाणात वाढायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. "वजन आपण अनैसर्गिकरित्या वाढवतो आहोत, त्यामुळं इतर गोष्टींचाही आकार वाढवला पाहिजे. तुमच्या पोटाचा आकार कमीच असेल तर तुम्ही कमीच खाणार. कारण तुमची भूक कमी आहे. तुमची भूक वाढवण्यासाठी जास्त व्यायाम करायला पाहिजे ज्यामुळं भूक वाढेल,' असं परुळेकर सर सांगायचे. त्यानुसार अंमलबजावणी केली आणि त्याचे तसे परिणाम दिसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com