अशी बोलते माझी कविता (प्रा. सतीश देवपूरकर)

प्रा. सतीश देवपूरकर, पुणे ७०३०६८७२५७
रविवार, 25 जून 2017

सोबत

एकाच तुझ्या दु:खाने जन्माची सोबत केली!
तू नव्हे, तुझ्या स्वप्नाने जन्माची सोबत केली!

    तू झुळुक कोवळी बनुनी बिलगलीस मज त्या रात्री
    पळभरच्या सहवासाने जन्माची सोबत केली!

वळणावर अवघड एका सोबती पळाले सारे
पण त्याच बिकट रस्त्याने जन्माची सोबत केली!

    संपला चार दिवसांचा दीपोत्सव आयुष्याचा
    मग एका काळोखाने जन्माची सोबत केली!

पकडून बोट वाऱ्याचे तो सुगंध निघुनी गेला....
पण रुतलेल्या काट्याने जन्माची सोबत केली!

सोबत

एकाच तुझ्या दु:खाने जन्माची सोबत केली!
तू नव्हे, तुझ्या स्वप्नाने जन्माची सोबत केली!

    तू झुळुक कोवळी बनुनी बिलगलीस मज त्या रात्री
    पळभरच्या सहवासाने जन्माची सोबत केली!

वळणावर अवघड एका सोबती पळाले सारे
पण त्याच बिकट रस्त्याने जन्माची सोबत केली!

    संपला चार दिवसांचा दीपोत्सव आयुष्याचा
    मग एका काळोखाने जन्माची सोबत केली!

पकडून बोट वाऱ्याचे तो सुगंध निघुनी गेला....
पण रुतलेल्या काट्याने जन्माची सोबत केली!

    वाटेवर अर्ध्या झाला घायाळ पंख सोनेरी
    पण मातीच्या पायाने जन्माची सोबत केली!

ते दिवस गुलाबी गेले...काळाच्या पडद्यामागे
पण स्मरणांच्या गंधाने जन्माची सोबत केली!

    वठलेल्या झाडावरती बहराची एक निशाणी
    पिकलेल्या त्या पानाने जन्माची सोबत केली!

वळचणीसही कोणाच्या आसरा मिळाला नाही
भिरभिरणाऱ्या वाऱ्याने जन्माची सोबत केली!

    कापली याच बळावर अंतरे प्रकाश्‌वर्षांची ....
    आशेच्या त्या किरणाने जन्माची सोबत केली!

Web Title: prof satish deopurkar write social media poem in saptarang