तडजोड की संघर्ष?

तडजोड की संघर्ष?

घरची बेताची परिस्थिती असली तरी स्पर्धा परीक्षेतून आयुष्याला वेगळा आकार मिळेल हे स्वप्न उराशी घेऊन शेकडो विद्यार्थी दरवर्षी शहरात येतात. दुर्दम्य इच्छाशक्ती, कष्ट घेण्याची तयारी, बौद्धिक क्षमता असूनही केवळ दैनंदिन गरजा भागवण्यापुरतेही पैसे गाठीशी नसल्याने अनेक छोठी-मोठी कामे करीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ते दिसतात. या धडपडीत काहीजण यशस्वीही होतात; पण अनेकांना आयुष्यातील समस्यांचा चक्रव्यूहच भेदता न आल्याने स्वप्नांशी तडजोड करण्याची वेळ येते. अशा तरुणांसमोर एकच प्रश्‍न असतो, तडजोड की संघर्ष?

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची पार्श्‍वभूमी ही खेड्यातील असते. घरची बेताची परिस्थिती व शहरी संस्कृतीशी अनभिज्ञ असलेल्या या तरुणांचे अनेक प्रश्‍न आहेत. शहरातील दररोजच्या गरजा भागवण्यासाठी अनेक तरुणांना अर्धवेळ काम करावे लागते व उरलेल्या वेळात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा लागतो. पुरेसा संदर्भ पुस्तके हातात नसतानाही कधी सार्वजनिक ग्रंथालयातील, तर कधी मित्रांची पुस्तके वापरून हे तरुण नेटाने अभ्यास करतात.

अनेकांच्या कष्टाचे चीज होते, तर अनेकांना बरीच वर्षे हा संघर्ष चालू ठेवावा लागतो.  या मुलांमध्ये कष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. अभ्यासाची तळमळ त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते. परिस्थितीचा बाऊ न करता हे तरुण अनेक वर्षे इमाने-इतबारे कष्टही करतात; पण अर्धवेळ दररोज कामात जात असल्याने म्हणावा तितका अभ्यासावर फोकस करणे त्यांना शक्‍य होत नाही. पर्यायाने अनेकांना अपयशाचा सामना करावा लागतो. वारंवार येणाऱ्या अपयशामुळे स्वप्नांशी तडजोड करायची की, संघर्ष करीत राहायचे हाच प्रश्‍न हे तरुण विचारतात.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची पार्श्‍वभूमी ही खेड्यातील असते. घरची बेताची परिस्थिती व शहरी संस्कृतीशी अनभिज्ञ असलेल्या या तरुणांचे अनेक प्रश्‍न आहेत. शहरातील दररोजच्या गरजा भागवण्यासाठी अनेक तरुणांना अर्धवेळ काम करावे लागते व उरलेल्या वेळात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा लागतो. पुरेसा संदर्भ पुस्तके हातात नसतानाही कधी सार्वजनिक ग्रंथालयातील, तर कधी मित्रांची पुस्तके वापरून हे तरुण नेटाने अभ्यास करतात. अनेकांच्या कष्टाचे चीज होते, तर अनेकांना बरीच वर्षे हा संघर्ष चालू ठेवावा लागतो.  या मुलांमध्ये कष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे.

अभ्यासाची तळमळ त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते. परिस्थितीचा बाऊ न करता हे तरुण अनेक वर्षे इमाने-इतबारे कष्टही करतात; पण अर्धवेळ दररोज कामात जात असल्याने म्हणावा तितका अभ्यासावर फोकस करणे त्यांना शक्‍य होत नाही. पर्यायाने अनेकांना अपयशाचा सामना करावा लागतो. वारंवार येणाऱ्या अपयशामुळे स्वप्नांशी तडजोड करायची की, संघर्ष करीत राहायचे हाच प्रश्‍न हे तरुण विचारतात.

तडजोडीचा मार्ग 
आयुष्यभर मनाच्या गाभाऱ्यात वाढवलेल्या स्वप्नांशी तडजोड करण्याचा मार्ग हा धोपट मार्ग आहे. स्वप्न सत्यात उतरवण्याचे सर्व पर्याय संपल्यावर आपण तडजोड हा शेवटचा पर्याय म्हणून निवडू शकतो; पण स्वप्नांसाठी स्वतःला झोकून देणे केव्हाही चांगले. उमेदीचे वय स्वप्ने साकारण्यासाठी खर्ची पडले तरी त्यातून होणाऱ्या त्रासापेक्षा लढल्याचे समाधान अधिक लाभते. म्हणून तडजोड की संघर्ष अशा द्विधा मनःस्थितीत असणाऱ्या तरुणांनी स्वतःच्या क्षमतेचा, आपल्या बलस्थानांचा, दुर्बलस्थानाचा मनापासून अभ्यास करावा. स्वप्न सत्यात उतरवण्याची गरज तपासून पाहावी. तडजोडीमुळे आयुष्यातील प्रश्‍न सुटतील का, याचा अभ्यास करावा. काही मार्गदर्शकांचा सल्ला घ्यावा व मगच योग्य निर्णय घ्यावा.

संघर्ष हाच यशाचा मार्ग 
तडजोडीपेक्षा संघर्षाचा मार्ग निवडण्यासाठी मनाचा प्रचंड मोठा निग्रह लागतो; पण आपण स्वतःनेच आपल्या मनाच्या केलेल्या समुपदेशनाने हा निग्रह प्रयत्नपूर्वक कमावता येतो. आजवरचा इतिहास पाहता संघर्षातूनच अनेकांना यशाचा मार्ग सापडला आहे. मित्रहो लक्षात ठेवा, जेव्हा संकटे अनेक येतात तेव्हा आपली किंमत वाढते. आपण कोहिनूर हिऱ्याच्या किमतीबाबत ऐकून असाल; पण तेवढी किंमत मिळवण्यासाठी हिऱ्यालाही अनेक पैलू पाडून घ्यावे लागतात. त्यासाठी अनेकदा अंगावर घणाचे घाव सोसावे लागतात. म्हणतात ना, संघर्ष जितना बडा होगा जीत उतनीही शानदार होगी. 

जाणीवपूर्वक या गोष्टी कराच... 
- जेव्हा तडजोड की संघर्ष हा प्रश्‍न मनात पिंगा घालायला लागेल, तेव्हा समजून जा, तुमचे संघर्षाने मन थकून गेले आहे. पुन्हा मनाला उभारी येण्यासाठी आपल्या बौद्धिक विश्रांतीची नितांत गरज आहे.
- यावेळी बिघडलेली विचार प्रक्रिया सुधारण्यासाठी तुम्हाला सदृढ विचाराची गरज आहे. त्यासाठी आपण सकारात्मक पण वास्तव विचार मांडणारी पुस्तके वाचू शकता.
- कोणताही निर्णय घेण्याआधी तडजोड व संघर्ष या दोन्ही विषयांचे सकारात्मक व नकारात्मक मुद्दे एका कागदावर लिहून काढा. ते तुम्हाला अधिक मदत करतील.
- वय वाढत चालले असेल, तर मनात तडजोडीचेच विचार घोळायला लागतात. अशा वेळी तडजोड करण्याअगोदर स्वतःलाच एक विशिष्ट तारीख ठरवून द्या. त्या तारखेपर्यंत प्रचंड मेहनत करा. एवढे करूनही यश मिळाले नाही, तर आपण योग्य तो निर्णय घेऊ शकता.
 - आपला स्वभाव जर चंचल असेल, तर आपण घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी काही अंतराने करू शकता. या बाबतीत तज्ज्ञ समुपदेशक आपल्याला अधिक मदत करू शकतो.
- पैशाच्या गरजेसाठी आपले अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार असेल, तर आपण अशा क्षेत्रात काम निवडू शकता. ज्यामुळे पैसेही मिळतील व कामही होईल. उदा. क्‍लासेस, भाषांतर, समुपदेशन इत्यादी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com