व्यवस्थापन केल्याने संबंध व्यवस्थित होतात काय?

relationship.
relationship.

Relationship Management विषयी चर्चा आणि विचार केला असता विविध गोष्टी आणि प्रश्न पुढे येतात. संबंध व्यवस्थापन करायचे ते ठीक आहे; पण याचा शब्दशः अर्थ काय? खरंच व्यवस्थापन केल्याने संबंध व्यवस्थित होतात काय? व्यवस्थापन करायचे म्हणजे करायचे तरी काय? कामाच्या, व्यवसायाच्या ठिकाणी ठीक आहे; पण घरांमध्ये आणि नात्यांमध्ये कसे काय शक्‍य आहे? कामधंद्यांच्या ठिकाणीही एखादवेळी हे कठीण जात आणि का म्हणून हे संबंध manage वगैरे करायचे? होतं कधी कधी त्रासल्यासारखं. पण, चुकतं एकाच ठिकाणी. आपण विचार केलाय का कधी, ते ठिकाण कोणतं?
आपण जेव्हा संबंध व्यवस्थापन या विषयी बोलतो किंवा विचार करतो तेव्हा आपण मी काय करत आहे आणि समोरचा कसा काहीच करत नाही, याची तुलना करायला लागतो. पाहा ना, ऑफिस असो वा घर, जेव्हा मी एखाद्याशी चांगली वागते आहे किंवा त्यासाठी काही करते तेव्हा त्यानेसुद्धा तसेच करावे, ही माझी अपेक्षाच नाही, तर माझा आग्रह असतो. जेव्हा मला ते मिळत नाही जे अपेक्षित आहे तेव्हा माझा हिरमुस होतो आणि संबंधांमध्ये ताण सुरू होतो. मग होत नाही ते व्यवस्थापन.
मी एखाद्यासाठी काही करणे आणि त्याने मला जसे अपेक्षित आहे तसे वागणे किंवा देणे, हा माझ्या आनंदाचा आणि समाधानाचा भाग झाला; पण याच्या विपरीत झाल्यास माझ्या रागाचा आणि द्वेषाचा. सहसा आई मुलाला जन्म दिल्यानंतर म्हणत नाही की, मी तुला कळा सोसून जन्म दिला, मोठा केला, तर आता तुला हे करायलाच हवं; कारण मी केलेले हे उपकार आहेत तेव्हा त्याची ती दरखेपेला आठवण आणि परतफेड तू करायला हवी, असे उद्बोधन करत नाही. ही जाणिवेची बाब आहे आणि प्रत्येकाच्या कर्तव्याचीदेखील. ज्याक्षणी आठवण करवून देणाऱ्या अशा गोष्टी पुन्हा पुन्हा नात्यात येतात त्याक्षणी कडवटपणा आणि अंतर येणे नक्कीच आहे. मग आपल्या नात्यांची वारंवार आठवण परतफेडीसाठी व्हायला हवी की प्रेमासाठी? मी माझं करून झालं आता तुझी पाळी? असं तर करत नाही ना आपण? ऑफिसमध्येही होतं असंच काही पण वेगळ्या अर्थाने. थोडक्‍यात सांगायचं काय ते हे की, अपेक्षेपोटी जन्माला आलेला कोणताही मानस नक्कीच समाधान किंवा आनंद देऊ शकत नाही.
गीतेतल्या एका श्‍लोकाचे आजवर मिश्‍किलीत कितीतरी अर्थ निघाले असतील. "कर्म कर फल की चिंता मत कर', आहे ना? पण, याचा आपण खरंच विचार केलाय का की, कृष्णाला तेव्हा सांगायचं काय असेल? चिंता करू नको, यासाठी कारण आपल्याला काय फळ मिळेल यावर नियंत्रण नाही. म्हणून एखाद्यासाठी काही करत असताना त्यातून आपल्याला अमका फायदा होईल किंवा तमका आपल्याला मदत करेल, अशी कोणतीही अपेक्षा निव्वळ चुकीची. दुर्योधनाने कर्णाला अंगराज्य दिले आणि मैत्रीच्या नावाखाली त्याने त्याचा निव्वळ उपयोग केला, असे म्हणायला हरकत नाही. कर्णाने दुर्योधनाला मदत केली; कारण दुर्योधनाचे त्याच्यावर उपकार होते. परिणाम मात्र, दोघांनाही भोगायला लागले. संबंध व्यवस्थापनाचेच हेही एक उदाहरणच. जिथे फक्त अपेक्षेचा जन्म आणि संगोपन होते.
खऱ्या अर्थाने सांगायचे झाले, तर काहीही अपेक्षा नसताना प्रस्थापित केलेले हे व्यवस्थापन नकळत जे देते ते ठरवून केलेल्या व्यवस्थापनापेक्षा फार निराळं असंच. कदाचित कठीण आहे, काही अपेक्षा तर साहजिक आहे. पण, त्या अपेक्षेपोटी दोन व्यक्तींखेरीज इतर अजून त्रासत असतील तर? कोणतेही रिलेशन manage करायला दीर्घकालीन किंवा अल्पावधीत होणारे फायदे न बघता जर साधा, चांगला स्वभाव आणि शब्द सतत ठेवले, तर सहजच रिलेशनचे व्यवस्थापन होईल हे नक्की. बहुदा होतं काय की, आपण त्या नात्यांमागे पळत असतो जे आता नाहीत, तेव्हा नवीन नाती सहजच दुखावली जातात. त्या DEALS

पळत असतो जी कदाचित मिळणार नाही आणि मग नवीन संधी दिसेल कशी? खेळ सुरू असतो वरचढीचा आणि आपल्या आयुष्यात दीर्घकालीन असू शकणारे आपल्या विचित्र स्वभावाने दुखावतात, दुरावतात आणि मग फरक पडतो तो संबंधात. असं म्हणतात ना, जे आहे ते तुमच्याकडून कधीही कोणी हिरावू शकत नाही आणि जे नाही त्याच्यामागे धावून मिळणार तरी काय? अशीच काहीशी चूक आपण कामाच्या ठिकाणी आणि नात्यांच्या ठिकाणी करत असतो. तेव्हा विचार करा आणि बघा संबंध व्यवस्थापनेत आपलं गणित इथे तर चुकत नाहीये ना? याव्यतिरिक्त जे आहे ते पुस्तकात; पण तेही लक्षात येईल फक्त या साध्या पायव्याने.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com