अशी बोलते माझी कविता (ऋत्विक व्यास)

ऋत्विक व्यास, पुणे ८१४९६९२३५५
रविवार, 11 डिसेंबर 2016

एक खेळ असतो!

एक खेळ असतो...
काहींचा आवडता, काहींचा नावडता...
आवडणाऱ्याला झिंग चढवेल
नावडणाऱ्याला आकर्षक वाटेल असा
हा खेळ कमालीचा धुंदीचा...!

सोंगट्याही आहेत,
ज्यांचं शरीर पशूंचं; पण स्वभाव मानवी!
तिरकं शिरून थेट पोट फोडणार...
सरळमार्गी असूनही आक्रमक...
नाकासमोर पाहत दबकत चालणार...इत्यादी
इथंही थोरा-मोठ्यांना भाव शेवटी शेवटीच
यांनाच कोसळवण्यासाठी खरंतर हा खेळ !
शेवट नेहमीच तणावाचा...

एक खेळ असतो!

एक खेळ असतो...
काहींचा आवडता, काहींचा नावडता...
आवडणाऱ्याला झिंग चढवेल
नावडणाऱ्याला आकर्षक वाटेल असा
हा खेळ कमालीचा धुंदीचा...!

सोंगट्याही आहेत,
ज्यांचं शरीर पशूंचं; पण स्वभाव मानवी!
तिरकं शिरून थेट पोट फोडणार...
सरळमार्गी असूनही आक्रमक...
नाकासमोर पाहत दबकत चालणार...इत्यादी
इथंही थोरा-मोठ्यांना भाव शेवटी शेवटीच
यांनाच कोसळवण्यासाठी खरंतर हा खेळ !
शेवट नेहमीच तणावाचा...

गंमत अशी की
इथं सगळ्याच सोंगट्यांना ’तो’ हे संबोधन!
तो राजा, तो प्रधान, तो वजीर वगैरे
या सगळ्यात ’ती’ कुठंच नाही;
पण यांना खेळवणारी ’ती’च असू शकते...
नव्हे! ’ती’च तर असते!

खरंच ’बुद्धीचं बळ’ लागतंच
हा खेळ खेळताना...!

ज्याला कळेल तो जिंकेल...

नाहीतर चेक अँड मेट...!

Web Title: rutvik vyas's poem

टॅग्स