अशी बोलते माझी कविता (साहेबराव ठाणगे)

साहेबराव ठाणगे
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

जाग

झोपेत वाजले दार
उठा सरदार
बुलावा आला
निद्रेचे भांडे फुटे
काहिली उठे
कालवा झाला

हे कोण कोठुनी आले
जागवुन गेले
मोडली झोप
का कुणीच जागे नाही
कळेना काही
वाढला ताप

हे काय इथे चालले
कोण वोळले
समजले नाही
या कसल्या हाका येती
कवेशी घेती
दिशा या दाही

शोधून सांदी-कोपरे
पाहिले सारे
मिळेना काही
जर तिच्याच पदराखाली
जाग मज आली
दिसेना आई!

- साहेबराव ठाणगे, ९८२०० ९३८६७
मुपो. करंदी, ता. पारनेर, जि. नगर

जाग

झोपेत वाजले दार
उठा सरदार
बुलावा आला
निद्रेचे भांडे फुटे
काहिली उठे
कालवा झाला

हे कोण कोठुनी आले
जागवुन गेले
मोडली झोप
का कुणीच जागे नाही
कळेना काही
वाढला ताप

हे काय इथे चालले
कोण वोळले
समजले नाही
या कसल्या हाका येती
कवेशी घेती
दिशा या दाही

शोधून सांदी-कोपरे
पाहिले सारे
मिळेना काही
जर तिच्याच पदराखाली
जाग मज आली
दिसेना आई!

- साहेबराव ठाणगे, ९८२०० ९३८६७
मुपो. करंदी, ता. पारनेर, जि. नगर

Web Title: sahebrao thange's poem

टॅग्स
फोटो गॅलरी