सह्याद्रीचा माथा : मालेगाव जिल्ह्यासाठी जनमताचा कौल हवाच!

Eknath Shinde, Dada Bhuse & Devendra Fadanvis Latest Marathi Article
Eknath Shinde, Dada Bhuse & Devendra Fadanvis Latest Marathi Articleesakal

खटल्याच्या घरात पुरुष मंडळी किंवा बायका एकमेकांशी गोडीगुलाबीने राहिल्यास त्या घरात शांतता नांदते, विकास होतो. तसेच शहर, जिल्हा, राज्य व देश या संदर्भात असते. राज्यातील शिंदे सरकारचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाशिक दौऱ्यात मालेगाव जिल्हानिर्मितीचा विषय निघाला.

मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हानिर्मितीबाबत सकारात्मकता दर्शविली; परंतु जनमानस काय म्हणते? याचा विचार व्हायला हवा. (Sahyadricha Marathi saptarang Marathi Political Article by dr rahul ranalkar nashik news)

सध्या मालेगाव जिल्हानिर्मितीच्या चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानिमित्त ही चर्चा पुन्हा झाली. नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव हा स्वतंत्र जिल्हा व्हावा, यासाठीचे हे प्रयत्न आहेत.

मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून छोटे जिल्हे केल्यास प्रशासकीयदृष्ट्या योजनांची जलद गतीने अंमलबजावणी करणे सोपे जाते, हे त्यामागचे विचार. हे विचार खरेदेखील आहे, यात शंका नाही. म्हणूनच पंधरा तालुक्यांच्या नाशिकमधून कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड व नांदगाव हे सहा तालुके बाजूला करून स्वतंत्र मालेगाव जिल्हा तयार करण्याची मागणी आहे. नांदगावच्या मनमाड व बागलाणच्या नामपूर या मोठ्या गावांना तालुक्याचा दर्जा देऊन आठ तालुक्यांचा मालेगाव जिल्हा केला जाणार आहे.

नाशिकचे विभाजन होत असताना नाशिककरांनी समर्थनही केले नाही व विरोधही केला नाही. म्हणजे जिल्हा झालाच तर त्यांनी नाशिककरांना फरक पडणार नाही, असा अर्थ निघतो. राहिला विषय तो मालेगाव जिल्हानिर्मिती होत असताना त्या-त्या तालुक्यातील नागरिकांची व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची इच्छा आहे का? हे देखील तपासले पाहिजे.

निसर्गतः मोठ्या शहरांशी जोडले जाण्याचा मानवी स्वभाव असतो. मुंबईजवळच्या कल्याण-डोंबिवली शहरात राहणारा व्यक्तीसुद्धा मुंबईत राहत असल्याचे सांगतात. हीच बाब पुणे, नागपूर शहरासंदर्भातही लागू पडते. तसेच नाशिक व जिल्ह्यातील लोकदेखील नाशिकशी जोडले राहण्यासाठी नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगतात. अशा लोकांचे, युवा पिढीचे यासंदर्भातील मत काय? हे जाणून घेणे गरजेचे आहे.

नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी या संदर्भात हो व नाही, असे काहीच बोलले नाही. त्यामुळे शिंदे गटातच जिल्हानिर्मितीवरून मतभेद असल्याचे स्पष्ट होते. कळवणचे आमदार नितीन पवार यांनी जाहीर विरोध दर्शविला.

दिंडोरीचे आमदार व विधानसभेचे माजी सभापती नरहरी झिरवाळ यांनी स्वतंत्र आदिवासी जिल्ह्याची मागणी केली. माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी जिल्ह्याचे मुख्यालय बागलाण असावे, अशी मागणी केली. चांदवड तालुक्यातून यापूर्वीच विरोध झाला आहे.

तर आढावा बैठकीतच भाजपचे आमदार राहुल आहेर यांनी चांदवड आणि देवळा तालुक्यांचा मालेगाव जिल्ह्यात समावेश करू नये, तेथील जनतेची तशी इच्छा नाही, असे सांगत थेटपणे विरोध दर्शविला. ही झाली लोकप्रतिनिधींची भूमिका, यात राजकारण असू शकते; परंतु ज्या तालुक्यांचा समावेश प्रस्तावित नवीन जिल्ह्यात करायचा आहे, तेथील लोकांचे मत अजमावणे आवश्यक आहे.

Eknath Shinde, Dada Bhuse & Devendra Fadanvis Latest Marathi Article
बालमनात आले होते, डोअर किपर व्हावे!

मालेगाव जिल्हानिर्मितीचा विषय नवीन नाही. गेल्या वर्षांपासून हा विषय चर्चेला येतो व पुन्हा बासनात गुंडाळला जातो. आत्ताच हा विषय चर्चेला येण्यामागे राजकारणदेखील आहे. एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार दादा भुसे व सुहास कांदे या दोघांचे मतदारसंघ प्रस्तावित मालेगाव जिल्ह्यात येतात.

त्यामुळे समर्थकांचे मतदारसंघ भक्कम करण्यासाठी मालेगाव जिल्हानिर्मितीचे भूत पुन्हा नव्याने जागे करण्यात आल्याचा दाट संशय आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी डिसेंबरअखेर जिल्हानिर्मितीबाबत सकारात्मक राहू, असे सांगितले.

विधानसभेत बहुमताच्या जोरावर जिल्हा होईलही, परंतु त्या नवीन जिल्ह्यात वास्तव्य करणारे नागरिक मनापासून जिल्हा स्वीकारतील का? हा भाग महत्त्वाचा राहील, याचा विचारदेखील जिल्हानिर्मिती होण्यापूर्वी करावा लागणार आहे.

अन्यथा जिल्हा झाल्यानंतर आंदोलनाच्या भळभळत्या जखमांवर आयुष्यभर मलमपट्टी करण्याची वेळ त्या वेळच्या राज्यकर्त्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर येईल.

मोठ्या जिल्ह्यांचे छोट्या जिल्ह्यात रूपांतर करण्याचा विचार नाशिक व मालेगाव संदर्भात केला जातो, मग जळगाव जिल्ह्यातील भुसावळ व नगर जिल्ह्यांतील श्रीरामपूर किंवा संगमनेरबाबत जिल्हानिर्मितीचा विषय का नाही? हे दोन्ही जिल्हेदेखील भौगोलिकदृष्टीने मोठे आहेत.

मात्र फक्त मालेगावचा विचार झाल्याने यावरून मुख्यमंत्र्यांच्या जिल्हानिर्मितीच्या प्रयत्नांना राजकारणाचा अधिक वास येतो. एका घराचे दोन घरे होत असताना स्वतंत्र चूल मांडणाऱ्या घरात शांतता नांदण्यासाठी कुटुंबप्रमुखांबरोबरच सदस्यांचे मतदेखील महत्त्वाचे असते. त्याप्रमाणे मालेगाव जिल्हा निर्माण होत असताना मालेगाव जिल्ह्यात सहभागी होणाऱ्या तालुक्यांतील जनमताचा कौल घेणे महत्त्वाचे आहे.

Eknath Shinde, Dada Bhuse & Devendra Fadanvis Latest Marathi Article
‘नग्न’ म्हणजे अश्लील नव्हे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com