अशी बोलते माझी कविता (संतोष आळंजकर)

संतोष आळंजकर, ९४२३७२४४५०
रविवार, 25 जून 2017

सपान

    एकदा जमीन नांगरताना
    बा आईला म्हणाला ः
    ‘फक्त एवढं साल जास्ती राबायचं
    सावकाराचं रिन फेडून
    एक इटाचं घर बांधायचं’

खोपटाकडं बोट दाखवून
मग माय मला म्हणाली ः
‘तुज्या बाचं आसंच हाय
आमचं लगीन झाल्यापासून निसतंच म्हन्ताय
एवढं साल जास्ती राबायचं
सावकाराचं रिन फेडून
एक इटाचं घर बांधायचं... ’

    एवढी सालं आली अन्‌ गेली
    जमीन नांगरली...पाऊस पडला...पिकं आली...
    सावकाराची कोठी भरली
    अन्‌ आमची कणगी मात्र रिकामीच राहिली

सपान

    एकदा जमीन नांगरताना
    बा आईला म्हणाला ः
    ‘फक्त एवढं साल जास्ती राबायचं
    सावकाराचं रिन फेडून
    एक इटाचं घर बांधायचं’

खोपटाकडं बोट दाखवून
मग माय मला म्हणाली ः
‘तुज्या बाचं आसंच हाय
आमचं लगीन झाल्यापासून निसतंच म्हन्ताय
एवढं साल जास्ती राबायचं
सावकाराचं रिन फेडून
एक इटाचं घर बांधायचं... ’

    एवढी सालं आली अन्‌ गेली
    जमीन नांगरली...पाऊस पडला...पिकं आली...
    सावकाराची कोठी भरली
    अन्‌ आमची कणगी मात्र रिकामीच राहिली

अशीच कैक सालं राबता राबता
आई-बाचं जीवन सरलं
अन्‌ एक इटाच्या घराचं सपान
खोपटातच राहून गेलं...!

Web Title: santosh aalanjkar write poem in saptarang