चलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)

रविवार, 27 मे 2018

पर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या पर्यटनवाढीचं मुख्य कारण म्हणजे, त्या त्या देशांतले निसर्गसंपन्न प्रदेश, वैभवशाली इतिहास व स्थानिक संस्कृती. विविध देशांमधल्या पर्यटकांना आकर्षित करून आपल्या देशात येण्यास भाग पाडण्यासाठी आकर्षक वेबसाईट्‌स व ऍप्स तयार केली जात आहेत. यामुळं त्या देशांना आर्थिक प्राप्ती तर होतेच; शिवाय पर्यटकांना या वेबसाईट्‌समुळं व ऍप्समुळं चांगला "गाईड'ही मिळतो. पर्यटनाविषयीच्या अशाच काही ऍप्सची माहिती जाणून घेऊ या...

पर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या पर्यटनवाढीचं मुख्य कारण म्हणजे, त्या त्या देशांतले निसर्गसंपन्न प्रदेश, वैभवशाली इतिहास व स्थानिक संस्कृती. विविध देशांमधल्या पर्यटकांना आकर्षित करून आपल्या देशात येण्यास भाग पाडण्यासाठी आकर्षक वेबसाईट्‌स व ऍप्स तयार केली जात आहेत. यामुळं त्या देशांना आर्थिक प्राप्ती तर होतेच; शिवाय पर्यटकांना या वेबसाईट्‌समुळं व ऍप्समुळं चांगला "गाईड'ही मिळतो. पर्यटनाविषयीच्या अशाच काही ऍप्सची माहिती जाणून घेऊ या...

मुलांना सुटी लागली की सुटीत धमाल काय करायची याचे वेध लागतात. पूर्वी प"ळती झाडे पाहू या...मामाच्या गावाला जाऊ या', हा सुटीतला ठरलेला कार्यक्रम असे; परंतु दिवसेंदिवस हे चित्र बदलत चाललं आहे. आता वर्षभरात कधीही फिरायला जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. एखादा समुद्रकिनारा, थंड हवेचं ठिकाण, पावसाळी धबधबे, जंगलपरिसर किंवा परदेशांत फिरायला जाण्याचं नियोजन अनेकजण करताना दिसतात. पर्यटनस्थळी मोठी गर्दी दिसते.

माहिती तंत्रज्ञानाचाही मोठा वाटा यात नक्कीच आहे. जग पूर्वी कधी नव्हतं इतकं आता माहिती तंत्रज्ञानामुळं जवळ आलेलं आहे. एका क्‍लिकवर नवनवी माहिती मिळते अन्‌ पर्यटक तयारीनिशी पर्यटनाला बाहेर पडतात. विविध वेबसाईट्‌सवरची माहिती किंवा पर्यटनविषयक विविध ऍप्स अगदी हातातच असल्यामुळं पर्यटकांमध्ये एक प्रकारचा निर्धास्तपणा आलेला दिसतो.

भारतासारख्या विकसनशील देशातलं पर्यटन अलीकडच्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलं असून, भारताला भेट देणाऱ्यांमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे. या पर्यटनवाढीचं मुख्य कारण आहे भारतातले वेगवेगळे निसर्गसंपन्न प्रदेश, इथला वैभवशाली इतिहास आणि अनोख्या प्रकारची स्थानिक संस्कृती. याशिवाय, उंच-सखल डोंगर-दऱ्या, समृद्ध जंगलं, शांतरम्य समुद्रकिनारे, वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता, जीवनदायिनी नद्या. फेसाळ धबधबे, वाळूच्या पुळणी व खाड्या, कांदळवनं, छोटी-मोठी बेटं, गवतांचे गालिचेच जणू अंथरलेले असावेत अशी विस्तीर्ण पठारं, तलाव-सरोवरं, अंधाऱ्या गुहा आणि पूर्वापार देवराया, थंड हवेची ठिकाणं....हे सगळं म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच. हे झालं भारतासंदर्भातलं. मात्र, परदेशात जायला अथवा फिरायला कुणाला नको असतं? विमानवाहतूकही तुलनेनं स्वस्त झाल्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी परदेशात जाण्याचं नियोजन करत असतात. फिरायला कुठं आणि कधी जायचं हे एकदा ठरलं की झालंच! नियोजनामुळं विमानाचं तिकीटही स्वस्त पडतं. यामुळं परदेशात फिरायला जाणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसते. या सगळ्याचं प्लॅनिंग करण्यासाठी वेगवेगळ्या ऍप्सची मोठी मदत होते.

गुगल प्लेवर "ट्रॅव्हल ऍप्स' शेकडोंच्या संख्येनं उपलब्ध आहेत; परंतु आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे आणि त्यासाठी तिथली कोणती ऍप्स महत्त्वाची आहेत हे सर्च करून डाउनलोड केल्यास मोठी मदत होते. पर्याटनाचं नियोजन करण्यापासून ते विविध स्थळं दाखवण्यासाठीची अनेक ऍप्स अगदी मोफत उपलब्ध आहेत.

मेक माय ट्रिप (MakeMyTrip):
देशात अथवा परदेशांत जाण्यासंदर्भातलं नियोजन करण्यासाठी पर्यटक प्रामुख्यानं "मेक माय ट्रिप' या ऍपचा आधार घेताना दिसतात. विमान, रेल्वे, हॉटेल, बस, कॅबचे बुकिंग या ऍपच्या माध्यमातून करता येतं. ऑनलाइन बुकिंग केल्यास घसघशीत डिस्काउंटही मिळतं. अल्पावधीत हे ऍप पर्यटकांच्या पसंतीला उतरलं आहे
रेटिंग ः 4 स्टार
***
इंडिया टॉप टूरिस्ट प्लेसेस गाइड (India Top Tourist Places Guide):

भारतातलं बेस्ट ऍट्रॅक्‍शन, बेस हनिमून डेस्टिनेशन, वंडर्स ऑफ इंडिया, ऐतिहासिक स्थळं, स्मारकं, समुद्रकिनारे, किल्ले, संग्रहालयं, देवळं, थंड हवेची ठिकाणी, खाद्यपदार्थ यांबाबतची माहिती या ऍपवर उपलब्ध आहे. माहितीशिवाय या ऍपवर छायाचित्रं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.
रेटिंग ः 4.5 स्टार
***
प्लॅन ट्रिप्स : इंडिया ट्रॅव्हल (Plan Trips: India Travel Guide):

अनेकदा आपल्याला फिरायला जायचं असतं; परंतु, कुठं फिरायला जावं हे समजेनासं होतं, अशा वेळी हे ऍप "ट्रिप-प्लॅनर' म्हणून महत्त्वाचं ठरू शकतं. एकदा ठिकाण ठरलं की तिथं काय काय पाहता येईल अथवा पुढं काय पाहण्यासारखं आहे, हे या ऍपच्या माध्यमातून समजतं. विविध ठिकाणांबद्दलची माहिती असलेले ब्लॉगही इथं उपलब्ध आहेत.
रेटिंग ः 4.2 स्टार
***
यात्रा (Yatra)

विमानाच्या तिकीट-आरक्षणासाठी हे ऍप महत्त्वपूर्ण ठरतं. या ऍपच्या माध्यमातून देशांतर्गत व आंतराष्ट्रीय विमानांचं आरक्षण करता येतं. शिवाय, दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे तिकीटदर व अन्य माहितीही जाणून घेता येते. हॉटेल-आरक्षण, बसतिकीट, रेल्वेतिकीट यांसह अन्य आरक्षणही करता येतं.
रेटिंग ः 4.2 स्टार
***
लाईव्ह ट्रेन स्टेटस (Live Train Status, PNR Status & Train Tickets):

पर्यटन करत असताना रेल्वेचं स्टेटस पाहण्याबरोबरच बसची, हॉटेलांची माहिती इथं उपलब्ध आहे. पर्यटन करत असताना अनेकदा इंटरनेट कनेक्‍शनमध्ये अडथळे येऊ शकतात; परंतु हे ऍप डाउनलोड करून ठेवल्यास ऑफलाइन माहिती मिळू शकते.
रेटिंग ः 4.4 स्टार
***
ट्रिप ऍडव्हायझर (TripAdvisor):

परदेशात प्रवास करत असताना या ऍपला नेटिझन्सची मोठी पसंती आहे. लंडन, अमेरिका, पॅरिस, रोम, सिंगापूर, टोकिओसह 300 हून अधिक महत्त्वाच्या शहरांमधल्या पर्यटनासाठी आवश्‍यक असलेली माहिती इथं उपलब्ध आहे.
रेटिंग ः 4.4 स्टार
***
मॅप्स, जीपीएस नेव्हिगेशन... (Maps, GPS Navigation & Directions, Street View):

प्रवासादरम्यान नेमके आपण कुठं आहोत, जवळचा रस्ता कुठं आहे, जवळ कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत हे समजण्यासाठी "मॅप्स, जीपीएस नेव्हिगेशन अँड डायरेक्‍शन्स, स्ट्रीट व्ह्यू' दिशादर्शक दाखविण्यासाठी या ऍपचा मोठा उपयोग होतो. प्रवासादरम्यान जरी चुकामूक झाली तरी या ऍपमुळं संपर्क साधायला सुलभ होतं. स्थानिक हवामानाची माहितीसह महत्त्वपूर्ण माहिती इथं उपलब्ध आहे.
रेटिंग ः 4.2 स्टार
***
पेपाल (PayPal):

जगातल्या वेगवेगळ्या देशांचं चलन वेगवेगळं असतं. जगभरात प्रवास करताना आर्थिक अडचण जाणवू शकते. अशा वेळी या ऍपच्या माध्यमातून पैसे पाठवता येतात अथवा आपल्या खात्यावर घेता येतात. परिणामी, ऑनलाइन शॉपिंगचा मार्ग सुकर होतो. हे ऍप आर्थिक विषयाशी निगडित असल्यामुळं
साहजिकच त्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा कळीचा ठरतो व प्रत्येक व्यवहाराची माहिती तत्काळ मिळते.
रेटिंग ः 4.3 स्टार
***
महत्त्वाच्या साईट्‌सः
देशांतर्गतः

परदेशातः

इंटरनेटवर माहिती तंत्रज्ञानाचा अक्षरशः खजिना आहे. मात्र, नेमकी कोणती माहिती हवी आहे, याची सुस्पष्टता आपली आपल्यालाच असणं अत्यावश्‍यक आहे. तुम्ही जगात कुठंही फिरत असलात तरी तेथील ऍप्स व संकेतस्थळांच्या माध्यमातून सर्व संबंधित माहिती जाणून घेता येते. गुगल ट्रान्स्लेट अथवा मातृभाषेत संवाद साधण्यासाठीसुद्धा ऍप असल्यामुळं कोणतीच अडचण येत नाही. तुम्ही जगात कुठही निर्धास्तपणे फिरू शकता; फक्त तुमच्याकडं हवा स्मार्ट फोन! कमी वेळात तुम्ही चांगल्या प्रकारे पर्यटन करू शकता... म्हणूनच "बॅग भरो और निकल पडो...'!

Web Title: santosh dhaybar technodost tourist app article in saptarang