‘आहारात बदल करत राहा’ (डॉ. आशिष गोखले)

dr aashish gokhale
dr aashish gokhale

मी सतत तीन ते चार महिने व्यायाम किंवा डाएट करतो, तेव्हा त्यानंतर एक महिना आराम करतो. सामान्यतः एकाच प्रकारचा आहार मी दीर्घकाळ घेत नाही. दर महिन्याला मी आहारात बदल करतो; कारण एकच आहार तुम्ही दीर्घकाळ घेत राहिलात, तर तुम्हाला त्याचा कंटाळा येतो. भारतीय लोक लहानपणापासून डाएटिंग कधीच करत नाहीत. आपल्याला आपलं रोजचं जेवण व्यवस्थित जेवण्याची सवय असते. लहानपणी आपलं वजन कधीच वाढलं नाही. कारण आपली शारीरिक कसरत भरपूर असायची. आता दर दोन-तीन महिन्यांनी मी माझा डाएट प्लॅन तपासतो आणि आहारात बदल करतो.

अभिनयाबरोबरच मी वैद्यकीय व्यवसायही करतो. त्यामुळं धकाधकीच्या दिनचर्येतून व्यायामासाठी वेळ काढण्याची खबरदारी मी घेतो. ज्यांच्याकडे जास्त वेळ असतो, किंवा काढता येतो, त्यांनी अवश्‍य जास्त वेळ द्यावा. वेळ नाही या सबबीवर कुणीही व्यायाम टाळू नये. जेव्हा तुम्हाला हे करण्याची इच्छा असते, तेव्हा तुम्ही दिवसातून थोडा वेळ तरी झटपट व्यायामासाठी नक्कीच काढू शकता. आपण चित्रपट पाहण्यासाठी किंवा सहलीसाठी वेळ काढतो तसंच. तुम्ही व्यायाम करता आणि आतून तुम्हाला हलकं-हलकं वाटतं, तेव्हाच तुम्ही आरोग्यविषयक समस्यांना दूर ठेवून एक निरोगी आयुष्य जगू शकता. माझ्या अनेक मित्रांचं वजन वाढलं होतं; पण दृढनिश्‍चय दाखवून त्यांनी पुन्हा आपला बांधा सुडौल केला आहे. त्यामुळं त्यांचाही आत्मविश्‍वास वाढला आहे.

दर महिन्याला आहारात बदल
मी सतत तीन ते चार महिने व्यायाम किंवा डाएट करतो, तेव्हा त्यानंतर एक महिना आराम करतो. सामान्यतः एकाच प्रकारचा आहार मी दीर्घकाळ घेत नाही. दर महिन्याला मी आहारात बदल करतो; कारण एकच आहार तुम्ही दीर्घकाळ घेत राहिलात, तर तुम्हाला त्याचा कंटाळा येतो. भारतीय लोक लहानपणापासून डाएटिंग कधीच करत नाहीत. आपल्याला आपलं रोजचं जेवण व्यवस्थित जेवण्याची सवय असते. लहानपणी आपलं वजन कधीच वाढलं नाही. कारण आपली शारीरिक कसरत भरपूर असायची. आता दर दोन-तीन महिन्यांनी मी माझा डाएट प्लॅन तपासतो आणि आहारात बदल करतो. रात्री सात वाजल्यानंतर कार्बोहायड्रेट्‌स खाऊ नका आणि रात्रीच्या जेवणात ग्रिल्ड फिश किंवा पॉम्फ्रेट आणि अधिक प्रोटिन्स खा, असं मी सांगतो. तसंच, आपण डाएट करतो, तेव्हा मनानं दृढ असावं लागतं- कारण सात-आठ दिवस ती दिनचर्या सांभाळणं खूप अवघड होऊन जातं. डाएट सोडून देण्याची इच्छा होते; पण सुरवातीचे काही दिवस तुम्हाला ते जमलं, तर त्याचा तुमच्या शरीरावर छान परिणाम दिसतो आणि तुमची भूक कमी होते. आयुष्यात तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हीही सकारात्मक असायला हवं. मी शुद्ध शाकाहारी आहे. मी एक वर्षासाठी मांसाहारी होतो; पण आता मी शाकाहारी आहे.

‘चीट मील’ किंवा ‘चीट डे’ पाळतो
‘चीट मील’ किंवा ‘चीट डे’ मी पाळतो; पण असा एक ठराविक दिवस नसतो. मी याआधी सांगितलं त्याप्रमाणं, दोन-तीन महिन्यांच्यावर एकाच डाएट चार्टचं पालन करत नाही आणि त्यानंतर एक महिना थोडा विराम घेतो आणि पुन्हा डाएट सुरू करतो. त्यामुळं त्या मधल्या महिन्याभराच्या काळात आवडणारं सर्व अन्न खातो; पण तरीही खूप जास्त खाणं टाळतो.
मी सकाळी लवकर व्यायाम करतो, कधी-कधी धकाधकीच्या दिनचर्येमुळं मी व्यायामासाठी वेळ काढू शकत नाही, त्यावेळी मी दोन बॉडी पार्टस्
करतो, म्हणजे उदाहरणार्थ सोमवारी मी चेस्ट आणि ट्रायसेप्सचे व्यायाम करतो, मंगळवारी पाठ आणि बायसेप्सचे करतो; बुधवार आणि गुरुवारी पायाचे व्यायाम करतो. अशा रीतीनं संपूर्ण शरीराचा व्यायाम करतो. मात्र, मी मोकळा असतो, तेव्हा मी दररोज एक बॉडी पार्ट करतो. मला जिममध्ये व्यायाम करायला वेळ मिळाला नाही, तर मी घरी १००० स्किपिंग्ज करतो; तसंच स्क्वॅट्‌स आणि सूर्यनमस्कारांना प्राधान्य देतो. मी सातही दिवस व्यायाम करत नाही. ते वेळेवर आणि माझी उपलब्धता यावर अवलंबून असतं. कारण कामामुळं मला जास्त वेळ मिळत नाही. मी आठवड्यातून काही दिवस व्यायाम करतो. जिम, कार्डिओ, योगा यांचा त्यात समावेश आहे
स्वत:ला सर्व नकारात्मक विचारांपासून दूर ठेवणं म्हणजे निरोगीपणा आणि सकारात्मक विचारांवर कार्य करणं हा एक निरोगीपणा आहे आणि जर आपण मानसिक कल्याण प्राप्त केलं, तर आपण आर्थिक कल्याण, शारीरिक कल्याणही प्राप्त करू शकता. त्यासाठी जीवनात सकारात्मक रहा.
कधीकधी मित्रमंडळी, कुटुंब आणि काम सांभाळणं जिकिरीचं होतं. कामामुळं कधीकधी काही महत्त्वाचे दिवस आणि गोष्टी निसटून जातात; पण मला जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा मी जास्तीत जास्त वेळ माझ्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत घालवण्याचा प्रयत्न करतो. माझी आई सुपरस्टार सिंगरची मोठी चाहती आहे आणि ती हा कार्यक्रम कधीच चुकवत नाही. जेव्हा शक्‍य असतं, तेव्हा मी माझ्या आईलाही सेट्‌सवर घेऊन येतो आणि विश्रांतीच्या वेळेत तिच्यासोबत राहतो. तिलाही प्रत्यक्ष परफॉर्मन्सेस बघायला आवडतात.

माझ्या वडिलांचं वय ६३ वर्षं आहे, म्हणून मी व्यायामशाळेत त्याचं कौतुक करतो. ते या वयातही व्यायाम करतात आणि सर्व जिम्नॅस्टिक्स करतात. वडिलांबरोबरच अभिनेता अक्षयकुमारही माझा फिटनेस आयकॉन आहे.
‘लीला- एक पहेली’ या चित्रपटासाठी मी वजन कमी केलं होतं. मी एका संगीत दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती, ज्यासाठी मला वजन कमी करावं लागलं. त्यामुळं मी काही महिने जिममध्ये जायचं बंद केलं. मी व्यायाम सोडला; पण आहाराशी तडजोड केली नाही. तुम्ही जेव्हा व्यायाम करत नाही, तेव्हा तुमचं शरीर शिथिल होतं आणि स्नायू वाढतात.

बाहेरगावीही व्यायामाची सोबत
मी स्वतःसोबत रबर केबल्स घेऊन जातो, न चुकता ते नेहमी माझ्या गाडीत ठेवतो. किंवा प्रदीर्घ आउटडोअर चित्रीकरण असतं, त्यावेळी मी टीआरएक्‍स बेल्ट घेऊन जातो, जो सुटसुटीत असतो आणि त्याच्या मदतीनं सर्व प्रकारचे व्यायाम करता येतात. कारण प्रत्येक वेळी दूर प्रवास करताना तुम्हाला वेट्‌स बरोबर नेता येत नाहीत. त्यामुळं अशा गोष्टी सोबत नेण्यास सुटसुटीत असतात.
सध्या मी ‘तारा फ्रॉम सातारा’ या मालिकेत वरुण माने ही व्यक्तिरेखा साकारत आहे. आपल्या कॉलेजच्या दिवसांपासून वेट ट्रेनिंग करत असलेल्या वरुणनं आता आपलं शरीर पिळदार दिसण्याऐवजी सडपातळ दिसण्यासाठी व्यायामाचा प्रकार बदलला आहे. या मालिकेत मी साताऱ्यामधल्या एका सरळसाध्या मध्यमवर्गीय माणसाची भूमिका साकारत आहे, जो आपल्या कुटुंबातला लहान भाऊ आहे आणि त्यामुळं निर्णय घेण्यात त्याची भूमिका गौण असते. तो आपल्या आईचं, भावाचं आणि पत्नीचं ऐकतो; पण स्वतःचं मतही व्यक्त करतो. ही व्यक्तिरेखा कोण्या दमदार पुरुषाची नाही आणि त्यामुळं मालिकेत त्याचं पीळदार दिसणं अप्रस्तुत वाटलं असतं. त्यासाठी शरीरयष्टी सडपातळ करणं आवश्‍यक होतं. त्यामुळं वजन कमी करण्यासाठी मी कार्डिओ कसरतीकडे वळलो.

अभिनय आणि वैद्यकीय व्यवसायाची सांगड
अभिनयात असलो, तरी मी वैद्यकीय व्यवसायही करतो. दररोज चित्रीकरणानंतर मी क्‍लिनिकमध्ये जातो आणि कधी-कधी रात्रीही तिथंच राहतो. क्षणभरही विश्रांती न घेता तिथून सरळ चित्रीकरणासाठी पोचतो. मला जराही थकवा जाणवत नाही. माझ्यासाठी ही दोन्ही क्षेत्रं म्हणजे व्यवसाय नाही, तर पॅशन आहे आणि दोन्हींपासून मी लांब राहूच शकत नाही.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com