
एज्युकॉर्नर : रोबोटिक्समध्ये दडलीत भविष्याची बीजे!
लेखक : के. एस. आजाद
रोबोट एक प्रकारची मशिन आहे. जी खासकरून कॉम्प्युटरद्वारा दिलेल्या प्रोग्रामच्या नियमानुसार काम करते. रोबोट अनेक अवघड कामे सोपे करण्यास सक्षम असतो. रोबोट हा मेकॅनिकल, सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या मिश्रणाने मिळून बनलेला असतो. यामध्ये सर्वांचं योगदान सारखंच असतं.
मनुष्य प्राण्याचा जन्म पृथ्वीवर झाल्यापासून त्याचे रूप व स्वरूप टप्प्याटप्प्याने काळानुसार बदलत गेले. जेथे सूर्याचे किरणही पोचू शकत नाही अशा घनदाट जंगलामध्ये अनेक वर्ष वास्तव्यास असलेला मानवाने आता त्याची झेप अंतराळातसुद्धा घेतली आहे.
याचे कारण फक्त त्याच्या बुद्धी व कौशल्याच्या जोरावर व आलेल्या परिस्थितीशी समरूप होऊन पृथ्वीतलावरची सर्वांत हुशार व चाणाक्ष जमात असा मानवाचा उल्लेख केला, तर वावगे ठरणार नाही. काळानुसार बदलल्यानंतर मानवाने नवनवीन संकल्पना शोधल्या, रुजवल्या व इतरांपर्यंतही पोचवल्या.
तंत्रज्ञान जसं टप्प्याटप्प्याने स्वीकारलं तसं भविष्यात त्याला त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने अद्ययावतही केले. नवनवीन मशिनच्या माध्यमातून अनेक काम सोपे झाले. यात संगणक म्हणजेच कॉम्प्युटरचा फार मोठा वाटा आहे. या संशोधनाच्या वृत्तीमुळे मानवासारखे काम करणारा, दिलेल्या आज्ञा पाळणारा असा रोबोट मानवाने तयार केला व प्रतिमनुष्य म्हणून त्याच्याकडून सर्व प्रकारची कामे अत्यंत सहज व सुलभपणे होऊ लागली.
रोबोट या विषयावर अनेक संशोधन झाले, आताही होत आहे; पण आता सध्या रोबोटिक्स हा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची कवाडे उघडणारा व भविष्यात रोजगाराच्या नोकरीच्या आपल्या करिअरमधील अमर्याद संधी उपलब्ध असणारा हा विषय आहे. शालेय जीवनातच जर यामध्ये ज्ञान मिळविले तर भविष्यात आपल्याला यश मिळविण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
आज पाहायला गेले तर प्रत्येक विद्यार्थी आपल्या करिअरच्या बाबतीत अत्यंत चिंतित असताना आपणास दिसून येते. आता एकविसावे शतक लागले आहे. ज्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती होताना आपल्याला दिवसेंदिवस पाहायला मिळते आहे.
रोबोट एक प्रकारची मशिन आहे. जी खासकरून कॉम्प्युटरद्वारा दिलेल्या प्रोग्रामच्या नियमानुसार काम करते. रोबोट अनेक अवघड कामे सोपे करण्यास सक्षम असतो. रोबोट हा मेकॅनिकल, सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या मिश्रणाने मिळून बनलेला असतो. यामध्ये सर्वांचं योगदान सारखंच असतं.
वास्तविक रूपात सर्वांत पहिला रोबोट बनविण्याचं श्रेय स्पेरी जायरोस्कोप यांना दिलं जातं. त्यांनी १९१३ मध्ये हा रोबोट बनवला होता. परंतु १९३२ मध्ये त्यांनी तो लंडनमधील रेडिओवरून लोकांसमोर आणला. सर्वांत पहिल्यांदा १९८० मध्ये एका मोटारकार कंपनीने २०० मजुरांना कामावरून काढून ५० रोबोटला कामावर ठेवले होते.
रोबोट लोकांना खूपच आवडला. पूमा नावाचा हा रोबोट कारखान्यातील मशिनचे स्क्रू काढण्यासाठी वापरला जात होता. रोबोट अशाप्रकारे तयारा केला जातो, की एकापेक्षा जास्त कामे समान गतीने आणि एकदम बरोबर करेल.
काही रोबोटला नियंत्रित करण्यासाठी एक्स्टर्नल कंट्रोल डिवाइसचा वापर केला जातो. परंतु जास्त प्रमाणात रोबोटला नियंत्रित करण्यासाठी रोबोटमध्येच कंट्रोल डिवाइस वापरले जातात. रोबोटचा आकार आणि साईज यांचं काही देणंघेणं नसतं. जो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतो त्यालाच रोबोट म्हटले जाते, ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. रोबोट हा कोणत्याही रूपात असू शकतो. जास्त करून ते त्या कामावरून ठरवले जाते.
समजा, एखादी ऑटोमोबाईल कंपनी आहे. जेथे दोनचाकी आणि चारचाकी वाहनांचे बॉडी पार्ट बनविले जातात. यामध्ये छोट्या आणि मोठ्या पार्टसला वेल्डिंग करून जी वस्तू समोर येते त्याला कार म्हणतात. ती काही छोट्या आणि मोठ्या पार्टसनी बनलेली असते. या छोट्या आणि मोठ्या पार्टसला जोडायच काम रोबो करतो.
आजकालच्या जगात माणसांपेक्षा जास्त काम मशिन्स किंवा रोबोट करतात. कंपन्यांमध्येही मशिन्सच्या माध्यमातूनच सर्वाधिक काम केलं जातं. त्यामुळे आता शिक्षण क्षेत्रात रोबोटिक्सला एज्युकेशनला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. अनेक विद्यार्थ्यांना रोबोटिक्स म्हणजे काय? हे तर माहिती आहे, पण यामधील करिअरच्या संधींबाबत माहिती नाही.
रोबोटिक्स इंजिनिअरिंग म्हणजे काय?
कर्मचाऱ्यांची कामं सोपी करण्यासाठी आजकाल काही कामं रोबोट्सकडून करून घेतली जातात. त्यासाठी एकाच वेळी अनेक काम करणाऱ्या रोबोट्सची गरज असते.
असे काही रोबोट्स बनविण्याच्या शिक्षणाला रोबोटिक्स इंजिनिअरिंग म्हणतात. कृत्रिम तंत्रज्ञानाने मानवापेक्षाही अधिक काम करण्याची शक्ती रोबोंना प्राप्त होत आहे. या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर विविध क्षेत्रांत सुरू झाला असून, त्यात नवनवे संशोधन सुरू आहे.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन त्यांच्याशी समन्वय आणि संपर्क साधण्याचे कौशल्य रोबोंना प्राप्त करून देण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. हैदराबादस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने गेल्या वर्षी स्नेक रोबोटची निर्मिती केली.
विविध प्रकारच्या संकटसमयी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी हा स्नेक रोबोट उपयुक्त ठरू शकतो. विशेषतः ढिगाऱ्याखाली सापडलेल्या आपद्ग्रस्तांची अचूक स्थाननिश्चिती करण्याची क्षमता या रोबोंमध्ये आहे. अंतराळातील संशोधन मोहिमांना मिळालेल्या यशात विविध प्रकारच्या रोबोंचा मोठा हातभार आहे.
अंतराळातील नव्या विश्वाच्या शोधापासून नव्या विश्वातील वसाहतीच्या निर्मितीमध्ये या रोबोंची कामगिरी अनन्यसाधारण राहणार आहे. आण्विक संशोधन, सागरतळांचा शोध, विविध प्रकारच्या खाणींच्या शोध, तसेच ज्या ठिकाणी मानवी जीवन धोक्यात येऊ शकते, अशा ठिकाणी सहज वावर करण्यासाठी रोबोंचा उपयोग केला जात आहे.
रोबो तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता भविष्यात रोबोटिक्स इंजिनिअरिंग या ज्ञानशाखेसही महत्त्व प्राप्त होणार आहे. रोबोटिक्स इंजिनिअर हे रोबोटिक्स क्षेत्रातील संशोधन, नवे डिझाइन, रोबोंची निर्मिती, देखभाल, दुरुस्ती, रोबोसाठी आवश्यक अशा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता नियंत्रण, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो-प्रोसेसिंग यांसारख्या क्षेत्रात कार्यरत राहू शकतात.
रोबोटिक इंजिनिअरिंग ही आंतरज्ञानशाखा आहे. यांत्रिकी अभियांत्रिकी, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी यामध्ये या शाखेचा समावेश होतो. रोबोटिक्स अभियंत्यांना विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळू शकते.
यामध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, फार्मसी, स्पेस रिसर्च, नॅनो तंत्रज्ञान अशा काही क्षेत्रांचा उल्लेख करता येईल. पदवीनंतर करिअरच्या संधी उपलब्ध होत असल्या तरी या क्षेत्रात स्पेशलायझेशन केल्यास उत्तमोत्तम आणि दर्जेदार करिअर संधी मिळू शकतात.
स्पेशलायझेशनमध्ये मशिन ऑटोमेशन, मेडिकल रोबोटिक्स, सायबरमेटिक्स, एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट अशा काही क्षेत्रांचा ठळकपणे उल्लेख करता येईल. काही पाश्चिमात्य देशांतील कृषी क्षेत्रातही रोबोतंत्रज्ञानावर आधारित विविध यंत्रसामग्रीच्या वापरात सतत वाढ होत आहे. काही मोठ्या क्षेत्रांचे संपूर्ण नियंत्रण रोबोटकडेच सोपल्याचेही दिसून येते.
नाशिक रोडला प्रशिक्षण केंद्र
आमची नाशिक रोड येथे फ्रेंड्स कॉम्प्युटर ॲकॅडमी आहे. ही अनेक वर्षांपासून आहे. सुरवातीच्या काळात जेव्हा कॉम्प्युटर नवीन आले त्या वेळेपासून आम्ही कॉम्प्युटरचे ट्रेनिंग देत आहे.
आम्हाला आयटीचा बॅकग्राउंड असल्यामुळे स्कूल मॅनेजमेंटमध्ये आयटी या विषयाचा खूप फायदा झाला आणि इतरांच्या तुलनेमध्ये आम्ही या क्षेत्रात अपडेट अधिक राहिलो. त्यामुळेच आमचे विद्यार्थीही रोबोटिक्स या विषयात विशेष प्राविण्य मिळवतील, यात शंका नाही.