दृष्टिकोन : ई-बँकिंग व ऑनलाईन व्यवहारांत हवी सजगता

Rajaram Pangavane Patil
Rajaram Pangavane Patilesakal

राजाराम पानगव्हाणे-पाटील

इ-बँकिंग म्हणजे “इलेक्ट्रॉनिक बँकिंग" होय. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून केला जाणारा बँक व्यवसाय म्हणजे इ-बँकिंग म्हटला जातो. जेव्हा बँक सेवा पुरवण्याच्या व्यवस्थेत माहिती तंत्रज्ञानाची अत्याधुनिक साधने वापरली जातात, तेव्हा त्यास इ-बँकिंग असे म्हणतात.

खात्याची चौकशी करणे, पैसे भरणे, पैसे काढणे, रकमेचे हस्तांतरण करणे यासारखे व्यवहार इ-बँकिंगमुळे तत्परतेने पार पडतात. इ-बँकिंगमुळे प्रत्येक वेळी ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज पडत नाही. कॉम्प्युटर अथवा मोबाईलद्वारे ग्राहक घरातून किंवा कचेरीतून व्यवहार करू शकतात. (saptarang latest marathi article drushtikon on banking sector by rajaram pangavane nashik news)

Rajaram Pangavane Patil
भैरप्पा एक जिवंत आख्यायिका!

थोडक्यात, इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी तुमचे ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेचे सर्व पुरावे, कागदपत्र घेऊन जावे. तेथील बँक अधिकारी यांना इंटरनेट बँक व्यवहाराविषयी चर्चा करून ते फॉर्म भरून घेतील त्या नंतर १० ते १५ दिवसांनी तुम्हाला पोस्टाद्वारे बँक खात्याचा आयडी, पासवर्ड व रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी कोड इ. माहिती पाठवली जाते. आलेले कोड व पासवर्डने तुम्ही तुमच्या बँक खात्यात प्रवेश केल्यानंतर तुम्ही स्वतः पासवर्ड बदलून घेणे संयुक्तिक ठरते. 

बऱ्याच बँका त्यांच्या इंटरनेट आणि टेलिफोन सेवेसाठी ठराविक मासिक रक्कम आकारतात. बँकेच्या इतर व्यवहारांसाठीही तुमच्याकडून पैसे घेतले जातात, जरी ते एटीएम आणि बँकेच्या मानाने कमी असतात.

 पैशांच्या दळणवळणावर होणारा खर्च एटीएममुळे कमी होतो. वेळेत बिल भरल्यामुळे तुम्ही तुमचा वेळ आणि विलंबाची फी जी तुम्ही याआधी वेळेअभावी देत होता, ती अर्थातच तुम्ही वाचवू शकता.

इतर बँका त्यांच्या सेवेसाठी किती पैसे आकारतात ते पाहा. त्यांची इंटरनेट फी कमी असेल तर यांचे इतर आकारणीही कमी आहे का ते पहा. जर तशा सोयी असतील तर या नव्या बँकेत तुम्ही खाते उघडू शकता.

तुम्ही बँकेकडून आठवड्यातून एकदा किंवा त्याहीपेक्षा कमी वेळा स्टेटमेंट मागून आकारणी आणखी कमी करू शकता. यामुळे तुमच्या खात्यात तुमची बिलं भरण्यासाठी पुरेसे पैसे आहेत, हे तुम्हाला कळेल.

मात्र ही बिलं अधिक असतील तर तुम्हाला बँकेलाही अधिक पैसे द्यावे लागतील. तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे आहेत, त्याचप्रमाणे काही त्याची तोटे देखील आहेत. तोटे म्हणजे आपण आपल्या निष्काळजीपणामुळे केलेले आपले नुकसान होय. त्यासाठी सजग राहणे हाच एकमेव पर्याय होय.

आज आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, की अनेक लोक आमची ऑनलाइन फसवणूक झाली अशी तक्रार करत असतात. तर या ऑनलाइन लुटीला बळी न पडणे ही देखील आर्थिक साक्षरताच आहे.

मी देखील माझे मित्र, सहकारी यांना डिजिटल फसवणुकीपासून वाचवले देखील आहे. डिजिटल मीडियावर फसवणूक कशी होते आणि आपण कसे फसतो, ते समजून घेणं गरजेचे आहे. 

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Rajaram Pangavane Patil
मुलं फुलताना !

१) लॉटरी लागल्याचा मेसेज                                 

२) फेसबुकवरील बनावट वाहन विक्रीच्या माध्यमातून होणारी फसवणूक  

३) एटीएम कार्ड ब्लॉक

४) ऑनलाईन वस्तूंची मागणी               

५) एटीएम क्लोनिंग 

६) क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होनारी फसवणूक       

७) खोटे फोन नंबर 

८) ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक 

९) फोनच्या माध्यमातून

१०) विविध लिंकच्या माध्यमातून                          

ऑनलाइन फसवणूक होऊ नये यासाठी हे करा  

१) पब्लिक वायफाय वापरू नका ः आपली ऑनलाइन किंवा डिजिटल माध्यमातून फसवणूक होऊ नये, यासाठी बँकेचे व्यवहार वगैरे करत असताना खासकरुन नेट बँकिंग करत असताना सार्वजनिक इंटरनेट किंवा वाय-फाय व्यवस्था यांचा वापर करू नका. 

२) वैयक्तिक माहिती: आपल्याला येणारा फोन कोणताही असो, त्यावेळी आपण आपले नाव, जन्मतारीख, इ-मेल  यासारख्या बाबी कधीच शेअर करू नयेत. 

३) पासवर्ड अद्ययावत करणे: अनेक लोक आपला पासवर्ड हा वर्षानुवर्षे तोच ठेवत असतात .परंतु असे न करता महिन्या-दोन महिन्यांतून आपला पासवर्ड बदलत राहिले पाहिजे. 

४) वैयक्तिक माहितीची गोपनीयता ः यामध्ये आपले संपूर्ण नाव जन्मतारीख, आधार कार्ड क्रमांक, मेल आयडी, नेट बँकिंग, लॉगीन आयडी, क्रेडिट किंवा डेबिट कार्डमधील सीसीव्ही नंबर यासारख्या बाबी कधीच कोणाला शेअर करू नयेत. 

Rajaram Pangavane Patil
परंपरागत धान्ये गेली कुठे ?

५) सखोल चौकशी: एखादी वस्तू खरेदी करत असताना तिच्याविषयी सखोल चौकशी करावी ती वस्तू ऑनलाइन घेत आहोत. तेच ऑफलाइन हवे आहे, अशी मागणी करून क्रॉसचेक करावे. मग खात्री पटल्यास ती वस्तू ऑनलाईन मागवावी. 

६) गुगल सर्च हिस्ट्री ः आपण गुगलवर काय शोधत आहोत काय सर्च केले आहे याची हिस्ट्री असते किंवा आपण फोनमध्ये ज्या ॲपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते ॲप तसेच ऍक्टिव्हेट ठेवतो तर असे करू नये. 

७) संबंधित खाते ब्लॉक करणे: आपल्या खात्यामध्ये काही चुकीचे व्यवहार सुरू असल्याचे वाटल्यास मग ते बँकेच्या क्रेडिट कार्डचे असो की डेबिट कार्डचे ते बंद करावे. बँकेला किंवा Custmer Care ला मेल व फोन करून आपले खाते बंद किंवा ब्लॉक करता येते. 

 ८) सायबर क्राईमला तक्रार करा: डिजिटल अथवा ऑनलाईन फसवून झाल्यास तातडीने सायबर क्राईमकडे तक्रार नोंदवावी. या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाते.

९) फोनची सेवा ः कधी कधी काही तोतया आपला नंबर कस्टमर केअरला कळवून तो बंद करतात व त्याच नंबरचे कार्ड वाममार्गाने मिळवतात. मात्र आपल्याला कोणत्या प्रकारचा मेसेज वगैरे येत नाही. फोन हरवल्यास तात्काळ तक्रार करावी.

१०) कागदपत्र: आपली ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर तपासाला तात्काळ दिशा मिळावी, यासाठी ॲपच्या माध्यमातून फसवणूक झाली असेल तर त्या app चे नाव, जी फसवणूक झाली त्याची स्क्रीन शॉट, नेट बँकिंगच्या माध्यमातून झाले असेल तर आपल्या पासबुकवर एन्ट्री खाते क्रमांक किती तारखेला ही घटना घडली या संबंधित सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. 

अशा प्रकारे आजच्या लेखातून डिजिटल मीडियातून म्हणजे ऑनलाइन व्यवहार करता असताना या चुका होतात व त्याचे खूप मोठे परिणाम आपल्याला आर्थिक वर्तणुकीवर होतो. टेलिफोन, संगणक, इंटरनेट, एप्स, मेसेजेस अशा सगळ्याच माध्यमातून होणारी फसवणूक सजगतेने टाळायला हवी.

या डिजिटल लुटीला या लेखामुळे थोडाजरी अटकाव झाला तरी फायदाच आहे. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर यासाठी उपाययोजना करायला हवी. ऑनलाईन फसवणुकीचे अजून काही नवे प्रकार आपल्याला माहीत असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरुन आर्थिक साक्षरतेच्या चळवळीत ते मुद्दे देखील समाविष्ट करून घेतले जातील.

केवळ पैशाने पैसा केवळ वाढवणे म्हणजे आर्थिक साक्षरता नव्हे तर आपल्याकडील पै नी पै सुरक्षित ठेवणे म्हणजे देखील आर्थिक जाणतेपण आहे, हे समजणे गरजेचे आहे. 

(लेखक ब्रम्हा व्हॅली ग्रृप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष आहेत.)

Rajaram Pangavane Patil
प्रयोजनवादाची नवी पायाभरणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com