दृष्टीकोन | सहकार : विकासाचा बनला कणा

saptarang article
saptarang articleesakal

लेखक : राजाराम पानगव्हाणे

महाराष्ट्रातील सहकारी चळवळ हा लोकांच्या पुढाकाराचा प्रत्यय आहे. त्यांना संघटित करून भांडवल उभारून आर्थिक व सामाजिक कार्य एकत्रितरित्या करण्याचा प्रयत्न राहिला. त्यामुळे उत्पन्नाचा दारात वाढ होऊन रोजगाराची निर्मिती झाली.

याचळवळीमुळे शेती, दूध, मत्स्य व्यवसाय, कृषी प्रक्रिया साठवणूक विक्री पणन पतपुरवठा बँकिंग गृहनिर्माण या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली. सहकार चळवळ एक प्रकारे महाराष्ट्राचा ग्रामीण विकासाचा कणाच बनला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. (saptarang latest marathi article on Cooperation backbone of development by rajaram pangavane nashik news)

saptarang article
‘गुण’कारी परसबाग : आपले ‘ऑक्सिपार्क’ आपल्या दारी

भारतातही सहकार चळवळ झपाट्याने वाढली. फेडरिक निकोलसन यांनी १८९२ मध्ये ग्रामीण व शहरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याची शिफारस केली. एडवर लॉक यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या दुष्काळ विषयक आयोगाने १९०१ मध्ये कृषी पतसंस्था स्थापन करण्याचे सुचविले आणि खऱ्या अर्थाने १९०४ मध्ये सहकारी पतपुरवठा पतसंस्था कायदा अस्तित्वात आला.

१९१२ मध्ये सहकारी संस्था कायदा तयार करण्यात आला. अशा तऱ्हेने सहकार क्षेत्राची भारतातमध्ये मूहर्तपेढ रोवली गेली. याच दरम्यान महाराष्ट्रातही ही चळवळ सुरू होण्यास सुरुवात झाली होती. १९१० ला प्राथमिक कृषी पतसंस्थेची स्थापना झाली व महाराष्ट्रात १९५० मध्ये प्रवरानगर येथे पहिला सहकारी तत्त्वावरचा साखर कारखाना उभारला गेला.

भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना होता. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा करण्यात आला. सहकार क्षेत्रात त्यानंतर महाराष्ट्राने देशासाठी दिलेले योगदान हे अत्यंत लक्षणीय आहे. सावकारशाहीच्या शोषण व्यवस्थेतून शेतकऱ्याला सोडवण्याचे कार्य या क्षेत्राने केले. समृद्धीकडे जाण्याचा सहकार हा चांगला मार्ग आहे.

saptarang article
गृहिणी नव्हेच, मी गृहस्वामिनी!

एक पर्याय आहे म्हणून तो आजही टिकून आहे. भारतातील सहकारी चळवळ ही जगभर वाखाणली गेली. या चळवळीला बळ आणि गती देण्याचे काम खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने केले. स्वातंत्र्यपूर्वक सुरू झालेल्या काळात या चळवळीला पंडित नेहरू व यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे राज्यश्रय मिळाला. सावकारशाहीच्या शोषण व्यवस्थेला पर्याय म्हणून सुरुवातीला या काळात कृषी पतपुरवठ्यापूर्ती मर्यादित असलेली ही चळवळ पुढे विस्तारात गेली.

नंतर साखर कारखाने, शेतीमाल प्रक्रिया, पणन, ग्रामीण उद्योग, ग्राहक भंडारे आदी सारख्या क्षेत्रात वेगाने पसरली. यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडले. महाराष्ट्र हा सहकाराच्या जाळ्यात विणला गेला. इतर क्षेत्रांबरोबरच उत्पादन, उपसा, जलसिंचन, पाणीपुरवठा, वाहतूक, सामाजिक आधी विविध क्षेत्रात सहकार पोहोचले.

सहकार क्षेत्र हे सर्वस्पर्शी झाले यावरून स्पष्ट होते. गावागावातल्या सहकारी संस्था ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनल्या आहे. गुणदोषाच्या आधारावर सहकार चळवळीला तोडण्याचा प्रयत्न केले गेले. तरी सामाजिक न्याय आणि बांधिलकीमुळे तिचे वजन कमी झालेले नाही. महाराष्ट्रातील सहकारी चळवळ हा लोकांच्या पुढाकाराचा प्रत्यय आहे.

त्यांना संघटित करून भांडवल उभारून आर्थिक व सामाजिक कार्य एकत्रितरित्या करण्याचा प्रयत्न राहिला. त्यामुळे उत्पन्नाचा दारात वाढ होऊन रोजगाराची निर्मिती झाली. याचळवळीमुळे शेती, दूध, मत्स्य व्यवसाय, कृषी प्रक्रिया साठवणूक विक्री पणन पतपुरवठा बँकिंग गृहनिर्माण या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली. सहकार चळवळ एक प्रकारे महाराष्ट्राचा ग्रामीण विकासाचा कणाच झाला,असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

saptarang article
प्रेरणादायी जीवनकथा

इतर कोणत्याही पतपुरवठा करणाऱ्या संस्थांपेक्षा गावकऱ्यांना सहकारी संस्था ही आपली वाटते. शेतीच्या बाबतीत खाजगी व राष्ट्र राष्ट्रीयकृत व्यापारी बँकांच्या दिसून आलेल्या उदासीनतेच्या भूमीवर सहकारी पत यंत्रणेचे हे मोठे यश आहे. निसर्गाची साथ मिळाली शेतमालाला योग्य भाव पदरात पडला तरच या संस्था कार्यक्षमपणे चालू शकतात हेच दोन घटक सहकारी पतसंस्थेच्या वाटचालीतील गतिरोधक आहे.

मात्र याही परिस्थितीत शेतकऱ्यांना अनेक वेळा कर्ज देण्याच्या बांधिलकी या संस्था जपतात.कधीकधी तोटाही होतो.पण आजही एक घरातली घरातील घटक कुटुंबातील व्यक्ती म्हणून सहकार संस्थांकडे बघितले जाते हे चित्र आज बदललेल्या आणि तंत्रज्ञानाचे युगात सुद्धा आजही कायम आहे. हेच सहकार चळवळीचे यश आहे,असे म्हणायला हरकत नाही.

इतर व्यवस्थाप्रमाणे सहकारातही काही दोष आले आहेत मात्र त्या दोषांकडे बोट दाखवत सरकारला बदनाम करणे योग्य नाही.दोष दूर करून सहकाराला समर्थ करणे हिताचे आहे.आत्मपरीक्षण आचारसंहिता बदल सुधारणा हे घटक प्रत्येक क्षेत्रात आता अटळ आहे.महाराष्ट्रात त्यात मागे राहिलेला नाही.सहकार चळवळ ही कायम सुदृढ होत राहील.

saptarang article
लोकशाहीची रुजवणूक

नाशिक जिल्ह्यातही सहकार संस्था गतीने वाढत असताना काकासाहेब वाघ, बाळासाहेब वाघ माधवराव बोरस्ते यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने सहकार क्षेत्रात मध्ये प्रवेश केला मूळचा शेतकरी असल्यामुळे सहकार संस्थांशी माझा संबंध होताच स्वतः त्यामध्ये पूर्ण वेळ देऊन शेतकऱ्यांच्या व आपल्या ग्रामस्थांच्या विकासासाठी मी या क्षेत्रात पूर्ण वेळ काम करण्याचे ठरविले व यातून आपण आपल्या बरोबरील सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी सहकार क्षेत्र हे अतिशय योग्य होते व आजही आहे.

याच माध्यमातून माझी सार्वजनिक जीवनाची वाटचाल सुरू झाली व त्यात यश मिळाले याचे मुख्य कारण म्हणजे सहकार क्षेत्रातील माझी करिअरची सुरुवात झाली.त्यातून मिळालेला लोकसंग्रह कुणाचीही छोटे मोठे काम करण्याचा माझा स्वभाव यामुळे लोकांचे प्रेमही माझ्यावर अधिकाधिक वाढले. माझ्या प्रवासातील प्रत्येक क्षणाला माझ्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांची संख्या ही कायम वाढत गेली.

saptarang article
पेले आणि पंचम!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com