सह्याद्रीचा माथा : उन्हाळा खडतर आहे, प्रत्येकाने जिवाला जपा!

summer
summeresakal

यंदाचा उन्हाळा अतिशय प्रखर असणार आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून तापमान ४५ अंशाच्या घरात पोचले आहे. उष्म्याची ही लाट महिनाअखेरपर्यंत कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

उन्हाच्या वाढत्या चटक्यांनी जनजीवन प्रभावित होतेच, पण उष्माघाताच्या तडाख्याने मानवी जीवनाची हानी होऊ नये, यासाठी प्रत्येकाने किमान काळजी घेणे गरजेचे आहे. शहरी आणि ग्रामीण भागात या काळात गरज असेल तरच बाहेर पडा.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी तर सकाळी नऊपासून सायंकाळी पाचपर्यंत घरातच थांबावे, असा सल्ला वैद्यकीयतज्ज्ञांनी दिला आहे. काळ अतिशय खडतर आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जिवाला जपले पाहिजे. (saptarang latest marathi article sahyadricha matha by dr rahul ranalkar on summer nashik news)

summer
Summer Skin Care: चेहऱ्याला लावा हा फ्रूट ज्यूस आणि पहा कमाल; २ आठवड्यात Wrinkles होतील गायब, चेहरा दिसेल तरुण

कधीकाळी थंड हवेची ठिकाणे म्हणून ओळखले जाणारे नाशिक, इगतपुरी, पाल (रावेर) ही उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे यंदाच्या उन्हाळ्यात मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ४५ अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करत आहेत.

निसर्गाच्या बदललेल्या चक्राने सर्व ऋतूमानच बदलल्याचा अनुभव सध्या आपण घेत आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत गारपीट आणि वादळी पाऊस झाल्याने यंदा एप्रिलमध्ये दिवसा थंडीचा अनुभवही आला.

त्यामुळे यंदाचा उन्हाळा तेवढा हीट नसेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र मे महिना उजाडताच सूर्यदेवाने आग ओकायला सुरवात केली आहे. तिचा वेग इतका आहे, की अवघ्या आठवड्यात खानदेशाचे तापमान ४५ अंश, तर नाशिकचे ४० ते ४२ अंशांवर पोचले आहे.

जळगावने तर ही सीमारेषाही ओलांडली असून, तेथे बुधवार (ता. १०), गुरुवार (ता. ११), शुक्रवार (ता. १२) असे सलग तीन दिवस पारा ४५ अंशांपेक्षा वरच राहिला आहे. बुधवारी तर ४७.५ अंश एवढे त्या दिवशीचे देशातील सर्वाधिक तापमान नोंदविले गेले आहे.

वाढलेल्या या तापमानाचे जीवसृष्टीवर अनेक परिणाम होणार आहेत. उष्माघाताचा झटका आणि त्यातून लागलीच जीव जाणे, अशा घटना घडायला सुरवात झाली आहे. वाढलेले ऊन आणि तापमान आपल्या जिवावर बेतू शकते, हे सर्वप्रथम सर्वांनी ध्यानात घ्यायला हवे.

त्यासाठी प्रत्येकाने किमान काळजी घ्यावी, असे वैद्यकीयतज्ज्ञ सांगत आहेत. जळगाव आणि नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांत उष्माघातसदृश आजाराने तिघांचे बळी गेले आहेत. ऊन दिवसागणिक वाढत आहे.

त्याहूनही यंदाचे अधिक प्रखर, वेदनादायी आहे, हे प्रत्येकाने लक्षात घेत त्यापासून बचावासाठी काळजी घेणे आवश्‍यक बनले आहे. ‘चलता है, आम्ही दरवर्षीच उन्हाचा सामना करतो’, हा फाजील आत्मविश्‍वास बाळगू नये, असे नम्रपणे प्रत्येकाला सांगावेसे वाटते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

summer
Summer Fashion Tips: उन्हाळ्यात स्टायलिश दिसायचंय! मग रोजच्या रुटीनमध्ये करा हे 4 बदल

...असा होतो थेट परिणाम

आपला देश हा उष्ण कटीबंधातला. मानवी शरीराचे तापमान सर्वसाधारण ३६ ते ३७ डिग्री असते. बदलत्या वातावरणात सध्याचे तापमान चाळीस अंशांपेक्षा जास्त चालले आहे. या कडक उन्हामुळे आपल्या शरीराचेही तापमान वाढते, त्यामुळे शरीरावर मोठा परिणाम होतो.

रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. शरीरातील पाण्याची पातळी एकदम कमी होते. यामुळे शरीराला घाम सुटतो. शरीरातील पाणी कमी होऊन मेंदू, हृदय आणि शरीरामध्ये रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे चक्कर येऊ शकते. व्यक्ती बेशुद्ध पडू शकते.

अशावेळी जर व्यक्तीला पाणी मिळाले नाही, तर झटका येऊन ती कोमामध्येही जाऊ शकते. यातून मृत्यूही ओढवू शकतो, हे प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवे. त्यामुळे शक्यतो उन्हात जाण्याचे प्रत्येकाने टाळावे. या काळात शरीराची मोठी आंतरिक झीज होते. ती भरून काढण्यासाठी इलेक्टरल पावडर पाण्यात मिसळून ते कायम जवळ ठेवावे.

शेतकरी बांधवांनो, कांदा जवळ ठेवाच

मे महिना असला तरी ग्रामीण भागात शेतीची कामे सुरूच असतात. त्यामुळे अनेकजण भरउन्हातही बाहेर पडतात. गरज असेल तरच बाहेर पडा, असा सल्ला दिला जात असला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

मात्र गरजेचे असेल तर एक खबरदारी घ्यावी, ती म्हणजे घरातून बाहेर पडताना शक्यतो पांढरे किंवा सुती कपडे घाला. आपल्या खिशात साल काढलेला कांदा ठेवा, त्यामुळे उष्णतेचा आपल्याला काहीही त्रास होणार नाही.

आपण दिवसभर कांदा खिशात ठेवला तर उन्हाची तिडीकही कमी होते. दिवसभर तुम्ही तुमचे काम करू शकता. सायंकाळी हा कांदा पाहाल तर तो संपूर्ण सुकून गेलेला असतो. यामागे काय शास्रीय कारण आहे, हे माहिती नाही; परंतु यामुळे तुम्हाला आराम वाटेल. कांदा हा सर्व उष्णता शोषून घेत असल्याने ग्रामीण भागात त्याचा वापर केला जातो.

काही महत्त्वाच्या आरोग्यदायी टिप्स

- पुरेसे पाणी प्यावे, तसेच ताक, लिंबू-पाणीवर भर द्यावा.
- दिवसभरात तीन लिटरपेक्षा जास्त पाणी पिणे आवश्यक.
- पांढरे, सौम्य रंगाचे सैल कपडे घाला. पांढरी टोपी, फडके बांधा.
- बाहेरील कामे सकाळी दहाच्या आत करा.
- चहा, कॉफी शक्यतो टाळाच.
- भरदुपारी गॅस किंवा चुलीसमोर स्वयंपाक करणे टाळा.
- शक्यतो रात्रीचे शिळे अन्न खाणे टाळावे.
- सध्या मुलांना दुपारी खेळायला जाऊ देणे थांबवा.

summer
Summer Drink: साधं नारळपाणी पिऊन कंटाळलात मग हे स्पेशल हेल्दी ड्रिंक नक्की ट्राय करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com