दृष्टिकोन : ठिबक सिंचन ठरले शेतीसाठी वरदान

ठिबक सिंचन
ठिबक सिंचन

लेखक : राजाराम पानगव्हाणे

पाणी ही मानवाला निसर्गाकडून मिळालेली सर्वांत मोठी देणगी आहे. या संपत्तीचा वापर योग्य रीतीने झाला पाहिजे. निसर्गाकडून जरी नियमितपणे पाणी मिळत असले तरी त्यासाठी वापराचे काही प्रमाण निश्चित करायला हवे.

लहरी निसर्गामुळे पाण्याच्या बऱ्याच मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. पाण्याची गरज ही मनुष्य जीवनास निरंतर आहे. पाण्याचा योग्य रीतीने वापर झाला तर पाणीबचत साधून मानवाला योग्यरितीने जीवन जगता येऊ शकते.

प्रामुख्याने शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन देताना त्यात काटकसर कशी करायची यासाठी अनेक प्रयोग झाले आहेत. (Saptarang latest marathi articles by rajaram pangavhane on Drip irrigation been boon for agriculture nashik news)

ठिबक सिंचन
डायवर-कंडक्टर
Bhavarlal jain
Bhavarlal jainesakal

पाण्याची बचत करणाऱ्या अनेक पर्यायांमध्ये सर्वदूर व सर्वमान्य असलेली जागतिक पातळीवरील ठिबक सिंचन पद्धत सध्या प्रचलित आहे. ही देणगी जगाला इस्त्राईल देशाकडून मिळाली. शेती म्हटली, की पाण्याची गरज ही प्राथमिक गरज म्हणून ओळखली जाते.

उपलब्ध पाण्याचा वापर योग्य पद्धतीने शेतीसाठी करून घेता यावा, यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. पाणी बचतीच्या संकल्पनेतूनच जन्म झाला सूक्ष्म सिंचन पद्धतीचा. या सूक्ष्म संचन पद्धतीला ठिबक सिंचन पद्धती म्हणतात. ही पद्धती आता आधुनिक शेतीचाही अविभाज्य घटक बनली आहे.

ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. ही वापरताना जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकांचे स्वरूप, बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षात घेऊन नंतर त्यांच्या गरजेनुसार पॉलिथीनच्या नळ्यांचे जाळे पसरले जाते.

ठिबक सिंचनाचा शोध इस्राईलमधील तज्ज्ञ शिम्सा ब्लास यांनी लावला. या पद्धतीत जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने अथवा सूक्ष्म धारेने दिले जाते.

ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी जमिनीच्या निरनिराळ्या प्रकारच्या जलधारणा शक्ती, वाफसा, तसेच पाणी जिरण्याचा व जमिनीच्या पोकळीतून वाहण्याचा वेग या भौतिक गुणधर्माचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते.

ठिबक सिंचन
मनसंवेदन

इस्त्राईल जगाचा नकाशा जरी एखाद्याच्या हातात दिला, तरी त्याला हा देश अचूकपणे टिपता येणार नाही. त्याचे कारण म्हणजे हा देश मुळातच लहान आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने बघायचे म्हटले तर जवळपास एक कोटीच्या आसपास असणारी लोकसंख्या.

पण आपल्या दीडशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात शेती संबंधित असलेल्या प्रत्येकाला इस्त्राईलची शेती माहित आहे. आपल्या देशातील अनेक शेतकरी इस्राईलला अभ्यास दौऱ्यासाठी जाऊन आलेले आढळतील. अगदी गावात एक म्हटला तरी चालेल, इतक्या भारतीयांनी इस्त्रायला भेटी दिल्या आहेत. 

या देशांमध्ये वैरण व खडकाळ जमीन होती. पण ज्यू लोकांनी अक्षरशः तिथे नंदनवन फुलवले आहे. या देशात फक्त सहा इंच पाऊस पडतो, आणि काही भागात तर अवघा एक इंच तरीही तिथे पाण्याची कमतरता नाही.

वाळवंटात त्यांनी शेती फुलवली आहे. हा देश फुलाची निर्यात करतो. या सगळ्या प्रगतीला इथल्या कृषी क्षेत्रातील  शास्त्रज्ञांनी विकसित केलेले असामान्य ज्ञान व तंत्रज्ञान त्याला कारणीभूत आहे. या संशोधनांना जगात तोड नाही, हे सर्वांनीच मान्य केले आहे.

यातीलच इस्त्राईलने जगाला दिलेले असेच एक अनमोल तंत्रज्ञान म्हणजे ठिबक सिंचन. ठिबक सिंचनाचा पहिला प्रयोग जर्मनीत झाला होता. पण तरीदेखील याचे श्रेय इस्राईल देशाला जाते. कारण या देशाने ठिबक सिंचनाचा केलेला शास्त्रशुद्ध अभ्यास होय.

जर्मनीमध्ये काही शास्त्रज्ञ थेट पिकांच्या मुळाशी पाणी कसे देता येईल, यावर संशोधन करत होते. त्यावेळी संशोधनातून त्यांनी पहिल्यांदा मातीच्या भाजलेल्या पाईपमधून सगळ्यात आधी पिकाला पाणी देण्याचा प्रयोग केला.

पण ते दिवस म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडाचे होते. अनेक देश एकमेकांविरुद्ध संघर्षासाठी उभे होते. या संघर्षामुळे जवळपास अनेक वर्षे ठिबक सिंचनाच्या संशोधनाकडे सगळ्यांचे दुर्लक्ष झाले.

दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिकच्या पाईपचा वापर सुरू झाला. इकडे भारतात पण सिमेंट पाईद्वारेच पाणी वाहून नेण्याची पद्धती वापरली जात होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ठिबक सिंचन
अचूक निदानाचे गणित

१९३० च्या दरम्यान शिम्सा ब्लॉस इस्त्राईलमधील जॉर्डन व्हॅलीमध्ये जलवाहिनीवर कार्यरत होते. त्यावेळी त्यांना एका शेतकऱ्याने आपण पाणी दिले नसताना देखील झाड वाढल्याचे निदर्शनास आणून दिले. ब्लॉस यांनी ते उत्सुकतेने खणून बघितले, तर एक पाईप लिकेज होता आणि त्या माध्यमातून झाडाला पाणी मिळत होते.

त्यानंतर त्यांनी यावर शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासाला सुरुवात केली. जवळपास हा अभ्यास वीस वर्षे सुरू होता. १९४८ मध्ये त्यांनी इंग्लंडमधून आग विझवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाईप्स प्रयोगासाठी विकत आणले.

अखेरीस १९५० मध्ये त्यांच्या प्रयोगाला यश मिळाले. त्यातून पुढे जगात आधुनिक ठिबक सिंचनाच्या युगाची सुरुवात झाली. त्यांनी ठिबक सिंचनाचा सल्ला देणारी फर्म सुरू केली. १९५२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध केले,

की झाडाच्या बुंध्यात कमी दाबाने थेंब थेंब पद्धतीने पाणी दिले, तर झाडाची वाढ अन्य सिंचन पद्धतीच्या तुलनेत त्वरित व अत्यंत जोमदार पद्धतीने होते. या प्रयोगासाठी त्यांनी वाटाणा हे पीक सुरुवातीला निवडले.

या जोडीला त्यांनी इतर कडधान्ये तेलबिया व फळबागा फळझाडांवर देखील हा प्रयोग केला. त्यावेळी त्यांना ठिबक सिंचन पद्धतीसाठी जगात पहिल्यांदाच पेटंट प्राप्त झाले. पुढे ठिबक सिंचनासाठी नेटाफिर्म या पहिल्या कंपनीची देखील सुरुवात केली. पुढे या विषयांत अनेक संशोधने झाली.

प्लास्टिकच्या नळ्यांच्या साह्याने ठिबक पद्धतीची रचना डिझाईन करून निरनिराळ्या पद्धतीचे तोट्या भरुन काढण्यासाठी संशोधन व प्रयोग केले गेले. त्यात प्रत्येक तासाला किती पाणी झाडाला मिळावे, याबाबत गणिती पद्धतीचा वापर करून तोट्यांची रचना केली गेली. जगभरात ही पद्धती स्वीकारली जाऊ लागली.

भारतात या प्रयोगाचा विस्तार केला, तो जळगावच्या भवरलाल जैन अर्थात जैन ग्रुपने भवरलाल जैन यांनी हे तंत्रज्ञान परदेशात पाहिले. त्यानंतर हे तंत्रज्ञान भारताला वरदान ठरेल, याबाबत त्यांना खात्री पटली.

परदेशातून त्यांनी परत येताना सोबत ठिबकची पुस्तके, माहितीपत्रके, नमुने, नळ्या, तोट्या यांची शिदोरी सोबत आणली. जैन उद्योग समूहातील तांत्रिक सहकाऱ्यांना याचा सखोल अभ्यास करायला लावला आणि १९८६ मध्ये परदेशी कंपनीसोबत करार करून हे तंत्रज्ञान भारताच्या शेतीत प्रत्यक्ष उतरवले.

जैन यांनी केवळ ठिबक सिंचन भारतात आणल नाही तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी हे ठिबक सिंचन वापरण्याबद्दल शेतकरी बांधवांना प्रवृत्त केलं. जैन इरिगेशनच्या या ठिबकमुळे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर अख्या भारताच्या कृषी क्षेत्रात क्रांती झाली.

ठिबक सिंचनाच्या तंत्रज्ञानामुळे उत्पादकतेमध्ये ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली. हे आपल्याला मान्य करावे लागेते. ठिबकच्या प्रयोगाने अख्ख्या जगातील शेती तग धरून आहे. कमी पाणी असले तरी आज ठिबक सिंचनामुळे शेतीतून उत्पन्न काढणे शक्य आहे.

काही वर्षांपूर्वी पिकांना पाटचारी दांड्याने पाणी दिले जायचे. ठिबक संच हे फक्त मोजक्या शेतकऱ्यांकडेच असायचे. परंतु आजच्या स्थितीत बहुतांश शेतकरी ठिबक सिंचनाशिवाय शेती करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ठिबक सिंचन ही काळाची गरज बनली आहे.

(लेखक हे ब्रम्हा व्हॅली ग्रृप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष आहेत.)

ठिबक सिंचन
मातीच्या चुली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com