युद्धस्य कथा (नव्हे) रम्याः - ए रशियन डायरी

Russia-Ukraine war
Russia-Ukraine waresakal

लेखिका - निलम बागुल

संपूर्ण जगाचे लक्ष रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धाकडे लागले आहे. सामरिक महासत्ता असणाऱ्या रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ ला युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर भडकलेल्या युद्धाला एक महिन्याचा कालखंड उलटत आहे. या युद्धाचे वार्तांकन करण्यासाठी देशोदेशीचे पत्रकार युक्रेनमध्ये पोहचले आहे. या दरम्यान एका वृत्तपत्रकाराचा वृत्तांकन करताना मृत्यू झाला. रशियाच्या युद्ध कथा जगाला सांगू नयेत, म्हणून प्रसारमाध्यमांवर दबाव येत आहे. या युद्धाची वाटचाल तिसऱ्या महायुद्धाकडे होत असल्याचे युद्ध विश्लेषक सांगत आहेत.

रशियाचे सर्वेसर्वा ब्लादिमीर पुतिनच्या (Vladimir Putin) राजवटीत सतत राजकिय आणि मानवी हक्कांची पायमल्ली झालेली आढळते. रशियाची साम्यवादी राष्ट्र ते साम्राज्यवादी राष्ट्र अशी प्रतिमा राष्ट्रपती पुतिन यांच्या राष्ट्राच्या विस्तारीकरणाच्या भूमिकेतून होत आहे. पुतिन यांच्या चेहऱ्यामागचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचे काम अॅना पोलितकोवस्क़्या या रशियन महिला पत्रकाराने केले. अॅना शोधपत्रकारिता या क्षेत्रातील आघाडीची पत्रकार होती. तिने डिसेंबर २००३ ते २००५ या कालखंडात रशियात घडलेल्या घटनांच्या नोंदी 'ए रशियन डायरी' या रोजनिशीत केल्या आहेत. पत्रकारितेला वाहिलेली 'ए रशियन डायरी' रॅंडम हाऊसने प्रकाशित केली. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविल्या गेलेली ही रोजनिशी जगातील अनेक भाषांत अनुवादित झाली. मात्र अद्याप रशियात प्रकाशित झालेली नाही. शोभना शिकनीस यांनी तिचा केलेला मराठी अनुवाद 'मेहता पब्लिशींग हाऊसने २०११ मध्ये मराठी वाचकांपर्यंत पोहचविला. 'ए रशियन डायरी' वाचत असताना शांत, संयमी चेहरा असणाऱ्या 'ब्लादिमीर पुतिन' यांची राजवट सर्वसामान्यांचा भितीने थरकाप उडविते. एखाद्या भयपटाला साजेल अशा घटनांची शृंखला अॅनाने या रोजनिशीच्या माध्यमातून उघड केली आहे. म्हणूनच 'ए रशियन डायरी' ही एक खाजगी रोजनिशी (Dairy) किंवा निव्वळ स्मृतिचित्रे (memories) नसून ते एका सच्च्या पत्रकाराच्या शैलीत रशियातील घुसळून निघालेल्या राजकिय आणि सामाजिक जीवनाचे ज्वलंत चित्रण आहे, असे म्हणून समिक्षकांनी या रोजनिशीला गौरविले आहे.

Russia-Ukraine war
पाकिस्तानच्या राजकारणातील अपयशी कर्णधार!

ब्लदिमीर पुतिन हे रशियाच्या गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख होते. १९९१ मध्ये युनायटेड स्टेट्‌स ऑफ रशियाचे रशियन फेडरेशनमध्ये रुपांतर झाले. रशियन संघराज्याचे एकून पंधरा देशात विघटन झाले. १९९९ मध्ये पुतिनचे क्रेमलिनमध्ये आगमन झालं आणि त्यांनी दुसऱ्या चेचेन्या युद्धाला तोंड फोडलं. या युद्धामुळे मिलिटरी आणि पत्रकारिता पणाला लागली. चेचेन्यायुद्ध सतत चालू रहावे हा राज्यकर्त्यांचा मानस होता. त्याकरिता चेचेन्यावासियांचे अपहरण, स्त्रीयांवर बलात्कार, त्यांचा छळ, आप्तांचे अपहरण असे अमानुष प्रकार सतत चालू होते. हे जनतेच्या समोर येऊ नये म्हणून रशियन सरकारने प्रसार माध्यमांवर कडक बंधने घातली होती. "नोवाया गॅझेटा" या वृत्तपत्राच्या माध्यमातून अॅना पोलितकोवस्क्याने पुतिन यांचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न केला.

स्वतंत्र राष्ट्रीय प्रसार माध्यमांची गळचेपी, कोणत्याही भरीव कामगिरीसाठी स्वतंत्र आर्थिक स्त्रोतांचा अभाव आणि स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा अभाव यामूळे १९९९ नंतर प्रभावी विरोधीपक्ष निर्माण होणे केवळ अशक्य होते. परिणामी पुतिन हे एखाद्या अनभिशिक्त सम्राटाप्रमाणे वागू लागले. त्यांची 'रशिया फॉर रशियन्स' ही घोषणा केव्हाच विरून गेली होती. डिसेंबर २००३ मध्ये रशियन संसद ड्यूमाच्या फेरनिवडणूका झाल्या. पत्रकारांच्या मते तीव्र जनक्षोभामुळे रशियन जनतेचा कौल युनायटेड रशिया या पक्षाला कधीही मिळणार नाही. निकालाचे फासे मात्र वेगळेच पडले; पुतिन यांचा युनायटेड रशिया 'न भूतो न भविष्यती' मताधिक्याने ड्यूमात (रशियन संसद) गेला. ह्या मागील कारणे तपासली असता, ही निवडणूक अतिशय नियोजित होती. रशियन जनतेला विकासाच्या नव्यावाटा, नवी क्षितीजे, नवी स्वप्ने न दाखवता, रशियासमोरिल आव्हाने कोणती हे न सांगता केवळ मिखार्इल गोर्बाचेन्ह आणि येल्सिन कसे चुकले? हे वारंवार लोकांच्या मनावर बिंबविले. प्रत्यक्ष मतादानाच्या वेळी 'बुथ कॅपचरिंग (Booth Capturing), बुथसमोर फुकट व्होडका वाटप, एकाच मतदाराने पून्हा-पून्हा अनाधिकृतपणे मतदान करणे, मतदान यंत्रात फेरफार करणे, निवडणूक आयोगाच्या नियमांना धाब्यावर बसवणे, जर कोणी आक्षेप नोंदविला तर त्याला यमसदनी पाठविणे तसेच निवडणूक आयोगातील सदस्यांना आपल्या प्रियजनांना गमावण्यापेक्षा खोटी मते देणे सोयिस्कर वाटत होते. पुतिन राजवटीत टिकून रहायचे असेल तर 'प्रवाहाबरोबर पोहायला शिका'. ह्या स्टॅलिन पद्धतीच्या पूर्वस्मृती जाग्या होत होत्या.

Russia-Ukraine war
सत्तेची शिडी व्हाया ‘ईडी’
esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com