गारगोटी : स्काय इज द लिमिट | Latest Marathi article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

K C pandey welcomes Rajnath singh

गारगोटी : स्काय इज द लिमिट

लेखक : के. सी. पांडे


पर्यटनविकास आणि रोजगारनिर्मितीला (Tourism development and employment generation) चालना देण्यासाठी भूगर्भातील या वारशाला वारसास्थळाचा दर्जा मिळण्याची गरज आहे. विकासासाठी सकारात्मक असलेल्या सरकारने याबाबत विचार केल्यास या क्षेत्राला विविध अर्थसंस्थांच्या व्याख्येत बसण्यास मदत होईल. जेणेकरून पर्यटनावृद्धीसाठी या खजिन्याची मोठी मदत होईल. (saptarang marathi articles by K C Pandey on gargoti museum nashik Latest Marathi article)

आपल्या देशाला प्राचीन सांस्कृतिक व नैसर्गिक संपत्तीचा वारसा लाभलेला आहे. विविध परंपरा कला पुरातत्वीय उत्खननातून उजेडात आलेली स्थळे प्राचीन कलावशेष, त्याचबरोबर भूगर्भाखाली लाखो वर्षांपूर्वीच्या अनमोल अशी गारगोटी मिनरल आहेत.

आजही त्याबद्दल खूप कमी माहिती आहे. मी तर माझ्या परीने ही गारगोटी मिनरल जगात सर्वदूर पोचविण्याचा प्रयत्न केला. माझ्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत शेकडो, हजारो लोक भेटले असतील. गारगोटीबद्दल निर्णय प्रतिक्रिया दिली, पण त्यामध्ये एक गोष्ट मात्र सर्वांनी बोलून दाखविली ती म्हणजे, पांडेजी तुमच्यामुळे जगाच्या पटलावर गारगोटीची एक ओळख निर्माण झाली, नाही तर भूगर्भाखाली असलेले सौंदर्य हे भूगर्भाखालीच राहिले असते.

गारगोटीची व्याप्ती ही ‘स्काय इज द लिमिट’ आहे. या माध्यमातून फार मोठी क्रांती घडू शकते. रोजगाराच्या संधीबरोबरच शासनासाठी अनेक सकारात्मक बाजूही घडू शकतात. परंतु शासन व कॉर्पोरेट जगताने गारगोटीच्या प्रचार आणि प्रसारासाठी पुढे येण्याची गरज आहे.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा सत्कार करताना के. सी. पांडे.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा सत्कार करताना के. सी. पांडे.

आपल्या देशाला पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे. जगाच्या पाठीवर अनेक असे देश आहेत, की त्यांची ओळख फक्त पर्यटन म्हणून आहे. या देशांची सर्व अर्थव्यवस्था ही देशात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर अवलंबून आहे.

आपल्या देशासही पर्यटनाच्या विकासासाठी बराचसा वाव आहे. युरोपियन किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये अगदी दोन-तीनशे वर्षांपूर्वीच्या वास्तु स्थळे स्मारकसुद्धा या देशांनी अतिशय आस्थेने व काळजीपूर्वक जपले आहे. त्याचे जतन केले आहे.

सर्वसामान्यांना त्या स्मारकांविषयी वास्तूविषयी आपुलकी आणि सार्थ अभिमान आहे. आपल्याकडे मात्र याउलट परिस्थिती आहे. हजारो वर्षांपूर्वीचे स्थळे तर आपल्याकडे उपेक्षित, भकास असे भासतात.

 विश्‍व जागृती मिशनचे सुधांशू महाराज.

विश्‍व जागृती मिशनचे सुधांशू महाराज.

हेही वाचा: सत्याग्रहाचे कट्टर अनुयायी

महामार्ग, शहरीकरण नव्याने उभे राहणाऱ्या प्रकल्पासाठी शासन जितके सकारात्मक अथवा आग्रही असतं, तसं या तुलनेत देशाच्या नावलौकिकात भर घालणारे भूगर्भातील सौंदर्य जगाला दाखविणारे गारगोटी मिनरल, तसेच अनेक ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूबद्दल अनास्था बघावयास मिळते.

गारगोटी मिनरल शासनाने अथवा कॉर्पोरेट जगताने पाठबळ दिले तर गारगोटी मिनरलच्या माध्यमातून फार प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते. मुंबईजवळच्या घारापुरी अथवा एलिफंटा बेटावरील लेणी समूह जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर झाले आहेत, मात्र गारगोटीसारखं भूगर्भातील सौंदर्य जगाला दाखविणाऱ्या संग्रहालयाबाबत असाच सकारात्मक विचार होण्याची गरज आहे.

शासनाची व अर्थसाह्य करणाऱ्या बँकांची काही सूची ठरलेली असते. त्याच्यात विशिष्ट सूची असते, की त्या स्थळांसाठी ते विचार करू शकता. माझं क्षेत्र असं आहे, की मी ते स्वतः शोधले व त्याची निर्मिती केली. त्यामुळे बँकांचे असे म्हणणे आहे, की तुमचं काम असामान्य आहे, त्याबद्दल दुमत नाही; पण आमच्या पॉलिसीमध्ये ते नाही.

याचा विचार करणे गरजेचे आहे. कुणालाही माहीत नसणाऱ्या गारगोटी मिनरलमधून ज्या व्यक्तीने जगातील एकमेव असे आंतरराष्ट्रीय संग्रहालयाची निर्मिती केली, जगात या क्षेत्रात गारगोटीचं नाव अग्रस्थानी आहे. जगभर व्यवसाय आहे, यासाठी म्हणून सरकारने अथवा वित्तीय संस्थांनी गारगोटीसारख्या अधिक व्यापक अशा माझ्या शिर्डी येथील साई अक्षरधाम प्रकल्पासाठी पुढे यावे.

हेही वाचा: विवादास कारण की...

Web Title: Saptarang Marathi Articles By K C Pandey On Gargoti Museum Nashik Latest Marathi Article

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top