त्यांनी इतिहास रचलाय... (श्रवण राठोड)

shravan rathod
shravan rathod

दक्षिणेकडील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचं नुकतंच (२५ सप्टेंबर) निधन झालं. विविध भाषांमध्ये २५ हजारांपेक्षा जास्त गाणी त्यांनी गायली आहेत. मराठीमध्ये देखील ‘निशिगंध’ या अल्बमसाठी त्यांनी तीन गाणी गायली, या अल्बमचे संगीतकार हर्षित अभिराज यांनी तो अनुभव सांगितलाय. ए.पी.बालसुब्रह्मण्यम यांनी ‘साजन’ या हिंदी चित्रपटासाठीही गायन केलं होतं. त्याचे संगीतकार श्रवण राठोड यांनीही त्यांच्या सहवासातील क्षणांना उजाळा दिलाय...

एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचं निधन मनाला चटका लावणारं आहे, ते रुग्णालयात दाखल होते हे माहीत होतं आणि अचानक एके दिवशी त्यांच्या
निधनाची बातमी आली आणि खूप धक्का बसला. एस. पी, बालसुब्रह्मण्यम म्हणजे सुपर सिंगर. मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्यानंतर कुणाचं नाव घ्यावं लागेल तर त्यांचंच नाव घ्यावं लागेल. त्यांच्या इतकी गाणी कुणीच गायली नाहीत. माझ्या मते गायनातले ते सुपर मशीन होते. त्यांनी हिंदीबरोबरच तमिळ, मल्याळम, तेलुगू, इंग्रजी अशा जवळपास सोळा भाषांमध्ये गाणी गायली आणि तीदेखील विविध प्रकारची आहेत. त्यांच्या गायनाची विशिष्ट अशी ओळख होती आणि शैलीही होती.

त्यांची व आमची पहिली भेट साजन चित्रपटाच्या वेळी झाली. या चित्रपटाच्या गाण्याचं रेकॉर्डिंग जुहू येथील सनी सुपर साऊंडमध्ये होते आणि ते गाणे होते
‘ जिये तो जिये कैसे....’ हे गाणे अनुराधा पौडवाल, पंकज उधास, कुमार शानू आणि बालसुब्रह्मण्यम यांनी गायलेलं आहे. आम्ही सुरुवातीला गाण्याचा ट्रॅक बनवितो आणि नंतर गाणे रेकॉर्ड करतो. आम्ही या गाण्याचा ट्रॅक बनविला होता आणि अनुराधाजी, पंकजजी, कुमार शानूजी यांचे रेकॉर्डिंग झालेले होते. फक्त बालसुब्रह्मण्यम यांचंच रेकॉर्डिंग बाकी होते. ते स्टुडिओत आले आणि त्यांनी गाणे ऐकले. त्यानंतर आनंदानं ते म्हणाले, ‘धीस इज कॉल्ड म्युझिक....धीस इज कॉल्ड मेलडी...ही त्यांनी आम्हाला दिलेली तेव्हा बेस्ट कॉम्प्लिमेंट होती व आम्ही कधीही ती विसरणार नाही.
आजही तो क्षण आणि त्यांचे ते कौतुकाचे उद् गार मला आठवतात. त्यानंतर त्यांनी ‘साजन’ चित्रपटातली तीन-चार गाणी गायली. त्यातील अधिक लोकप्रिय गाणे ठरले आणि आम्हाला पुरस्कार मिळाला ते गाणे म्हणजे ‘देखा है पहली बार.. हे गाणे. अलकाजी आणि त्यांनी गायले. या गाण्यानं जगभरात खूप धूम माजविली. ‘तुमसे मिलने की तमन्ना है....’ हे गाणेदेखील त्यांनी गायले. त्यांनी गायलेली सगळी गाणी लोकप्रिय ठरली. त्यानंतर सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या मझधारसाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो. या चित्रपटातील ‘सागर से गहरा है प्यार हमारा...’ हे गाणे त्यांनी आणि आशाजी यांनी गायले. आशाजी म्हणजे मेलडी ऑफ द क्वीन आणि त्यांच्याबरोबर बालसुब्रह्मण्यम. मग काय विचारता....गाणे सुंदर होणारच आणि तस्सेच झाले. हे गाणेही लोकप्रिय ठरले आणि मलाही हे गाणे खूप आवडते.

आम्ही त्यांच्याबरोबर सात ते आठ गाणी केली. खूप शिस्तप्रिय आणि शांत असा हा गायक. खूप कमी बोलायचे परंतु आपले काम चोख करायचे. रेकॉर्डिंगला आले की सरळ आपल्या कामाकडे लक्ष द्यायचे. एक - दोन वेळा रिहर्सल झाली की ते छानपैकी मुडमध्ये यायचे आणि म्हणायचे की यस सर...आय अॅम रेडी. त्यांच्या तोंडून रेडी हा शब्द आला की त्यांना कुणी रोखू शकत नव्हते. कारण ते गाण्यामध्ये इतके तल्लीन व्हायचे की आम्ही म्हणायचो की सर..धीस इज ओके... तरी ते पुन्हा म्हणायचे की वन मोअर चान्स...वन मोअर टेक...आय वील ट्राय वन्स अगेन. खरं तर आम्हाला ज्या पद्धतीने गाणे हवे होते ते झालेले
असायचे. तरीही त्यांचे समाधान झालेले नसायचे. त्यामुळे आम्हालाही त्यांच्याबरोबर काम करताना मजा यायची. मग आम्ही एकमेकांशी चर्चा करून ते गाणे रेकॉर्ड करायचो.

मला वाटते की त्यांनी गायन क्षेत्रात एक प्रकारचा इतिहास रचला आहे. साऊथमधून येऊन हिंदी चित्रपटसृष्टीतही ते तितकेच लोकप्रिय ठरले. त्यांचा आवाज म्हणजे दैवी देणगी होती, त्यानंतर त्यांची व आमची भेट काही झाली नाही. त्यानंतर आताच ते रुग्णालयात असल्याची बातमी आली. त्यातूनही ते बाहेर येतील अशी मला खात्री होती. परंतु ती
दुर्दैवी बातमी आली आणि धक्का बसला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com