दृष्टिकोन : संशोधनपर शिक्षणपद्धती काळाची गरज

Rajaram Pangavane
Rajaram Pangavaneesakal

लेखक : राजाराम पानगव्हाणे

शिक्षण घेणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. योग्य दर्जाचे शिक्षण सर्वांसाठी सहज उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. आपला देश हा मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. शासकीय पातळीवर इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला शासनामार्फत शिक्षण उपलब्ध करून देणे काहीसे अवघड आहे.

खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे हे शासन सुद्धा ठाऊक आहे, म्हणूनच खाजगी संस्थांना शासनाने पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. जगाच्या पाठीवर जी महत्त्वाची विद्यापीठे आहेत, अशा पहिल्या दोनशे विद्यापीठांमध्ये भारतातील बोटावर मोजण्या इतक्याच शैक्षणिक संस्था त्यामध्ये आहे.

दुर्दैवाने पहिल्या शंभर मध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही. परदेशातील शिक्षण पद्धती तेथे उपलब्ध करून दिले जाणारे इन्फ्रास्ट्रक्चर याच्या तुलनेत आपण अनेक वर्ष मागे आहोत.  (saptrang latest marathi article by rajaram pangavane on Research based education nashik news)

Rajaram Pangavane
समज आणि उमज...

आपल्या देशात जगासोबत स्पर्धा करायची झाल्यास शासकीय पातळीवर विशिष्ट प्रयत्न केले गेले पाहिजे. आपल्यामध्ये क्षमता आहे. आपले विद्यार्थी जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही का जिथे शिक्षणाच्या जोरावर भारतीय विद्यार्थ्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेले नाही. जागतिक दर्जाचे विद्यापीठ निर्माण करताना त्यासाठी काय करता येईल? याचा सखोल विचार होऊन त्यासाठी शासनाने विधायक पावले उचलणे गरजेचे आहे.

लोकशाहीतील शिक्षण व्यवस्थेच्या विकासासाठी शाळा, महाविद्यालय व विद्यापीठात सर्जनशील विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी पोषक वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे. तरच अशा वातावरणामध्ये अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया सुरळीत पार पडेल. 

जगामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण व संशोधन हे परस्पर पूरक आहे. तेथील शिक्षण पद्धती ही संशोधनावर आधारित आहे. त्यामुळेच अनेक वर्ष ते आपल्या पुढे आहे. एकंदर शिक्षण व्यवस्थेचा विकास करण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजे.

तर्कशुद्ध, सर्जनशील आणि स्वतंत्र विचारांना विचारपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. खाजगी उच्च शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत उदारमतवादी धोरण स्वीकारले पाहिजे. आपली शिक्षण पद्धती ही योग्य आहे.

काळानुसार व त्या-त्या वेळेच्या सामाजिक बदलत्या संरचनेनुसार बदलत गेली. त्यावेळी शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी ज्या महापुरुषांनी विशेष योगदान दिलेले आहे ते असामान्यच आहे. पण जग झपाट्यात बदलत असताना आपणही त्या वेगाने त्याबरोबर निकोप स्पर्धा करण्याची गरज आहे.

आपल्या देशाला ज्ञानाचा एक अतिशय समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेला आहे. आपल्या देशात घडत गेलेल्या अनेक सुवर्ण घटनांमुळे शिक्षणाच्या काही महत्त्वाच्या क्षेत्राला जन्मही दिलेला आहे. भारतीय शिक्षण निश्चितपणे जगभरात कौतुकास्पद आहे.

जेव्हा जागतिक स्तरावर कौशल्य प्रदान करण्याचा विचार येतो, तेव्हा पाश्चात्त्य देशातील एकूण सामान्य मूलभूत शिक्षणाला भारतीय शिक्षणाच्या तुलनेत अधिक मूल्यांकन आणि प्राधान्य दिले जाते. आज भारतीय शिक्षणाची स्थिती सुधारण्यासाठी अनेक निश्चित उपयोजना राबवल्या जात आहे.

जगातील काही आघाडीच्या राष्ट्रांप्रमाणेच शिक्षणाचा दर्जा गाठण्यासाठी अजून बरेच प्रयत्न होण्याची गरज आहे. परदेशातील शिक्षण पद्धती आपल्यापेक्षा प्रगत का आहे? याची महत्त्वाची कारणे आपण समजून घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rajaram Pangavane
रुग्णस्नेही ‘केवट’


सुविधा, माध्यमे व निधी यांच्या कमतरतेमुळे भारतीय शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना संशोधन आधारित ज्ञान कार्यासाठी संधी देऊ शकत नाही. याकडे सरकारचेही अनेकदा दुर्लक्ष होते.

अनेक परदेशातील स्वायत्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थांना संशोधन या विषयासाठी केवळ सरकारच नव्हे तर मायक्रोसॉफ्ट, गुगल यासारख्या जगातील अनेक मोठ्या कंपन्या आणि संस्थांद्वारे निधी दिला जात आहे. ज्यामुळे चांगल्या संशोधन उपक्रमांना चालना मिळण्याची शक्यता वाढते.

जगातील विकसित राष्ट्रांमध्ये समृद्ध आणि वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम राबविला जातो. भारतीय शिक्षणातील अभ्यासक्रम हा काहीसा पूर्वी केलेल्या संशोधनावर आधारित आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला काहीतरी नवीन शिकण्याची आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची पुरेशी संधी मिळत नाही.

अमेरिका, इंग्लंड यासारख्या प्रगत देशांमध्ये विविध अभ्यासक्रम आहेत जे विद्यार्थ्यांना त्यांच्या कम्फर्ट झोन आणि मर्यादित ज्ञान क्षेत्रातून बाहेर येण्याच्या संधींना परिपूर्ण न्याय देणारे आहे. विद्यार्थ्यांना नवीन आणि नाविन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

बहुतेक विद्यार्थी सहसा त्यांच्या अभ्यासक्रमासाठी यूएसला प्राधान्य देतात आणि सर्वेक्षणानुसार असे आढळून आले आहे की, जगभरात जवळपास सर्वाधिक विद्यार्थी संख्या शिक्षण घेणाऱ्यांची ही जवळपास ७० टक्के विद्यार्थी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युके व कॅनडा या देशांमध्ये आहे.

उच्च शिक्षण घेताना इतर विषय निवडण्याचे पर्याय यासारखा विविध शैक्षणिक सुविधांमुळे परदेशी शिक्षणाचा निश्चितच फायदा होतो. विषयांच्या निवडीवर लवचिकता असल्यामुळे एकापेक्षा अधिक पर्याय त्यांच्यासमोर असतात.

भारतीय अभ्यासक्रमात जर उदाहरणासह बोलायचे झाले तर असा एखाद्या विद्यार्थ्यांस सायन्स शाखेतील रसायनशास्त्र हा त्याचा विषय आहे. पण तो कॉमर्स संबंधित एखादा विषय घेऊ शकत नाही.

Rajaram Pangavane
एक झोका सुखाचा!

परंतु बहुतेक परदेशी विद्यापीठांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना बदलण्याची तसेच त्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी एकापेक्षा जास्त विषय निवडण्याची संधी दिली जाते. ज्यामुळे त्यांना अधिक वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम आणि संधी मिळतात हा त्यांना परदेशातील शिक्षण घेताना अतिरिक्त फायदा होतो.

पारंपरिक आणि समकालीन कार्यक्रमांचे मिश्रण भारतीय विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांकडे अभियांत्रिकी वैद्यकीय आणि व्यवस्थापनासारखे काही निवडक विषय उच्च शिक्षण पर्याय आहे. या उलट परदेशातील विद्यापीठे आपल्या विद्यार्थ्यांना केवळ या पारंपरिक क्षेत्रातच नव्हे तर गेम डिझाइनिंग, फोटोग्राफीसारखे आधुनिक अभ्यासक्रम शिकवण्याची संधी देतात.

सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे परदेशातील शिक्षण पद्धती ही व्यावहारिक आणि संशोधन आधारित दृष्टिकोनावर निर्माण केलेली आहे. भारतीय शिक्षणाच्या तुलनेत परदेशातील शिक्षणामध्ये बरीच सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णता आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

ज्यावर अनेक विद्यार्थी सहमत आहे. परदेशी शिक्षण प्रक्रिया अधिक व्यावहारिक दृष्टिकोन आहे तर भारतीय शिक्षण अधिक सैद्धांतिक आहे. ज्या पद्धतीने ते संकल्पना हाताळतात आणि त्याची अंमलबजावणी करतात. विद्यार्थ्यांना संकल्पना समजून घेण्यास आणि वास्तविक जीवनातील परिस्थिती लागू करण्यास अधिक प्रभावी आहे.

भारतीय विद्यार्थी सुद्धा परदेशातील शिक्षणाकडे आकर्षित होतात, याचीही काही प्रमुख कारणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रदेशात दिले जाणारे शिक्षणाला महत्व दिले जाते. अभ्यासाबरोबरच काम करण्याची संधीही मिळते.

शिष्यवृत्ती, संशोधनाची संधी, कोर्स पर्याय, इंग्रजीवर प्रभुत्व अनेक घटकांमुळे भारतीय विद्यार्थी सुद्धा प्रदेशातील शिक्षणाला महत्त्व देत आहे.

आपल्या देशात जन्मलेला विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेतो आणि तो तिथेच नोकरी करत असेल तर त्याच्या ज्ञान कला गुणवत्तेचा देशाला काहीही फायदा होत नाही. यासाठी शासनाने शैक्षणिक संस्थांचा दर्जा उंचाविण्यासाठी पुढे आले पाहिजे.

(लेखक हे ब्रम्हा व्हॅली ग्रृप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष आहेत)

Rajaram Pangavane
विसरल्या जाती, वितळल्या पाती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com