‘मुलांना न रागावता शिकव’ (नलिनी चौधरी)

नलिनी चौधरी, पुणे.
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

माझा मुलगा पुनित त्याच शाळेत पहिलीत होता. त्याच्या बाई होत्या सिंधू दौंडकर. शाळा सकाळची असायची. पुनितचा वर्ग ऑफिसशेजारीच होता. त्यानं वर्गात प्रश्‍नांना उत्तरं छान दिल्यानं त्याला त्या दिवशी शाबासकी मिळाली होती. ही आनंदाची बाब मला सांगण्यासाठी तो थेट मी शिकवत असलेल्या माझ्या वर्गात आला. मी सहावीच्या मुलांना गणित शिकवत होते. सोपच गणित मी घातलं होतं; पण शिकवताना लक्ष न देणारा एक विद्यार्थी वर्गात होता.

ही घटना सन १९९५ मधली आहे. मी हडपसरमधल्या बंटर स्कूलच्या शाळाक्रमांक ६३ बी या मुलांच्या शाळेत नोकरीला होते. 

माझा मुलगा पुनित त्याच शाळेत पहिलीत होता. त्याच्या बाई होत्या सिंधू दौंडकर. शाळा सकाळची असायची. पुनितचा वर्ग ऑफिसशेजारीच होता. त्यानं वर्गात प्रश्‍नांना उत्तरं छान दिल्यानं त्याला त्या दिवशी शाबासकी मिळाली होती. ही आनंदाची बाब मला सांगण्यासाठी तो थेट मी शिकवत असलेल्या माझ्या वर्गात आला. मी सहावीच्या मुलांना गणित शिकवत होते. सोपच गणित मी घातलं होतं; पण शिकवताना लक्ष न देणारा एक विद्यार्थी वर्गात होता.

उत्तर नीट देता न आल्यानं मी त्याला रागावत होते. हे पुनितनं पाहिलं. स्वतःचं कौतुक सांगण्याऐवजी तो काही क्षण शांत झाला आणि पुढच्याच क्षणी मला म्हणाला :‘‘आई, तू रागावू नकोस.’’
‘‘का रे?’’ मी त्याला विचारलं. 
अवघ्या पाच वर्षांचा पुनित मला म्हणाला :‘‘ तू या मुलांना चांगलंच शिकव; पण आनंदात शिकव. रागावू नकोस.’’ 

माझ्या छोट्याशा मुलाच्या त्या बोलण्यानं माझी शिकवण्याची पद्धतच बदलून गेली. पुनित माझा गुरू झाला. विद्यार्थ्यांवर रागवायचं नाही हे मी तेव्हाच ठरवलं. पुढच्या काळात माझ्या हातून अनेक गुणी विद्यार्थी घडले व त्यांनी आपापल्या क्षेत्रांत लौकिक मिळवला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptrang nalini chaudhary write on child