अशी बोलते माझी कविता (सतीश घुले)

सतीश घुले, मु. काटेवाडी, पो. खरवंडी (कासार), ता. पाथर्डी, जि. नगर (९६०४७२१४६५)
रविवार, 15 जानेवारी 2017

किलबिलाट

आता नकोत मला त्या आठवणी
जुन्या आणि नव्याही
कारण, चालताना त्यांच्या नादात
मी अडखळतोय
माझ्याच पावलांत...

आता नकोत मला कुठलीच गाणी
नवी आणि जुनीही
नकोत कुठलेच तराणे
कानांना ऐकवत नाही
आता प्रेमाचे कसलेच गाऱ्हाणे

आता होऊ पाहतोय मी शांत
एखाद्या शमलेल्या वादळासारखा

निवांत होऊ पाहतोय
गर्द झाडीत, जिथं मला ऐकू येईल
केवळ माझ्याच हृदयाची धडधड
आणि पाखरांचा किलबिलाट !

किलबिलाट

आता नकोत मला त्या आठवणी
जुन्या आणि नव्याही
कारण, चालताना त्यांच्या नादात
मी अडखळतोय
माझ्याच पावलांत...

आता नकोत मला कुठलीच गाणी
नवी आणि जुनीही
नकोत कुठलेच तराणे
कानांना ऐकवत नाही
आता प्रेमाचे कसलेच गाऱ्हाणे

आता होऊ पाहतोय मी शांत
एखाद्या शमलेल्या वादळासारखा

निवांत होऊ पाहतोय
गर्द झाडीत, जिथं मला ऐकू येईल
केवळ माझ्याच हृदयाची धडधड
आणि पाखरांचा किलबिलाट !

Web Title: satish ghule's poem

टॅग्स