धर्मनिरपेक्ष ‘इस्लामोफोबिया’

पारंपरिक धर्मनिरपेक्ष वर्तुळात ही एक तीव्र भावना आहे, की भारतीय राजकारणातील नैतिकता पायदळी तुडवली गेली
Secular Islamophobic Muslims democracy politics
Secular Islamophobic Muslims democracy politicssakal
Summary

भाजपच्या राजकीय वर्चस्वामुळे प्रतिस्पर्ध्यांचे राजकीय कौशल्य आणि चतुरता धुळीला मिळाली आहे. यामुळे हे पक्ष इस्लामोफोबिक बनले असून नजीकच्या भविष्यात ते मुस्लिमांना जवळ करण्याचे टाळतील, असे दिसत आहे.

पारंपरिक धर्मनिरपेक्ष वर्तुळात ही एक तीव्र भावना आहे, की भारतीय राजकारणातील नैतिकता पायदळी तुडवली गेली आहे आणि इस्लामोफोबिया लोकशाहीच्या ढिगाऱ्यातून उडणाऱ्या हवेत तरंगत आहेत. तुम्ही या गोष्टीशी सहमत किंवा असहमत असू शकता. तुम्ही असहमत असाल तर वादाला जागाच उरत नाही, पण दोन्ही बाजू बरोबर आहेत असे म्हटले तर काय होईल? म्हणजे इथे काही सूक्ष्म बारकावे आहेत जे एकरेषीय नाहीत. भारताचे भवितव्य ठरवण्यासाठी सहा दशके अगदी २००९ पर्यंत धर्मनिरपेक्षविरुद्ध सांप्रदायिक अशा दोन भागांत राजकारण विभागले होते. या दृष्टीने नैतिकतेची व्याख्या करायची झाल्यास मोदी-शहा यांच्या भाजपच्या उदयाने नैतिकता पायदळी तुडवली गेली, असे म्हणणे बरोबर ठरेल. एक पश्चिम बंगाल सोडले तर भारतातील कुठल्याही राज्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदान नाही, ज्याआधारे तुम्ही भाजपला त्याच जुन्या समीकरणांच्या साह्याने पराभूत करू शकाल. इथपर्यंत पारंपरिक धर्मनिरपेक्षतावाद्यांची तक्रार योग्य आहे.

दुसरे असे, की इस्लामोफोबिया आहे हे सत्य आहे आणि त्यात बरीच गुंतागुंत आहे. पाश्चात्यांच्या राजकीय दृष्टिकोनातून पाहिले तर हा इस्लामोफोबिया नाही. मुस्लिम जीवनपद्धती, धार्मिक प्रथा, खाद्यपदार्थ, जागतिक राष्ट्रवाद, उम्मामध्ये अवतरलेल्या काही प्रचंड सामूहिक शक्तींबद्दल ही भीती नाही. भारतात भाजपेतर पक्षांनी मुस्लिमांशी चांगले संबंध ठेवल्यामुळे निर्माण झालेली ही भीती आहे. ते मुसलमानांविषयी काहीही कठोर बोलायला तयार नाहीत, पण त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या भाजपवर थेट हल्ला करणेही ते टाळतील. उदाहरणार्थ त्यांनी शेतकरी आंदोलनाला थेट पाठिंबा दिला, पण सीएएविरुद्धच्या आंदोलनावर मोदी सरकारने आक्रमक पावित्रा घेतला त्यावर मात्र दबक्या आवाजात टीका केली.

जहांगीरपुरी आणि बुलडोझर हा सध्याचा ज्वलंत विषय आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या विरोधकांची वक्तव्ये पाहू या. डावे पक्ष वगळता बाकीच्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी घटनास्थळापासून अंतर राखले आहे. भाजप दंगे घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे, लोकांचे विभाजन करत आहे वगैरे वगैरे त्यांची वक्तव्ये आहेत. या घटनेवर विशेषतः आम आदमी पक्षाची काय प्रतिक्रिया होती हे पाहा. ते म्हणाले, की बुलडोझऱ पहिल्यांदा त्या भाजप नेत्यांच्या घरावर चालवा, ज्यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना दिल्लीत बस्तान बसवण्याची परवानगी दिली. एक जण तर म्हणाला, की बुलडोझर भाजपच्या मुख्यालयावर चालवा. मुस्लिम समुदायातील काही गरीब लोकांवर (जे ‘आप’चेच मतदार आहेत) अन्याय झाला म्हणून तो असे म्हणाला नाही; तर भाजपने याच मुस्लिम लोकांना अतिक्रमण करण्याची आणि बेकायदा बांधकाम करण्याची परवानगी दिली म्हणून तो असे म्हणाला. बेकायदा वसाहत आणि अनधिकृत बांधकाम या शब्दांचा भाजप आणि आप दोघांनीही वापर केला. एकाचा हेतू ते बांधकाम तोडण्याचे आदेश देणे हा होता; तर दुसऱ्याचा ‘बघा कोण बोलतंय’ असा टोमणा मारण्याचा होता. खरी गोष्ट तर ही आहे, की हे दोन्ही प्रतिस्पर्धी पक्ष दिल्लीतील दोन हजार बेकायदा वसाहतींना नियमित करण्यात गुंतले आहेत. खरे तर ‘आप’ने एक धोरण अवलंबले आहे.

ते म्हणजे भाजपवर टीका करा, पण अल्पसंख्याकांच्या बाजूने नाही. जेव्हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अडचणीत सापडले होते आणि काही विद्यार्थी नेत्यांना कथितरीत्या ‘तुकडे तुकडे’ घोषणा दिल्या म्हणून अटक केली गेली होती, तेव्हा अरविंद केजरीवाल काय म्हणाले होते? ते म्हणाले होते, की जर दिल्ली सरकारकडे पोलिसांचे नियंत्रण असते, तर निष्पाप विद्यार्थी जेलच्या बाहेर असते, पण ज्यांनी खरोखर तशा घोषणा दिल्या होत्या ते जेलमध्ये असते. त्याउलट राहुल गांधी जेएनयूमध्ये गेले, पण याचा फायदा त्यांच्या पक्षाला झाला नाही. हाच पॅटर्न तुम्हाला देशभरात दिसेल. तेलंगणातसुद्धा आघाडी अभेद्य आहे असे वाटत असतानाच केसीआर यांच्या तेलंगण राष्ट्र समिती आणि ‘एआयएमआयएम’ या पक्षांमध्ये अंतर दिसायला लागते. आसाममध्येदेखील काँग्रेस बदरुद्दीन अजमल यांच्या जवळ दिसणार नाही. बंगालमध्येदेखील प्रशांत किशोर यांनी तृणमूलच्या प्रचाराची धुरा सांभाळली, त्यानंतर ममता बॅनर्जी मुस्लिमांच्या कार्यक्रमात हिजाब घालताना दिसत नाहीत किंवा त्यांचा मतदार असणाऱ्या अल्पसंख्यकांसोबत वेळ व्यतीत करताना दिसत नाहीत. गुडगावमध्ये मुस्लिमांनी रस्त्यावर नमाज अदा करण्याच्या वादावर काँग्रेस नेत्यांनी मौन बाळगले. दोन राज्यांमधली स्थिती पाहणे महत्त्वाचे ठरेल. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी या प्रश्नाला कशा प्रकारे हाताळत आहे? भाजपला माहीत आहे की शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांत असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळेच राज ठाकरे भोंग्यांसारखे मुद्दे उकरून काढत आहेत. जे शिवसेनेने त्यांच्या भूतकाळात केले आहे. हेच कर्नाटकातही होईल.

सध्या एकही प्रमुख पक्ष असा नाही, की जो रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्टी आयोजित करेल. आपण मुस्लिम मतांशिवाय जिंकू शकतो हे भाजपने त्यांच्या विरोधी पक्षांना दाखवून दिले आहे. याचा परिणाम या पक्षांवर इतका झाला आहे, की ते आता मुस्लिमांचा न्याय्य प्रश्न असला तरी तिकडे फिरकत नाहीत. राजकीय बुलडोझरने राजकीय कल्पनाशक्तीला चिरडून टाकले आहे. त्यांना इस्लामोफोबिक बनवून टाकले आहे. ज्यामुळे ते स्वतःला मुस्लिमांशी जोडून घेऊच शकत नाहीत आणि तरीही भारतीय धर्मनिरपेक्षेतला आणि स्वतःला भाजपपासून वाचवण्यासाठी त्यांनी आपल्याला मतदान करावे असे या पक्षांना वाटते. ही आजची भारताची राजकीय स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com