अशी बोलते माझी कविता (शीला जोशी)

शीला जोशी, वासिंद (ठाणे) ९६०४६१४५६१
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

सुखाची मैफल

आज सुखाची मैफल झडली

जुळल्या तारा भवबंधाच्या
सूरही जुळले सद्भावाचे
मने सुगंधाने दरवळली

‘मी-तू’पण हे भाव निमाले
विद्वेषाचे पंख गळाले
प्रेमाश्रूंनी धरती भिजली

काळ लाजला, काळ हासला
झाले गेले, सुटे अबोला
स्नेहाची मधुधून नादली

सरो न केव्हा भाग्य आजचे
ठरो न केवळ स्वप्न रात्रिचे
चिरंतनाची आस लागली

आज सुखाची मैफल झडली...

सुखाची मैफल

आज सुखाची मैफल झडली

जुळल्या तारा भवबंधाच्या
सूरही जुळले सद्भावाचे
मने सुगंधाने दरवळली

‘मी-तू’पण हे भाव निमाले
विद्वेषाचे पंख गळाले
प्रेमाश्रूंनी धरती भिजली

काळ लाजला, काळ हासला
झाले गेले, सुटे अबोला
स्नेहाची मधुधून नादली

सरो न केव्हा भाग्य आजचे
ठरो न केवळ स्वप्न रात्रिचे
चिरंतनाची आस लागली

आज सुखाची मैफल झडली...

Web Title: shila joshi's poem

टॅग्स