भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? (शिवराज गोर्ले)

शिवराज गोर्ले
बुधवार, 8 मे 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा "सकाळ पुणे टुडे"मधील "Edu" या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
आयुष्यात यश मिळवण्याचे असंख्य मार्ग असतात आणि तुम्हाला यशाकडं घेऊन जाणाऱ्या अशा कितीतरी (वेगळ्या) क्षमता असतात. ज्या ‘आय क्‍यू टेस्ट’मध्ये मोजल्या जाऊ शकत नाहीत,’ असं ठामपणे प्रतिपादन करून गार्डनर यांनी ‘बहुविध बुद्धिमत्तां’चा सिद्धान्त मांडला आणि मानवी बुद्धिमत्तेला ठोकळेबाज आयक्‍यू टेक्‍समधून बाहेर काढलं. ‘स्वविषयक बुद्धिमत्ता व परस्परसंबंधांतील बुद्धिमत्ता’ या क्षमता गार्डनर यांनी ‘व्यक्तिगत क्षमतां’मध्ये अंतर्भूत केल्या होत्या, ज्या थार्नडाइक यांच्या ‘सामाजिक क्षमतां’शी मिळत्याजुळत्या होत्या. या व्यक्तिगत आणि सामाजिक क्षमतांची तळी पुन्हा एकदा उचलून धरली ती पीटर आणि रॉबर्ट स्टेनबर्ग यांनी. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गणिती किंवा तार्किक प्रज्ञेपेक्षा या क्षमतांची अधिक गरज असते, हे त्यांनी निःसंदिग्धपणे मांडलं. एवढंच नव्हे, तर या क्षमता भावनिक स्वरूपाच्या असतात, हे स्पष्ट करून ‘भावनिक बुद्धिमत्ते’ची कल्पनाही ठोसपणे मांडली आणि अखेर बराच काळ बहिष्कृत ठेवल्या गेलेल्या ‘भावने’ला बुद्धिमत्तेच्या प्रांगणात अधिकृत प्रवेश दिला गेला!

सॅलोव्हो यांनी उलगडलेले भावनिक बुद्धिमत्तेचे घटक वा पैलू असे आहेत 

१) स्वतःच्या भावना ओळखणे - होय, अनेकदा आपल्याला स्वतःच्या भावनांची यथायोग्य जाणीव नसते. आपल्याला दुःख झालंय की राग आलाय... आपल्या अंतरीच्या खऱ्या भावना ओळखता येणं, त्या आधारे विचार करून योग्य निर्णय घेता येणं हे भावनिक शहाणपणाचं लक्षण ठरतं. आपल्याला नेमकं काय हवं आहे, हे कळल्याशिवाय त्या दृष्टीनं प्रयत्न होत नाहीत. ज्यांना ते कळतं ते मात्र सहजतेनं व आत्मविश्‍वासानं यशाकडं वाटचाल करू शकतात. 

२) भावनांचं नियमन करणे - आपल्या अंतरंगात भावभावनांचा खेळ सतत सुरू असतो. भावना कमी-अधिक तीव्रतेच्या असतात. परिस्थितीही सतत बदलत असते. या सर्व चढउतारात आपल्या भावना पुरेशा नियंत्रणात ठेवणं, त्या योग्य रीतीनं हाताळणं गरजेचं असतं. ज्यांना हे साधत नाही, ते चटकन निराश, चिंताग्रस्त होतात. मात्र ज्यांच्याकडं हे कौशल्य असतं, ते स्वस्थपणे, शांतपणे विचार करू शकतात. योग्य कृती करू शकतात व प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivraj gorle article on emotional intelligence edu supplement sakal pune today