मुखवट्यांची दुनिया

सद्‌गुणी माणसाचा मुखवटा घालून आपली जगण्याची धडपड चालू असते. यात किती वेळा आपण खोटं बोलतो याला काही मर्यादाच नाही; तरीसुद्धा या मुखवट्यात आपण आनंद अनुभवतो.
Masks
Maskssakal
Summary

सद्‌गुणी माणसाचा मुखवटा घालून आपली जगण्याची धडपड चालू असते. यात किती वेळा आपण खोटं बोलतो याला काही मर्यादाच नाही; तरीसुद्धा या मुखवट्यात आपण आनंद अनुभवतो.

- शोभना कसबेकर, shobhana.kasbekar@gmail.com

सद्‌गुणी माणसाचा मुखवटा घालून आपली जगण्याची धडपड चालू असते. यात किती वेळा आपण खोटं बोलतो याला काही मर्यादाच नाही; तरीसुद्धा या मुखवट्यात आपण आनंद अनुभवतो. विद्वत्तेचा मुखवटा घालून सुखावतो. आपल्याला बरं नाही, हे सांगायला कोणालाच आवडत नाही. सर्व ठीक असल्याचा आव चेहऱ्यावर आणतो.

मुखवटा म्हणजे मनोरंजनाचे साधन ही ओळख नेहमीच सामान्यजनांच्या जीवनाला झालेली आहे. नाटकात, लोकनाट्यात, सण साजरे करताना, नृत्यांगना आपली कला पेश करताना या मुखवट्यांचा वापर करत असतात. यातून आपण मजेचा स्वाद घेत असतो. रामलीलातील मुखवट्यांचे आपल्याला नेहमीच आकर्षण वाटते. काही मुखवटे पारंपरिक पद्धतीने वापरले जातात. गुप्तहेर, गुन्हेगार आपली ओळख लपवण्यासाठी मुखवटे घालून आपली कामे साधून घेतात.

खरे तर आपण सर्व जणच रोजच्या आयुष्यात कुठला न कुठला मुखवटा घालून वावरत असतो. आपल्यात काहीना काही विशेष आहे, हे दाखवण्याचा अट्टहास चालूच असतो; पण प्रत्यक्षात आपले विचार महत्त्वाचे आहेत, याची जाण आपल्यात नसतेच मुळी. विचारांचे तर आपल्या मनाशी फार जवळचे नाते आहे. आपली स्वप्नं, मनातील योजना हे मन प्रत्यक्षात उतरवत असते. इतकंच काय आपलं आरोग्य, आनंद, भावना या मनात दडलेल्या असतात. एकदा का मनान ठरवलं की सगळ्या कामना पूर्णत्वाला न्यायची ताकद या मनात भरलेली आहे, हीच असते मनाची खरी शक्ती.

असं असूनही आपण मुखवटे घालून का जगतो, हा प्रश्न मनाला सतावतो. स्वतःच्या मनासारखं जगणं आणि वागणं का नाही जमत आपल्याला? आपल्या विचारांची, जीवनाची खरी ओळख जगाला करून द्यायला आपण का घाबरतो? याच उत्तर मिळत नाही. आपण सर्वांसारखं जगणं पसंत करतो. यासाठी आपल्या मनाविरुद्धही जायला तयार होतो. कारण तसं केलं नाही, तर आपण जगावेगळं होऊ, ही भीती वाटत असते. थोडक्यात काय, तर आपण दुसऱ्यासाठी जगत असतो. दुसऱ्यांना काय वाटेल, हा विचार महत्त्वाचा ठरतो. हेच बाळकडू नंतरही मुलांना दिले जातात. आपली फसगत होते. कालांतराने मुखवटे घालून जगल्यामुळे आपला खरा चेहरा कोणालाच ओळखता येत नाही. काय हवं याचाही विसर पडतो.

नाटक मुखवट्यांचं जग या नावाने ओळखले जाते. प्रत्येक नटाला दिलेल्या भूमिकेला साजेसा मुखवटा घालता आला पाहिजे, ही प्रेक्षकांची अपेक्षा असते. याच्यावरच नाटकाचे यश अवलंबून असते आणि तसे झाले नाही, तर नटावर भूमिका नैसर्गिक वाटली नाही, अशी टीका केली जाते. यावरून मुखवटे आपले व्यक्तिमत्त्व किती बदलू शकतात, हे कळते.

सद्‌गुणी माणसाचा मुखवटा घालून आपली जगण्याची धडपड चालू असते. यात किती वेळा आपण खोटं बोलतो, याला काही मर्यादाच नाही; तरीसुद्धा या मुखवट्यात आपण आनंद अनुभवतो. विद्वत्तेचा मुखवटा घालून सुखावतो. कुठलीही गोष्ट मला येत नाही, सांगायला लाज वाटते. तसंच आपल्याला बरं नाही, हे सांगायला कोणालाच आवडत नाही. कळू नये म्हणून आपण सर्व ठीक असल्याचा आव चेहऱ्यावर आणतो. आपला आजार लपवतो, यात आपलंच नुकसान होतं. अशी अनेक उदाहरणं आपल्या दैनंदिन जीवनात बघायला मिळतात.

शेअर बाजारात तर या मुखवट्यांची चिरफाड होतच असते. स्वप्नातली एखादी कंपनी काही काळासाठी भरपूर पैसा मिळवून देते. आणखी पैसे गुंतवण्याच्या जाळ्यात अडकवते. यामागचे राजकारण आपल्याला कळत नसते; पण काही वर्षातच हा फुगा फुटतो, जो मुखवटा असतो व कपाळावर हात मारून घ्यायची पाळी येते. निवडणुका जवळ आल्या की मुखवट्यांची रेलचेल असते. प्रत्येक नेता सत्तास्पर्धेत नवीन मुखवटा घालून वावरताना दिसतो. यामुळे या नेत्यांवर आपला विश्वासच बसत नाही. राजकारणात एकापेक्षा अधिक मुखवटे घालून नेत्यांना वावरावे लागते. त्यांना कोणता मुखवटा वरचढ मानायचा, हे ठरवण्याची कला शिकणे आवश्यक असते, तरच यश हातात येते.

लहान मुलांचे आपल्याला आकर्षण वाटते कारण ती निष्पाप, निरागस असतात. त्यांच्या चेहऱ्यावर असलेले हास्य आनंद देते, कारण ते प्रामाणिक असते, खरे असते. त्यांच्या बोलण्यात आपण रमून जातो. प्राणीसुद्धा मुखवटा न घालता जगतात. यामुळेच पाळीव प्राणी आपला एकटेपणा घालवतात. दिलासा देतात.

शेक्सपिअरांनी जगाला रंगभूमीची उपमा दिली आहे, ती याच कारणाने; पण वयाच्या उत्तरार्धात मात्र हे मुखवटे नकोसे वाटतात. ते न घालता जगणे अवघड आहे, ही शोकांतिका आहे. ‘ऑल इज वेल’चा मुखवटा घालून जगणे कितपत शक्य आहे, याचा आपण कधी विचार केला आहे का? हे खोटं जगणं आहे. अशा जगण्यात आपल्या मानसिक भावना गुदमरल्या जातात. आपण मानसिक शांती समाधान गमावतो. अस्सल चेहऱ्याचे लोक आहेत म्हणून आज जगणे सुखकर झाले आहे. जेव्हा हे मुखवटे गळतात तेव्हा आपला भ्रमनिरास होतो. वास्तव ओळखणं कठीण जाते आणि आत्मविश्वास गमावून बसतो.

यासाठी आत्ताच सावध व्हा. दुसऱ्यांच्या मताला किती महत्त्व द्यायचे, हे ठरवा. चेहरा व मुखवटा यातील द्वंद्वयुद्ध सहन होणार नाही, या क्षणांची वाट पाहू नका. असली चेहऱ्याने जगा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com