अशी बोलते माझी कविता (श्रीपाद जोशी)

श्रीपाद जोशी ९७३०७३०२२२, मुपो ः केलवड, (ता. राहाता, जि. नगर) shripadjoshi17@gmail.com
रविवार, 19 मार्च 2017

पश्चिमेस हा सूर्य...

पुन्हा नव्याने डाव मांडल्यावरती
झाली आहे हार जिंकल्यावरती

मर्यादांचा प्रदेश समजुन आला
तुझ्या किनारी लाट थडकल्यावरती...

काच तडकली होती आकाशाची
खोल दरीतुन सूर्य उगवल्यावरती

टाकेसुद्धा किती किती हळहळले...
पुन्हा एकदा वीण उसवल्यावरती...

पोकळतेचे टोक टोचता फुटला
फुगा दूरवर उंच उडवल्यावरती

मीही थोडा खेटुन बसलो होतो
शेजारी ती माझ्या बसल्यावरती!

काय नेमके मागे उरले आहे...?
इथले आता सगळे सरल्यावरती...?

पश्चिमेस हा सूर्य...

पुन्हा नव्याने डाव मांडल्यावरती
झाली आहे हार जिंकल्यावरती

मर्यादांचा प्रदेश समजुन आला
तुझ्या किनारी लाट थडकल्यावरती...

काच तडकली होती आकाशाची
खोल दरीतुन सूर्य उगवल्यावरती

टाकेसुद्धा किती किती हळहळले...
पुन्हा एकदा वीण उसवल्यावरती...

पोकळतेचे टोक टोचता फुटला
फुगा दूरवर उंच उडवल्यावरती

मीही थोडा खेटुन बसलो होतो
शेजारी ती माझ्या बसल्यावरती!

काय नेमके मागे उरले आहे...?
इथले आता सगळे सरल्यावरती...?

पुन्हा नव्याने काही सुचले नाही
कवितेमधुनी तुला वगळल्यावरती...

घाटांचा तो प्रवास अनवट होता...
पश्‍चिमेस हा सूर्य सरकल्यावरती

Web Title: shripad joshi write poem in saptarang