‘तंदुरुस्ती’ हा आयुष्याचाच पैलू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

 स्लिम फिट - करिष्मा कपूर, अभिनेत्री
तंदुरुस्त असणे हा आपल्या आयुष्याचाच एक पैलू आहे. त्यामुळे मी स्वतःसोबतच माझ्या मुलांच्या खाण्यावरही विशेष लक्ष देते. प्रेग्नन्सीनंतर माझे वजन खूपच वाढले होते. ते कमी करणे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. मला खूप बारीक व्हायचे नाहीये, त्यामुळे मी माझ्या वजनाचा खूप जास्त विचार करत नाही. यासाठीच मी सतत भाजीपाला, सलाड वगैरे खात नाही. मी दिवसातून ४ ते ५ वेळा खाते आणि प्रत्येक जेवणामध्ये दोन ते तीन तासांचे अंतर ठेवते. एखाद्या वेळेस मला एखादा पदार्थ आवडल्यास तो मी खाते, मात्र नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, ‘योग्य खा आणि नियमित व्यायाम करा.’ यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहाल. दररोज संध्याकाळी मला काहीतरी स्पाइसी खायची इच्छा होते. मात्र, अशा वेळी मी बदाम आणि केळी खाते. यामुळे माझे पोट भरलेले राहते आणि इतर गोष्टींवर असलेले लक्ष माझे निघून जाते. 

फिटनेस माझ्यासाठी एखाद्या व्यसनासारखे आहे. वर्कआऊट तुम्हाला नेहमी आनंदी आणि उत्साही ठेवतो. त्याचबरोबर सतत सकारात्मक राहण्यासही मदत होते. कारण, तुम्ही कशा पद्धतीने विचार करता याचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यासाठी मी रोज एक तास योगासने करते. माझी मुले खेळत किंवा झोपलेली असतात, त्या वेळी मी व्यायाम करायला जाते. मला चालायला सर्वांत जास्त आवडते. मी माझ्या बिल्डिंगच्या आवारात किंवा बागेमध्ये रात्रीची चालायला जाते. नाहीच जमले, तर ट्रेडमिलवर चालते. प्रत्येक दिवशी आपण काही ना काही व्यायाम हा केलाच पाहिजे, मग ते चालणे असो वा दोरी उड्या, धावणे वा जिम करणे. व्यायाम आपल्याला नेहमीच फिट ठेवण्यास मदत करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slim Fit Karishma Kapoor maitrin supplement sakal pune today