डाएट बॅलन्स हेच सिक्रेट

Shiwani-Rangole
Shiwani-Rangole

स्लिम फिट - शिवानी रांगोळे, अभिनेत्री
मी स्वतःला फिट ठेवण्यासाठी फिटनेसकडे फारच लक्ष देते. सकाळी उठल्यानंतर अगदी योगाचे सर्व प्रकार नाही तर, एक दोन प्रकार करते.

त्यानंतर सकाळी ६.३० ते ७.३० नियमित जिमला जाते. दिवस-रात्र चित्रीकरण असले, मी खूप दमले असले, तरीही जिमला जायचे कधीच चुकवत नाही. जिममध्ये गेल्यावर मला लेग एक्‍सपरिमेंट करायला फार आवडतात. शिवाय कार्डिओही मी न चुकता करते. पुण्यातल्या माझ्या घरी असताना सकाळी मैत्रिणींसोबत आमच्या जवळच्या टेकडीवर चालायलाही जाते. जिमबरोबरच डाएट बॅलेन्स करणे हेच माझ्या निरोगी आणि तंदुरुस्त शरीराचे सिक्रेट आहे. मी जिमइतकीच डाएटच्या बाबतीतही सजग आहे. डाएट तंतोतंत पाळत असल्याने माझ्या आहारात ब्रेड, भात पूर्णतः टाळते.

शिवाय मला गोड पदार्थ आवडत असल्यास ते मी फार कमी प्रमाणात खाते. गोड पदार्थांची चाहती असल्याने पटकन त्याकडे दुर्लक्ष करणे मला जमत नाही. सकाळी जिममधून आल्यावर मी पोळी-भाजी असा आहार नियमित करते. त्याचसोबत ग्रीन सलाड, फळे ही असतात. भात खात नसल्याने मी पोळी खाण्यावर जास्त भर देते. वर्कआउट करून स्वतःला मेंटेन करता आले तरी आहार कमी घेऊन चालत नाही. योग्य तेवढा आहार रोजच्या रोज घेणे आवश्‍यक आहे. मेडिटेशनच्या बाबतीत सांगायचे तर चित्रीकरणामुळे मेडिटेशन करायला खरच वेळ मिळत नाही, मात्र पुस्तके वाचून आणि गाणी ऐकून माझे स्वतःचे एकप्रकारे मेडिटेशनच होते. स्ट्रेस दूर करण्यासाठी मला पुस्तके वाचणे योग्य वाटते.

व्यायाम वगैरे प्रकार चित्रपटसृष्टीत येण्याआधीपासून करत होते. मात्र चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर मी माझ्या शरीराकडे बारकाईने लक्ष देऊ लागले. आता या क्षणी मला एवढेच वाटते की, मी मेंटेन केलेले माझे शरीर मला आहे तसेच ठेवायचे आहे. आता मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत काम करत आहे, या मालिकेसाठी माझी भूमिका वेगळ्या धाटणीची असल्याने त्यासाठी मला फिटनेसच्या बाबतीत फार मेहनत घ्यावी लागली नाही. एकूणच काय तर बॅलेन्स डाएट आणि जिम या दोन गोष्टी मी कटाक्षाने पाळते.
(शब्दांकन - स्नेहा गांवकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com