जिमपेक्षा योगा करणे चांगले

ऐश्‍वर्या राय-बच्चन
सोमवार, 3 जून 2019

स्लिम फिट -ऐश्‍वर्या राय-बच्चन, अभिनेत्री 
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" या पुरवणीत...

स्लिम फीट - ऐश्‍वर्या राय-बच्चन, अभिनेत्री 
प्रेग्नन्सीच्या काळात माझे वजन खूप वाढले होते. हे वाढलेले वजन कमी करण्याचे आव्हान माझ्यासमोर होते. पण वजन कमी करणे ही काही खूप मोठी गोष्ट आहे, असे मला वाटत नव्हते. त्यामुळे मी माझ्या फिगरबाबत आनंदी होते आणि लगेचच मी माझ्या आधीच्या फिगरवर यावी, अशी घाईही मला नव्हती. मला वाढलेले वजन घाईघाईने ऐवजी शिस्तबद्ध पद्धतीने कमी करायचे होते. 

मी सर्वप्रथम जेवणात बदल केले. सकाळी नाश्‍त्यामध्ये जास्त फायबर असलेले ओटमील व ब्राऊन ब्रेड असा आहार घेते. दुपारच्या जेवणात २ चपाती, डाळ किंवा हिरव्या पालेभाज्या, एक वाटी भात आणि सलाड घेते. तर रात्रीच्या जेवणात १ चपाती, डाळ किंवा भाजी आणि सलाड असा आहार घेते. आहाराच्या बाबतीत मी एक नियम पाळते, तो म्हणजे नेहमी घरी बनवलेलेच अन्न खायला प्राधान्य देते. मला स्वयंपाक करायला आवडतो, त्यामुळे मी जास्तीत जास्त स्वतः बनवून खात असते. संध्याकाळी नाश्‍ता करण्याऐवजी फळे किंवा फळांचा रस घेते. फळांचा रस आणि फळे खाल्ल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. 

मी वर्कआऊटसाठी कधीच जिम करत नाही. जिमपेक्षा योगा करणे कधीही चांगले. दिवसातून दोन वेळा ४५ मिनिटे योगा करण्याला पसंती देते. स्टॅमिना वाढविण्यासाठी मी चालते किंवा पळते. कधीतरी धावणे, पळणे अशाही गोष्टी करते. तसेच शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम मी करीत असते. दिवसभरात किमान ८ ग्लास पाणी मी पिते. यामुळे केस चांगले राहतात, तसेच त्वचाही चांगली राहण्यास मदत होते. त्वचेची चमक टिकून राहण्यासाठी मी रोज एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध घेते. सकाळचा नाश्‍ता भरपूर घेते, जेणेकरून दिवसभर एनर्जी लेव्हल टिकून राहते. रात्रीचे जेवण मात्र मी तुलनेने कमी घेते. तसेच मी ब्राऊन राइस खाते, जो पांढऱ्या भातापेक्षा जास्त पौष्टिक असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slim Fit Talk aishwarya rai bachchan Maitrin Supplement Sakal Pune Today