समाजसेवेचा महा'संकल्प'

राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे चिरंजीव एवढीच कुणाल राऊत यांची ओळख
social service Nitin Raut son Kunal Raut Youth Congress
social service Nitin Raut son Kunal Raut Youth Congresssakal

समाजातील गोरगरीब, दलित, वंचित, उपेक्षित आणि तळागाळातील नागरिकांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच आपली ध्येयधोरणे राबवली आहेत. त्या ध्येयधोरणांमुळेच काँग्रेस पक्षावर सर्वसामान्य जनतेचा आजही विश्वास कायम आहे. काँग्रेसमधील नेतृत्वच देश आणि राज्याला पुढे नेऊ शकते, अशी भावना युवा वर्गातही निर्माण झाली आहे. म्हणूनच आजचे युवक काँग्रेसकडे आकर्षित होऊ लागले आहेत. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या संघटनात्मक निवडणुकीतून ही बाब पुढे आली... कुणाल राऊत नावाने एक नवे नेतृत्व त्यातून उदयास आले. आपल्या हक्काचा एक जिवाभावाचा माणूस अध्यक्षपदी असल्याने युवक काँग्रेसमध्ये नवचैतन्याचे वारे वाहू लागले आहेत.

आगामी काळात युवक काँग्रेसचे नेतृत्व विदर्भ आणि खास करून नागपुरातील नव्या दमाच्या तरुण नेत्याकडेच असले पाहिजे, असा स्पष्ट कौल नुकत्याच झालेल्या निवडणुकीत युवा मतदारांनी दिला. साहजिकच कुणाल राऊत यांच्या पारड्यात तब्बल पाच लाखांहून अधिक मते पडली आणि ते युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. अखिल भारतीय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन राऊत यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची घोषणा केली. त्यामुळे नागपुरातील काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. कुणाल राऊत यांच्या रूपाने युवक काँग्रेसला नव्या दमाचे उच्चशिक्षित असे नेतृत्व लाभल्यामुळे आगामी काळात काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे. राऊत यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता समस्त काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि राज्यातील तरुणांना लागली आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे चिरंजीव एवढीच कुणाल राऊत यांची ओळख अजिबात नाही. अगदी लहानपणापासूनच त्यांनी राजकारणाचे धडे घेतले आहेत. वडील डॉ. नितीन राऊत यांच्या शांत अन् संयमी स्वभावाच्या अगदी विपरीत कुणाल राऊत यांचा थोडा आक्रमक; पण कृतिशील बाणा आहे. दलित, शोषित, वंचित, पीडित आणि सर्वसामान्य जनतेसाठी स्वतः झोकून देत काम करण्याची तडफ कुणाल यांच्यात आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून काम करताना त्यांनी तरुणांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या बेरोजगारी विषयाला हात घातला. नागपूर शहरातील मेट्रोमध्ये स्थानिक बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसह जोरदार आंदोलन केले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. केवळ नागपूरच नव्हे; तर स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचा दौरा करून जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. स्थानिक तरुणांना नोकरी मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याची भूमिका घेतली.

कुणाल राऊत यांनी समाजातील सर्व स्तराच्या लोकांना सोबत घेऊन एखाद्या प्रगल्भ नेतृत्वाप्रमाणे संवेदनशीलता दाखवली. वडिलांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा जपतानाच सामाजिक भानही राखले. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या आधारावर अगदी कमी वयात लोकप्रियता मिळवून त्यांनी आपल्या नेतृत्व गुणांची वेगळीच चुणूक दाखवली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत कुणाल राऊत कधीही नेता म्हणून वागले नाहीत. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखाला रात्री-अपरात्री धावून गेले. कुणाल आमच्यासाठी एक जिवाभावाचा सच्चा दोस्त आणि हक्काचा माणूस आहे, अशी भावना युवक काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची आहे.

शिक्षणाचा ध्यास

विद्यार्थिदशेपासूनच कुणाल राऊत यांनी विविध सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करून ते सोडवण्याचा ध्यास घेतला. नागपूर आणि पुणे विद्यापीठात पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात, त्या कशा सोडवल्या पाहिजे, यासाठी त्यांनी अनेक नवे मार्ग चोखाळले. ते केवळ पदवीचे शिक्षण घेऊन थांबले नाहीत, पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांपैकी एमबीए फायनान्स आणि पदव्युत्तर मास कम्युनिकेशनचे शिक्षणही त्यांनी घेतले.

वडिलांकडून शिकवण

काँग्रेस पक्षच गोरगरिबांचा वाली असून देशात पुन्हा त्यांची सत्ता येण्यासाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मोठे काम करण्याचा संकल्प कुणाल राऊत यांनी हाती घेतला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे. परिस्थिती कुठलीही असो, स्वत:च्या ध्येयासाठी झपाटून काम करण्याची धमक त्यांच्यात आहे. राजकारणात अस्तित्व राखण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही, अशी खूणगाठ बांधून त्यांनी कार्यकर्त्यांना दिशा दिली. आपल्यासोबत फक्त कार्यकर्ते जोडायचेच नव्हे; तर ते टिकवण्याची शिकवणही त्यांनी वडील डॉ. नितीन राऊत यांच्याकडून घेतली.

कोरोना काळात गरजूंना आधार

कोरोना काळात नागपुरातील परिस्थिती खूपच चिंताजनक होती. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. घरोघरी कोरोनाचे रुग्ण सापडत होते. अनेकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमवावे लागले. लॉकडाऊनमध्ये तर गरिबांच्या खाण्यापिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. काहींची तर अन्नपाण्याविना मरणासन्न स्थिती झाली होती. या काळात कुणाल राऊत यांनी शहर आणि परिसरात तीन क्वारंटाईन केंद्रे सुरू करून गोरगरिबांची मदत केली. त्यासाठी त्यांनी आपल्या जिवाची पर्वा केली नाही. प्रसंगी कठीण परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला मदत केली. युवक काँग्रेस आणि स्वतःच्या ‘संकल्प’ सेवाभावी संस्थेच्या मदतीने त्यांनी गरजूंना दररोज अन्नपदार्थांच्या २५ हजार पाकिटांचे वाटप केले. कोरोनामुळे आधार गमावलेल्या कुटुंबाला आर्थिक साह्य दिले. त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी मदत केली.

युवक काँग्रेसचे नागपूर शहर उपाध्यक्ष धीरज पांडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पांडे यांना कोरोनातून वाचवण्यासाठी कुणाल राऊत यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापासून चांगले उपचार मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दुःखाच्या प्रसंगात मित्र, सहकारी आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा कुणाल यांचा जन्मजात स्वभाव असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच आप्तेष्ट, मित्र, सहकारी आणि चाहत्यांचीही ते मनापासून काळजी घेतात. प्रत्येकाच्या सुख-दुःखाच्या प्रसंगात धावून येतात, अशा शब्दांत पक्ष कार्यकर्ते कुणाल यांच्याविषयी भरभरून आणि अभिमानाने बोलतात.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्त्वांना अनुसरून कुणाल राऊत यांनी देश व राज्याची सेवा करण्याचा वसा घेतलेला आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर येणाऱ्या चार लाख भाविकांसाठी कुणाल यांच्याकडून भोजनदान कार्यक्रम घेतला जातो. दुष्काळ, अतिवृष्टीच्या काळात कुणाल यांनी विदर्भाच्या काही जिल्ह्यांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या व्यथा व प्रश्न जाणून घेत शासनाकडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला.

मित्र-सहकाऱ्यांसह गरजेच्या वेळी सर्वांसाठी धावून येणारा नेता अशीच कुणाल राऊत यांची ओळख असल्यानेच युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांना तब्बल पाच लाख ४८ हजार २६७ इतकी भरभरून मते मिळाली. ही लोकप्रियता अशीच कायम ठेवत कुणाल राऊत युवक काँग्रेसचे अध्यक्षपद समर्थपणे भूषवतील, असा आपला ठाम विश्वास आहे आणि तो ते नक्कीच सार्थ ठरवतील, असे पक्ष कार्यकर्ते आवर्जून सांगतात.

नेता कसा असावा, या प्रश्नाचे उत्तर शोधले तर समाजाविषयी अत्यंत कळवळा, सहानुभूती, निष्ठेने काम करण्याची वृत्ती, जिद्द, परिश्रम, संयम, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाण्याची भावना नेत्याच्या अंगी असावी लागते. कुणाल राऊत यांच्या अंगी नेतृत्वाचे सर्व गुण असल्यामुळेच युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे त्यांच्याकडून विद्यार्थी, युवकांचे प्रश्न सुटतील यासाठी महाराष्ट्रातील तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

कुणाल राऊत यांच्यात भविष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता व दूरदृष्टी आहे. बौद्ध संस्कृतीमधील सम्यक वाचेचा उत्तम संस्कार आहे. आदर्श समाज निर्मितीसाठी रचनात्मक व विधायक कार्य करण्याची क्षमता आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी परस्पर समन्वय साधण्याची कला आहे. कुणाल यांनी सम्यक ध्येय आणि विचारशक्तीच्या जोरावर अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद पटकावले.

तथागत गौतम बुद्धांचा संदेश आहे... ‘चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय- बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, धम्म आदी कल्याणं, मध्य कल्याणं, अंतिम पर्यवसान कल्याणम्.’ बुद्धांच्या संदेशाप्रमाणे कुणाल राऊत यांच्या हातून समाजातील गरीब, शोषित, पीडित, वंचित आणि अगदी तळागाळातील व्यक्तींची निःस्वार्थ सेवा घडो. त्यांची भावी राजकीय वाटचाल यशस्वी ठरो, अशाच शुभेच्छा काँग्रेस कार्यकर्ते त्यांना देत आहेत.

संविधानातील तत्त्वांना अनुसरून समाजसेवा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्त्वांना अनुसरून कुणाल राऊत यांनी देश व राज्याची सेवा करण्याचा वसा घेतलेला आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर येणाऱ्या चार लाख भाविकांसाठी कुणाल यांच्याकडून भोजनदान कार्यक्रम घेतला जातो. दुष्काळ, अतिवृष्टीच्या काळात कुणाल यांनी विदर्भाच्या काही जिल्ह्यांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या व्यथा व प्रश्न जाणून घेत शासनाकडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला.

युवक काँग्रेसचा कार्यकर्ता होऊन समाजासाठी धावून जाणारा नागपुरातील युवा नेता म्हणजे कुणाल राऊत. कोरोना काळात नागपुरातील परिस्थिती चिंताजनक असताना नागरिकांमध्ये या महामारीची दहशत होती. गरिबांच्या खाण्यापिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. या काळात कुणाल राऊत यांनी शहर आणि परिसरात तीन क्वारंटाईन केंद्रे सुरू करून गोरगरिबांची मदत केली. युवक काँग्रेस आणि स्वतःच्या ‘संकल्प’ सेवाभावी संस्थेच्या मदतीने त्यांनी गरजूंना दररोज अन्नपदार्थांच्या २५ हजार पाकिटांचे वाटप केले. कोरोनामुळे आधार गमावलेल्या कुटुंबाला आर्थिक साह्य दिले. त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी मदत केली.

- कुणाल राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com