#ManOnMoon50th : नील आर्मस्ट्राँगच्या आत्मचरित्राची गोष्ट!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलेला पहिला मानव म्हणजे  नील आर्मस्ट्राँग! त्यांच्या आत्मचरित्राबाबत काही खास बाबी आहेत... 

नील ए. आर्मस्ट्राँग...

२० जुलै, १९६९ रोजी चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव. त्याने आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत कधीही आपले आत्मचरित्र लिहिले नाही. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव म्हणून आयुष्यभर आर्मस्ट्राँग कार्यक्रमांमध्ये मिरवू शकले असते.

आपले आत्मचरित्र लिहावेसे त्यांना कधीच वाटत नव्हते. मात्र, अभ्यासक व लेखक जेम्स हॅन्सेन यांनी खूप पाठपुरावा केल्यानंतर आर्मस्ट्राँग यांनी आपले चरित्र लिहिण्याची परवानगी हॅन्सेन यांना दिली. या चरित्राची प्रक्रिया १९९९ च्या आॅक्टोबरमध्ये सुरु झाली.

Neil

हॅन्सेन यांनी पहिल्यावेळी जेव्हा आर्मस्ट्राँग यांना पत्र लिहिले तेव्हा आपल्याला वेळ नाही सांगत आर्मस्ट्राँग यांनी त्यांना टाळले. पण हॅन्सेन यांनी आपण लिहिलेली पुस्तके आर्मस्ट्राँग यांना पाठवण्याचा सपाटा सुरु ठेवला. त्यातले एक पुस्तक आर्मस्ट्राँग यांना आवडले आणि मग त्यांनी हॅन्सेन यांना आपले चरित्र लिहिण्याची परवानगी दिली. त्यापूर्वी ही मोहिम व आर्मस्ट्राँग यांचे जीवन याच्यावर अनेक लेखकांनी लिहिले होते. मात्र, हॅन्सेन यांनी लिहिलेले हे पुस्तक चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या मानवाचे अधिकृत चरित्र ठरले. नील आर्मस्ट्राँग यांच्या या चरित्राचे नाव आहे 'फर्स्ट मॅन : द लाईफ ऑफ नील ए. आर्मस्ट्राँग'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special information about Neil Armstrong on his autobiography