फरक अनसूया आणि असूयेमधील...

Eye
Eye

चेतना तरंग
आपल्या जाणिवेच्या प्रत्येक पातळीवर ज्ञान वेगळे असते. तुम्ही जाणिवेच्या एका विशिष्ट पातळीवर अनसूया होता. अनसूया म्हणजे फक्त दोषच शोधणारी दृष्टी टाळणे. उदाहरणार्थ, आरशावर धूळ असल्यास ती स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला पुसण्यासाठी फडके लागेल. मात्र, तुमच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला असल्यास फडक्‍याने आरशावरील धूळ स्वच्छ केली, तरी काही उपयोग होणार नाही. तुम्हाला पहिल्यांदा मोतीबिंदू दूर करावा लागेल.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतरच तुम्हाला आरसा स्वच्छ दिसेल. समोरच्या व्यक्तीतील केवळ दोषच शोधणारी विशिष्ट मनोवृत्ती काही जणांमध्ये असते. अगदी जगातील सर्वोत्तम गोष्ट, परिस्थितीमध्येसुद्धा असे लोक दोषच शोधतात. अगदी शक्‍य असलेला सर्वोत्तम सहकारी किंवा सर्वोत्तम चित्रामध्येही त्यांना काहीतरी चुकीचेच दिसते. अशा प्रकारच्या मनोवृत्तीला पवित्र ज्ञानच माहीत नसते. श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले होते की, तू अनसूया असल्याने मी तुला राजसी गुपित सांगतोय. तू इतक्‍या जवळ असूनही माझ्यामध्ये दोषच शोधतोय. दूरवरून खड्डा दिसत नाही, अगदी मऊ पृष्ठभागावरही छिद्रे असू शकतात. तुम्हाला केवळ छिद्रांमध्येच रस असल्यास तुम्हाला उदात्तता दिसणार नाही. तुम्ही अनुसयेच्या अवस्थेत नसल्यास तुमच्यामध्ये ज्ञानही बहरणार नाही. त्यामुळे, ज्ञान देण्याचा तर मुद्दाच येत नाही.
 
भेदभावाच्या दृष्टीवर उपाय काय?
तुमच्या दृष्टीमध्येच भेदभाव असल्यास तुमच्या नजरेस तो पडणारच. तुम्ही एखाद्या मार्गाबाहेर पडताच प्रत्येक गोष्ट चुकीची वाटू लागते. मात्र ही अनसूया नव्हे. उदाहरणार्थ, तुमची एखाद्याबरोबर मैत्री असते. तुम्ही दहा वर्षांनंतर ती तोडण्याचा निर्णय घेता. अशावेळी तुम्ही तुमच्या मैत्रीच्या नात्यातील चांगले पाहत नाही. तुम्ही केवळ दोषच पाहता. याला असूया म्हणायचे. तथापि, आपली दृष्टी चुकीची आहे, याचा एकदा शोध लागल्यावर त्याचक्षणी अर्धी चुकीची दृष्टी नष्ट होते. येथे एक सुरेख रेषा आहे. त्यासाठी मोतीबिंदूपेक्षा दुसरे समर्पक उदाहरण असू शकत नाही. ‘माझी दृष्टी अंधूक आहे,’ असे म्हणण्याऐवजी तुम्ही ‘हे अख्खे जगच स्पष्ट नाही,’ असे म्हणता.

समजा तुमच्या घरी कुणीतरी येत आहे आणि वाऱ्यामुळे तुम्ही दरवाजे बंद केले तर आपण येत असतानाही आपल्यासमोर दरवाजे बंद केले असा विचार ती व्यक्ती करते, हेही असूयेचेच उदाहरण. तुम्हाला यासारख्या अनेक व्यक्ती आजूबाजूला दिसतील. केवळ दोष शोधणे म्हणजेच असूया होय. हे एखाद्या मुलाने आपल्या आईला तू माझ्यावर प्रेम करत नाहीस, असे म्हणण्यासारखेच आहे. येथे मुलाची दृष्टी चुकीची आहे. जन्मदाती माताच आपल्या मुलावर प्रेम करत नसेल, तर कोण करणार? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com