..उद्या तुमच्या-माझ्या गल्लीत बलात्कार होईल..तेव्हा..?

शनिवार, 14 एप्रिल 2018

उन्नाव व कठुआ या दोन ठिकाणी झालेल्या अमानुष बलात्कारानं सगळा देश हादरला आहे.. आपण सर्वांनीच त्याबद्दल ऐकलं, वाचलं आणि कदाचित सोडूनही दिलं..! आपल्या संवेदनाच बोथट झाल्या आहेत का, असा प्रश्न आता पडत आहे. मेंदूला झिणझिण्या याव्या, असा प्रकार घडतोय आणि आम्ही आज यावर व्यक्त झालो नाही, याला विरोध केला नाही, मुकाट्यानं असंच सहन करत बसलो, तर मुंबई-दिल्लीत घडणार्‍या घटना तुमच्या-माझ्या गल्लीत घडायला वेळ लागणार नाही..

'स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे.. ही विकृत मानसिका बदलविण्याची जबाबदारी आता आम्हा युवकांवर आहे. आम्ही त्यावर बोलले पाहिजे.. बोलू शकत नसलो, तर कमीत कमी जे यावर आवाज उठवत आहेत त्यांना साथ द्यायला हवी, एवढी माफक अपेक्षा' अशा भावना मांडत सुमित देशमुख या तरुणानं 'यू-ट्युब'वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आवर्जून पाहा आणि व्यक्त व्हा..!

Web Title: Sumit Deshmukh posted a video about Justice for Asifa