अशी बोलते माझी कविता (सुप्रिया जाधव)

सुप्रिया जाधव, पुणे ९४२३१९१३५९, supriya.jadhav7@gmail.com
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

कथानक

दुरून सगळे कुठे कुणाला कळते आहे?
असून चंद्राजवळ चांदणी जळते आहे

झुलवत आहे अतृप्तीच्या लाटेवरती
स्वप्नामधली इच्छापूर्ती छळते आहे

प्रेम प्रेम जे म्हणतो, नक्की काय असावे ?
पुन्हा पुन्हा का पाउल तिकडे वळते आहे ?

सगळे त्याच्या डोळ्यांवरुनी समजत होते...
रात्र सख्याची बनून वैरी ढळते आहे

माध्यान्हीचे चटकेसुद्धा सुसह्य होते
कातरवेळी सगळे त्राणच गळते आहे

टंगळमंगळ पुरे जाहली आता मित्रा
धावत ये ना, मुहूर्तघटिका टळते आहे

कथानक

दुरून सगळे कुठे कुणाला कळते आहे?
असून चंद्राजवळ चांदणी जळते आहे

झुलवत आहे अतृप्तीच्या लाटेवरती
स्वप्नामधली इच्छापूर्ती छळते आहे

प्रेम प्रेम जे म्हणतो, नक्की काय असावे ?
पुन्हा पुन्हा का पाउल तिकडे वळते आहे ?

सगळे त्याच्या डोळ्यांवरुनी समजत होते...
रात्र सख्याची बनून वैरी ढळते आहे

माध्यान्हीचे चटकेसुद्धा सुसह्य होते
कातरवेळी सगळे त्राणच गळते आहे

टंगळमंगळ पुरे जाहली आता मित्रा
धावत ये ना, मुहूर्तघटिका टळते आहे

पहिल्या अर्ध्या भागामध्ये संथ वाटले
दुसऱ्यामध्ये मात्र कथानक पळते आहे

Web Title: supriya jadhav's poem