क्रौर्याचा चेहरा उघडा पाडणारी ‘द लास्ट गर्ल’

- सुवर्णा येनपुरे-कामठे
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

आबाया आणि नकाब घातलेली नादिया दहशतवाद्याच्या घरातून पळाली... ती पळत होती... चेहरा दिसत नसला तरी सर्वत्र इसिसचे दहशतवादी असणाऱ्यांनी तिला सहज पकडले असते. अंधाऱ्या रात्री समोरची पावले दिसणे कठीण झाले, तशी ती थांबली. इथून बाहेर पडायचे म्हणजे कोणाचीतरी मदत घ्यायला लागणार हे नक्की होतं. ती थांबली आणि हात उंचावले... कदाचित ते दहशतवाद्याचं घरही असू शकणार होतं. तिची घरावरची थापच ठरवणार होती, ते भविष्याचं दार आहे की मरणाचं! ती पुढं गेली आणि हिमतीनं एक दरवाजा वाजवलाच!

उत्तरी इराकमध्ये सिंजर जिल्ह्यातील कोचो हे लहानसं यजिदी लोकांचं गाव. इराकमधील यजिंदीची सामुहिक हत्या होईपर्यंत अनेकांना यजिदी हा धर्म आहे, हे माहितही नव्हते. एका लहानशा खेड्यात (कोचो) शेतीच्या उत्पनावर गुजराण करणारे इथे अनेक यजिदी कुटुंब राहत होते. जणू काही अत्याचार करण्यासाठीच त्यांचा जन्म झाला होता, अशाच प्रकारची वागणूक यजिदींना दिली जात होती. सद्दाम हुसैनच्या काळात झालेल्या अत्याचारातून नुकतेच कुठे यजिदी सावरत होते. आताशा त्यांच्यासाठी पोलिसामधील नोकऱ्याही खुल्या करण्यात आल्या होत्या. सद्दाम हुसैनला फासावर चढवल्यानंतर शिया पंथीयांचे राज्य आले. पोलीस, सैनिकी खात्यातल्या नोकऱ्या जास्त घातक असल्या तरी शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून जीवनमान सुधारणार नाही या जाणिवेतून अनेक यजिदी तरुणांनी या नोकऱ्या पकडल्या होत्या.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nadia Murad (@nadia_murad_taha) on

नादिया, थोडीशी हट्टी आणि घरातलं शेवटचं, नववं शेंडेफळ! घरात बहीण, भाऊ, त्यांच्या बायका, सावत्र भाऊ असा मोठा परिवार! नादियाचे वडील शूर होते. त्यांच्या शब्दांना गावाच्या न्यायनिवाडा प्रक्रियेत मोठा सन्मान होता. २००३ साली त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला आणि त्यांची तब्येत खालावली. उंचपूरे, धिपाड असणारे वडील अक्षरशः अंथरुणाला खिळले. मग काहीच दिवसात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. आधीच घरची गरिबी असणारं नादियाचं कुटुंब या परिस्थिती तावून सुलाखून निघालं ते तिच्या आईमुळं! रात्रीचा दिवस करीत तिनं शेत उगवलं. (कोचोत असह्य उन्हाळा असल्याने शेतकरी रात्रीच्या चांदण्या प्रकाशात शेतात जाऊन काम करायची.) नादियाला मात्र फारसं कष्टाचं काम करणं कधीही आवडायचं नाही. गावात शाळा झाली तेव्हा तिनं शाळेची वाट धरली. तिच्यापेक्षा काहीच वर्षांनी लहान असणार तिची भाची कॅथरीन आणि ती एकाच वर्गात शिकू लागली. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शाळेसाठी बाहेरच्या शाळेत जावं लागणार होतं. तेव्हा प्रवासासाठी पैसे नसल्याने शाळा सोडणाऱ्यांपैकीच कॅथरीन आणि नादिया होती. गावातच होत असलेल्या माध्यमिक शाळेचं बांधकाम लवकर पूर्ण व्हावं म्हणून ती तवुसी मेलेक (यजिदी धर्मतील देवदूत)जवळ प्रार्थना करत असायची. मोठ्ठं होऊन लग्न करून आपलं मोठ्ठं कुटुंब असावं. आणि स्वतःचं एखादं पार्लर, अशी नादिया व कॅथरिनची सर्वसामान्य स्वप्न होती.

Image result for nadia murad the last girl book

हेज्नी, नादियाचा मोठा भाऊ. हळवा आणि तेवढाच कर्तव्यतत्पर! शेजारीच राहणाऱ्या जिलनवर त्याचं प्रेम बसतं. हेज्नीच्या घरची गरिबी असल्याने तिच्या आईवडिलांचा मात्र या लग्नाला नकार असतो. त्यामुळे पळून जाऊन जर्मनीत गाठावी, तिथे खूप पैसा मिळवावा आणि जिलनशी लग्न करावे या विचाराने तो घर सोडतो. परंतु, सीमेवर गेल्यावर तो पकडला जाऊन त्याला तुरुंगवास होतो. त्यानंतर परतलेला हेज्नी जिलनशी पळून जाऊन प्रेमविवाह करतो. (यजिदी धर्मात असे मानले जाते की, घरच्यांची परवानगी नसल्याने तुम्ही पळून जाऊन प्रेमविवाह केल्यास तुम्ही इतर कुणाहीपेक्षा एकमेकांचा जास्त आदर राखता असा याचा अर्थ होतो.) याच काळात इसिस(इस्लामिक स्टेट) हळूहळू इराकमध्ये पाय रोवू लागले होते. मोसूल ताब्यात घेतल्यानंतर आणखी काही ठिकाणं ताब्यात घ्यायची प्रक्रिया त्यांनी सुरू केली होती. इसिसपासून सर्वाधिक धोका हा कोचोतील यजिदींना आहे, हे सर्वांनाच ठाऊक होते. याचसाठी पेशमर्गा(केडीपी) यांचा पहारा ठेवला होता. ‘आम्ही तुम्हाला काहीही होऊ देणार नाही’, असा विश्‍वास पेशमर्गा (केडीपी) यांनी कोचोतल्या यजिदींना दिला होता.

३ ऑगस्ट २०१४ रोजी उन्हाळा असल्याने २० वर्षांची नादिया व तिचे कुटुंब छतावर झोपले होते. तेव्हा दूरवरून मोठ्या ट्रकांच्या प्रकाशाचे झोत गावाच्या दिशेने येताना त्यांनी पाहिले. काही दिवसापूर्वीच इसिसने जवळच्या काही गावांचा ताबा घेतल्याचे त्यांना समजल्याने प्रत्येक जण प्रार्थना करत आपापल्या जागी चिंतेत दिसत होता.

त्या रात्री इसिसने कोचोमध्ये पहिलं पाऊल ठेवलं होतं. आणि इसिस येण्याची चिन्ह दिसताच पेशमर्गाने पहिल्यांदा काढता पाय घेतला होता. यजिदी उघड्यावर पडले होते. इसिसच्या पहारेकऱ्यांनी संपूर्ण गावाला वेढा घातला होता. ते येताच वेशीवरचे काही लोक सिंजर पर्वतावर पळून गेले होते. त्यातील काहीजण इसिसच्या दहशतवाद्यांना सापडले, त्यांना जागीच ठार करण्यात आलं. सिंजर पर्वतावर पळून जाणाऱ्यांनी आपल्याजवळ घरातलं शक्य तेवढं सामान नेलं होतं. पण पायी जाताना ते पुढं नेणं शक्य नसल्यानं त्यांनी ते मध्येच टाकून दिलं. सिंजरपर्वतावरचं जीवन तर अधिकच खडतर असणार होतं. तिथं जाईपर्यंत अनेकजण उष्माघातानं जाण्याची शक्यता होती. तरीही इसिसच्या तावडीत सापडण्याऐवजी पळून जाण्याचा पर्याय अनेकांनी निवडला होता. यापैकीच एक होता हेज्नी! सिंजर सिटीचा ताबा घेण्यापूर्वी हेज्नी थोडक्यात सुटून पर्वतावर गेला होता. त्यानंतर काही मिनिटातच मागे ट्रकमध्ये भरून आलेल्या इसिसच्या दहशतवाद्यांनी हेज्नीच्या मागून चाललेल्या सर्वांना ठार केले. हेज्नी म्हणतोही, ‘केवळ चमत्कार म्हणूनच मी वाचलो.’

३ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०१४ पर्यंत कोचोमध्ये प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या घरातच बंदी बनवण्यात आलं. त्यांच्याकडे असणारे शस्त्रास्त्र मात्र पहिल्याच दिवशी काढून घेण्यात आली. एकेकट्याने राहणारी जवळची कुटुंब आता नादियाच्या घरी गर्दी करायला लागली होती. भीतीच्या सावटाखाली प्रत्येकजण आपल्या घरातली मौल्यवान चीजवस्तू आणि खाण्याचे सामान घेऊ आले होते. हळूहळू घरातले पाणी आणि धान्य संपू लागले होते. घरातल्या लहान मुलांना परिस्थितीची कल्पना नसल्याने ते भुकेमुळे व्याकूळ होत होते. नादियाचे कुटुंब बाहेरच्या जगाशी विशेषतः हेज्नीशी फोनवर संपर्क साधून अधूनमधून बाहेरच्या परिस्थितीचा अंदाज घेतला जात होता. घरात मोठा असलेला इलियास इसिस काय संदेश देत आहेत, यावर लक्ष ठेवून असायचा. हेज्नी फक्त एकटाच सुटल्याने तो स्वतःला अपराधी समजून घेत होता. इसिसच्या हाती लागू नयेत म्हणून नादियाच्या आईने घरातले सर्व फोटोचे अल्बम जाळून टाकले होते. १२ ऑगस्ट हा दिवस उजाडला तो इसिसच्या खलितासहच! उन्हाळा असल्याने इसिसच्या दहशतवाद्यांनी गावात थोडा बर्फ वाटला. ‘त्यांना आपल्याला मारायचं नसेल’, बर्फ वाटल्याने गावकऱ्यांना खात्री वाटत होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी सर्वांना गावातल्या शाळेत जमायला सांगितले होते. दहा दिवसांच्या घरातल्या बंदिवासानंतर पहिल्यांदाच कोचोतल्या रस्त्यांवर गर्दी दिसत होती. लहान-मोठे सर्वचजण शाळेच्या दिशेने निघाले होते. एका वृद्ध जोडप्याला पाय पुढे खेचत नसल्याने ते बसून राहिले होते, तेव्हा एका दहशतवाद्याने त्यांना शिव्या देऊन, बंदुकीचा धाक दाखवत पुढे चालायला लावले. नादिया सांगते, ‘हे दृश्‍य फार वेदनादायक होते.’ त्यासाठी ती त्या बंदूकधाऱ्याकडे पाहून थुंकली.

शाळेत गेल्यानंतर त्यांनी बायका व मुलांना वरच्या मजल्यावर जायला सांगितले. पुरुषांना खालच्याच मजल्यावर थांबायला सांगितले. त्यांच्यापैकी कोण धर्मांतर करण्यास तयार आहेत, अशी विचारणा करण्यात आली. धर्मांतर केल्यानंतरही परिणाम तोच होणार होता, पण त्यांना कुणी पुढे येतोय का हे पाहायचे होते. पण कुणीही पुढे आले नाही. त्यानंतर या सर्वांना ट्रकमध्ये भरण्यात आले. हे सर्व दृश्‍य महिला वरच्या मजल्याच्या खिडकीतून पाहत होत्या. मात्र आवाज केल्यास ही खिडकीही बंद करण्यात येईल, या भीतीने त्या मूक रडत होत्या.

ट्रक दूरवर निघून गेल्यानंतर गोळ्यांचे आवाज आले. ‘त्यांनी आपल्या पुरुषांना मारलं गं’, गर्दीतून कुणीतरी म्हणालं. त्यानंतर बायकांच्या खोलीत एका लहान मुलाला सोडण्यात आलं. (ज्यांच्या काखेत अद्याप केस आले नाहीत, अशा मुलांना ठार केले नव्हते. त्यापैकीच हा एक होता. पुढे यांना इसिसची शिकवण देऊन दहशतवादी बनवले जाते.) त्याने सर्व हकिकत बायकांना सांगितली. पुरुषांच्या मृतांच्या ढिगाऱ्यात नादियाचा सावत्रभाऊ सईद व तिथल्या शाळेचे शिक्षक अली यांना गोळ्या लागल्या होत्या, परंतु ते मेले नव्हते. दहशतवादी दूर जाईपर्यंत त्यांनी मेल्याचं नाटक केलं. नंतर हळूच उठून त्यांनी गोळ्या लागलेल्या अवस्थेतच जवळची झोपडी गाठली. त्यानंतर रात्र होताच, सिंजर पर्वत जवळ केला.

दुसऱ्या दिवशी त्यांनी तरूण मुलींना वेगळे केले. त्यांना गाड्यांमध्ये भरून मोसूलच्या दिशेने नेण्यात आले. (उर्वरित ज्येष्ठ स्त्रियांना नंतर मारण्यात आले). तिथे त्यांना धर्मांतर करून सबाया म्हणून ओळख दिली गेली. प्रत्येकजण येऊन त्या तरुण मुलींपैकी कुणा ना कुणाला निवडत होता. नादिया, तिची भाची कॅथरीन व रोजियानलाही एकाने निवडले. तो माणूस जाडजूड आणि उंच होता. त्याची भीती वाटत असल्याने नादियाने जवळच असलेल्या सडपातळ माणसाचे पाय धरत ‘मला तुमच्यासोबत घेऊन चला’, अशी विनवणी केली. तो होता हज्जी सलमान! त्याचा शब्द कुणीच मोडत नसल्याने नादियाला त्याने निवडताच दुसऱ्याने तिच्यावरचा हक्क सोडला. त्यानंतर सुरू झाला तो बलात्काराचा क्रम! स्वभावाने अक्राळविक्राळ या णसाकडून सुटण्यासाठी ती प्रयत्न करते. मात्र ती पकडली गेल्याने शिक्षा म्हणून चाबकाचे फटके व सहाजणांना तिच्यावर बलात्कार करायला सांगितले जाते. नंतर एकाकडून दुसऱ्याला विकणे जाणे, बलात्कार, मारहाण, उपासमार आणि पुन्हा विकले जाणे हा क्रम चालूच राहतो. तीन महिन्यानंतर ती ज्या माणसाला विकली जाते, तिथून तिला सिरीयाला नेण्याचा कट रचलेला असतो. तिथे पाठवायचे म्हणून तो नादियासाठी नवीन कपडे आणायला बाहेर पडतो. त्याचवेळी नादिया पळ काढते. रात्र झाल्यावर मदतीसाठी एका घराचे दार वाजवते. ते सुन्नी कुटुंब तिच्या मदतीसाठी तयार होते. जिवाची बाजी लावून त्या घरातला मुलगा, नादियासाठी खोटी कागदपत्र तयार करतो. चेहरा पूर्ण झाकलेली नादिया त्याची पत्नी असल्याचे भासवते. तपासणी नाक्यावर जिथे दहशतवादी कागदपत्र तपासतात, तिथे हे दोघे पोचताच नादिया स्वतःचा बेपत्ता म्हणून लावलेला फोटो पाहते आणि तिचा थरकाप उडतो. अर्थात या सर्वांचे सूत्र इसिसच्या तावडीतून सहीसलामत सुटलेला हेज्नी हाताळत असतो.

 

 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

My statement on winning the 2018 Nobel Peace Prize This morning the Nobel Committee informed me that I was selected as a co-recipient of the 2018 Nobel Peace Prize. I am incredibly honored and humbled by their support and I share this award with Yazidis, Iraqis, Kurds, other persecuted minorities and all of the countless victims of sexual violence around the world. As a survivor, I am grateful for this opportunity to draw international attention to the plight of the Yazidi people who have suffered unimaginable crimes since the genocide by Daesh, which began in 2014. Many Yazidis will look upon this prize and think of family members that were lost, are still unaccounted for, and of the 1,300 women and children, which remain in captivity. Like many minority groups, the Yazidis, have carried the weight of historical persecution. Women, in particular, have suffered greatly as they have been, and continue to be the victims of sexual violence. For myself, I think of my mother, who was murdered by DAESH, the children with whom I grew up, and what we must do to honor them. Persecution of minorities must end. We must work together with determination – to prove that genocidal campaigns will not only fail but lead to accountability for the perpetrators and justice for the survivors. We must remain committed to rebuilding communities ravaged by genocide. Survivors deserve a safe and secure pathway home or safe passage elsewhere. We must support efforts to focus on humanity and overcome political and cultural divisions. We must not only imagine a better future for women, children, and persecuted minorities, but we must also work consistently to make it happen - prioritizing humanity, not war. Congratulations to my co-recipient, Dr. Mukwege, a man I admire greatly who has dedicated his life to helping women of sexual violence. Thank you to the Nobel Committee for this honor. I will organize a press conference this Sunday in Washington DC. The time and place will be announced tomorrow on this page. @nobelprize_org #saveyazidi #14august2007 #3august2014 #15august2014 #yazidigenocide #kocho #un #humanity #humanrights #nadiamurad #nadiamuradbaseetaha #nadiamuradtwitter

A post shared by Nadia Murad (@nadia_murad_taha) on

नादियाला सुखरूप बाहेर पाडण्यात हेज्नीला यश येतं. त्यानंतर तो अदकी व दिमल या दोन बहिणींचीही सुटका करतो. त्याच्या पत्नीची - जिलनची सुटका करण्यासाठी मात्र दोन वर्ष लागतात. मुलीसारखी प्रिय असणारी त्याची भाची - कॅथरीन, अलमास व लमियाला सोडवण्याची हेज्नी योजना आखतो. एका ठरावीक ठिकाणी त्यांना टॅक्सीचालक सोडणार असतो. त्यानंतर त्यांना पायी चालून काही अंतर पार करायचे असते. पण याच दरम्यान भूसुरुंगावर पाय पडल्याने कॅथरीन व अलमासचा मृत्यू होतो तर लमिया या स्फोटात होरपळून निघते.

क्रौय करणाऱ्या या दहशतवाद्यांचा चेहरा नादिया सर्व जगासमोर आणते. पुढे नादिया यजिदींच्या हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती होते. याचसाठी तिला २०१८ चा शांतता नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. पुढे कोचो इसिसमुक्त झाल्यानंतर नादियाने कोचोला भेट दिली. त्यावेळी घरचा बराचसा भाग जळालेला होता. आता नादिया जर्मनीत असते. कोचो पुन्हा उभं रहावं यासाठीही ती प्रयत्न करत आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nadia Murad (@nadia_murad_taha) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suvarna Yenpure Kamthe with about the book The Last Girl by Nadiya Murad