तुमच्या बाळाची काळजी घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

जर तुम्ही तुमच्या बाळासाठी त्वचेची काळजी घेणारी उत्पादने खरेदी करणार असाल तर, पुढील गोष्टी नक्की बघूनच ते निवडा. ते तुमच्या बाळासाठी उपयुक्त ठरतील.

बाळाची त्वचा चांगली असेल तर बाळाचे आरोग्य चांगले असल्याचे दर्शवते. प्रत्येक आई तिच्या बाळाची त्वचा कोमल करण्यासाठी शुद्ध आणि बाळाच्या त्वचेसाठी सौम्य उत्पादनांवर विश्वास ठेवते. सध्या बाजारात भरमसाठ संख्येने उपलब्ध असलेल्या उत्पादनांतून तुमच्या बाळासाठी योग्य उत्पादन निवडणे ही तुमच्यावरची सर्वात मोठी जबाबदारी आहे. बाळाच्या नाजूक त्वचेच्या संपूर्ण सुरक्षेची हमी घेईल, अशा उत्पादनाची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण बाळाची त्वचा ही प्रौढ व्यक्तीच्या त्वचेच्या तुलनेत तीन पटीने अधिक पातळ असते. त्यामुळे बाळाच्या तत्वचेवर सौम्य उत्पादनांचा वापर करणे आवश्यक असते. जर तुम्ही तुमच्या बाळासाठी त्वचेची काळजी घेणारी उत्पादने खरेदी करणार असाल तर, पुढील गोष्टी नक्की बघूनच ते निवडा. ते तुमच्या बाळासाठी उपयुक्त ठरतील.

वापरलेले घटक जाणून घ्या 
आपल्या बाळासाठी त्वचेची काळजी घेणारी उत्पादने घेण्यापूर्वी उत्पादनाच्या 'लेबल'वर दिलेल्या उत्पादनातील अंतर्गत घटकांची (ingredients)  माहिती करून घ्या. आपण निवडलेली उत्पादने आपल्या बाळाच्या त्वचेची १०० टक्के सौम्य काळजी घेणाऱ्या आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या अंतर्गत घटकांनी समृद्ध असणे आवश्यक आहे. सध्याच्या काळातील महिला लहान मुलांसाठीच्या उत्पादनातील अंतर्गत घटकांबद्दल फारच जागरूक असतात आणि आपल्या शंकांचे निरसन करून घेतात. Johnson's Baby ची उत्पादने पॅराबिन फ्री, तसेच फाथलेट्स, फॉर्मल्डिहाइड, एस्बेस्टोस आणि सल्फेट्स फ्री आहेत.

Image may contain: 1 person

उत्पादने सुरक्षा आणि गुणवत्ता सुनिश्चित करतात 
'जॉन्सन बेबी'च्या बाळासंबंधित उत्पादनांमध्ये बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आणि सुरक्षित घटक वापरले आहेत. त्यांची सर्व उत्पादने 5 स्तरीय कठोर अशा सुरक्षा प्रक्रियेतून पार पाडतात. जी त्यांच्या उत्पादनांची सुरक्षा आणि गुणवत्ता सुनिश्चित करतात. बर्‍याचदा तर स्थानिक नियामक संस्थांकडून उत्पादनांवर विचारलेल्या गोष्टीपेक्षा अधिक माहिती दिली असते.

Image may contain: 1 person

सुगंध बाळाला शांततादायी असणे आवश्यक आहे
बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपल्या वास घेण्याच्या शक्तीचा ते सर्वाधिक वापर करतात.  सुगंध हा बाळांच्या संवेदनाक्षम विकासास मदत करतो. आयएफआरएच्या मानकानुसार, 'जॉन्सन बेबी'च्या उत्पादनांमध्ये सुवास देखील सौम्य ठेवण्यात आला आहे. ज्यमुळे बाळाला त्रास होत नाही. सौम्य सुगंधामुळे बाळाचा आनंद दुणावतो आणि भरपूर विश्रांती मिळते. सौम्य आणि हलके सुगंध बाळाच्या मानसिक विकासासाठी  महत्वपूर्ण ठरतात. पण, एक गोष्ट ध्यानात ठेवा, सुगंध बाळांना त्रासदायक असू नये. लहान मुलांसाठीच्या उत्पादनांचा सुगंध प्रमाणित असणे आवश्यक आहे आणि त्यात असे गुण असावेत, ज्यामुळे बाळाला त्रास होऊ नये.

उत्पादनाची सौम्यता वैद्यकीयदृष्ट्या (क्लिनिकली प्रूव्ह) प्रमाणित असावी 
बाळाची त्वचा ही प्रौढ व्यक्तीच्या त्वचेच्या तुलनेत खूपच नाजूक असते. बाळाच्या त्वचेची 'पीएच' पातळी त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागाप्रमाणे बदलत असते. त्यामुळे, केवळ वैद्यकीयदृष्ट्या  प्रमाणित असलेल्या उत्पादनांचाच वापर करावा. लहान मुलांसाठीच्या बहुतेक उत्पादनांची केवळ वैद्यकीय चाचणी घेण्यात येते. त्यातून ही उत्पादने चाचण्यांत यशस्वी झाली आहेत हे सिद्ध होत नाही तसेच त्यांची योग्यताही सिद्ध होत नाही. दुसरीकडे, वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित उत्पादने, असंख्य चाचण्या १०० टक्के यशस्वी झाल्यानंतरच आपल्यापर्यंत पोचतात. 'जॉन्सन बेबी केअर' उत्पादने ही वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित तसेच आपल्या बाळाच्या त्वचेसाठी सौम्य आणि सुरक्षित आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: take care of your baby with Johnson s Baby product