आयटी कंपन्यांचे कोट्यधीश कर्मचारी...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 जून 2019

भारताची अग्रगण्य आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) तब्बल 100 कर्मचारी कोट्यधीश आहेत. याचाच अर्थ टीसीएसमध्ये ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वार्षिक वेतन 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांची संख्या 100 पेक्षा जास्त आहे.

करिअर : भारताची अग्रगण्य आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) तब्बल 100 कर्मचारी कोट्यधीश आहेत. याचाच अर्थ टीसीएसमध्ये ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वार्षिक वेतन 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांची संख्या 100 पेक्षा जास्त आहे. साधारण 25 वर्षांपूर्वी या कर्मचाऱ्यांनी टीसीएसमध्ये आपल्या करियरची सुरूवात केली होती. एका इंग्रजी वृत्तपत्रात यासंबंधीची माहिती आली आहे. त्याउलट टीसीएसची मुख्य प्रतिस्पर्धी असणाऱ्या इन्फोसिसमध्ये 60 पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वार्षिक वेतन 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 

इन्फोसिसमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यांमध्ये कंपनीच्या शेअरचाही मोठा हिस्सा असतो. टीसीएसने मात्र प्रत्यक्ष भत्त्यांच्याच रुपात कर्मचाऱ्यांना वेतन देऊ केले आहे. 2016 आणि 2017 दरम्यान टीसीएसमध्ये 91 कोट्यधीश कर्मचारी होते. तर 2019चे आर्थिक वर्ष संपता संपता ही संख्या 103 वर पोचली आहे. यात अर्थातच टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथ आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर एन जी सुब्रमण्यम यांचा समावेश नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TCS has 100 people earning over RS 1 Cr salary