

Best Marathi Books for Summer Reading
esakal
विज्ञानकथांचे जनक म्हणवले जाणारे ब्रिटिश लेखक एच. जी. वेल्स यांची ‘द टाइम मशीन’ ही ‘टाइम ट्रॅव्हलिंग’ची संकल्पना मांडणारी पहिली कादंबरी. भविष्यकाळातून प्रवास करून वर्तमानात आलेल्या शास्त्रज्ञाला काय दिसलं, हे त्यांनी या कादंबरीत मांडलं आहे. संकेत लाड यांनी ह्या कादंबरीचा अनुवाद केला आहे. रोमांचक कथानक, कल्पनाशक्ती आणि तत्त्वचिंतन यांचा संगम असलेली ही कादंबरी विज्ञानकथेच्या इतिहासातला एक मैलाचा दगड मानली जाते. काळ, प्रगती आणि मानवी समाजाच्या भवितव्याबद्दल विचार करायला लावणारी ही कादंबरी वाचणं म्हणजे अविस्मरणीय सफर अनुभवण्यासारखे आहे.
वैशिष्ट्य : अनेक जागतिक संदर्भांचा शास्त्रीय व मानवी परिप्रेक्ष्यातून केलेला विचार.
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
पृष्ठे : ११०, n मूल्य : २०० रु.