सिक्‍स पॅक अॅब्ज हवेत? 

अभय अरविंद
गुरुवार, 20 एप्रिल 2017

काय करत असतील?

मूठभर लोक आपला फिटनेस टिकवून ठेवतात. इतरांची परिस्थिती 'जैसे थे'च असते. अशा परिस्थितीत फिट राहणारी मंडळी काय करत असतील, याचा विचार गरजेचा ठरतो. त्यासंदर्भातील महत्त्वाच्या बाबींवर टाकलेला दृष्टिक्षेप... 

आपल्या आवडत्या हिरोसारखी पिळदार शरीरयष्टी लाभावी, असे अनेकांना वाटत असते. त्यासाठी प्रयत्नही केले जातात; परंतु अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. असे का होतेय, अशा प्रश्‍नांचा विचार करताना सिनेकलाकारांच्या फिटनेसचे रहस्य समजून घेणे गरजेचे ठरते. त्यासंदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी... 

पिळदार शरीरयष्टी पाहणाऱ्याला नेहमीच आकर्षित करते. हल्ली तर अनेक चित्रपटांमधून अभिनेते आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करताना पाहायला मिळतात. आपलीही शरीरयष्टी त्यांच्यासारखी असावी, असे अनेकांना वाटते. त्या दृष्टीने काही जण तयारीलाही लागतात; परंतु त्याचे मनासारखे परिणाम दिसून येत नाहीत. असे का होते, याचा विचार करायला हवा. खरे तर काही चुकीच्या गोष्टींचा, समजांचा हा परिणाम असतो.

बऱ्याचदा वाढलेले वजन काबूत ठेवण्यासाठी, फॅशन म्हणून किंवा मित्र जातोय म्हणून जिमला जाणारे अनेक जण असतात; परंतु जिममध्ये गेल्यावर स्नायू बळकट होत नाहीत आणि वजनही कमी होत नाही, असे आढळते. यामागे बरीच कारणे आहेत; परंतु याच कारणांमुळे मूठभर लोक आपला फिटनेस टिकवून ठेवतात. इतरांची परिस्थिती 'जैसे थे'च असते. अशा परिस्थितीत फिट राहणारी मंडळी काय करत असतील, याचा विचार गरजेचा ठरतो. त्यासंदर्भातील महत्त्वाच्या बाबींवर टाकलेला दृष्टिक्षेप... 

  • सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे फिट राहणारी मंडळी कधीही व्यायाम टाळत नाहीत. जिमच्या वेळेत दुसरे काहीही करत नाहीत. सगळी कामे जिमच्या वेळेनंतर किंवा त्याआधी उरकून घेतात. आपल्या प्रत्येकाकडे 24 तास आहेत. फिट राहण्यासाठी टाइम मॅनेजमेंट करायला हवे. कशाला प्राधान्य द्यायचे, हे ठरवायला हवं. 
  • फिट राहणारी मंडळी जिममध्ये जाऊन गप्पा मारत नाहीत. जिममध्ये गेल्यावर उगाच टाइमपास करू नका. कोण काय करत आहे, याकडे लक्ष देऊ नका. गप्पा मारण्यात आपली ऊर्जा वाया घालवू नका. व्यायामावरच लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरते. 
  • व्यायामासाठी सकाळी लवकर उठावे. सकाळी लवकर उठण्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे तुम्हाला जिममध्ये लवकर जाता येईल. या वेळी फार गर्दी नसते. दुसरा फायदा म्हणजे व्यायाम झाल्यावर इतर कामे करायला तुम्ही मोकळे व्हाल आणि तुमचे आरोग्यही उत्तम राहील. 
  • चित्रपट क्षेत्रात काम करणारी कलाकार मंडळी व्यायामासंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घेतात. कधी आणि कोणता व्यायाम करायचा इथपासून काय खायचे याचा तक्‍ता तयार करून घेतात. त्या तक्‍त्यानुसार खाण्या-पिण्याच्या वेळा पाळतात. मुख्यत्वे हेल्दी फूड खातात. ही सारी काळजी घेतल्यामुळे ही मंडळी कायम उत्साही राहतात. त्यांच्या उत्साही राहण्याचे हे रहस्य आपणही समजून घ्यायला हवे. 
  • मुख्यत्वे व्यायाम ही तात्पुरती गोष्ट नाही, हे लक्षात घ्या. व्यायाम ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे चार दिवस व्यायाम करायचा आणि नंतर आराम करायचा असे फिट माणसे करत नाहीत. त्यांच्या व्यायामात कायम सातत्य असते. ही मंडळी जिम चुकवत नाहीत. काही कारणांनी जिममध्ये जाता आले नाही तरी ते पुन्हा ताजेतवाने होतात आणि जिमिंग सुरू करतात. त्यामुळे फिट राहायचे असेल, तर व्यायामातील सातत्य गरजेचे आहे. 
Web Title: tips for six pack abs