अशी बोलते माझी कविता (उद्धव भयवाळ)

उद्धव भयवाळ, ८८८८९२५४८८, औरंगाबाद
रविवार, 11 डिसेंबर 2016

वास्तव

सूर्यालाही ग्रहण लागते
रामालाही हो वनवास
तुमचे-माझे जगणे हे तर
अर्धे सत्य नि अर्धा भास

‘असे करू अन्‌ तसे करू’चा
पोकळ डौल नि खोटी आस
जरी चेहरा वरून हसरा
आत परंतू चित्त उदास

‘नको काळजी, घोर नि चिंता’
म्हणणे सोपे हे असते
अन्न राहु द्या...वेळप्रसंगी-
-घशात पाणीही बसते!

स्वप्नकळ्यांची फुले होउनी
सुगंध देतिल...खात्री काय?
गालिच्यावरी चालत असता
फाटक्‍यात कधि जाई पाय!

वास्तव

सूर्यालाही ग्रहण लागते
रामालाही हो वनवास
तुमचे-माझे जगणे हे तर
अर्धे सत्य नि अर्धा भास

‘असे करू अन्‌ तसे करू’चा
पोकळ डौल नि खोटी आस
जरी चेहरा वरून हसरा
आत परंतू चित्त उदास

‘नको काळजी, घोर नि चिंता’
म्हणणे सोपे हे असते
अन्न राहु द्या...वेळप्रसंगी-
-घशात पाणीही बसते!

स्वप्नकळ्यांची फुले होउनी
सुगंध देतिल...खात्री काय?
गालिच्यावरी चालत असता
फाटक्‍यात कधि जाई पाय!

Web Title: uddhav bhaywal's poem