ड्रायव्हिंग येतंय अन् नोकरी हवीये? 'बीआरओ' भरती सुरू झाली आहे! 

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जून 2019

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये (बीआरओ) विविध जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती फक्त पुरुषांसाठीच असेल. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै आहे. 

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये (बीआरओ) विविध जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती फक्त पुरुषांसाठीच असेल. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै आहे. 

बीआरओच्या आताच्या भरतीमध्ये एकूण 778 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी आधी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्यांना वैद्यकीय चाचणी द्यावी लागणार आहे. त्यानंतर निवड झालेल्यांना ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

या जागांसाठी सुरू आहे भरती! 
ड्रायव्हर : 388 जागा 
इलेक्‍ट्रिशियन : 101 
मेकॅनिक : 92 
मल्टि स्कील वर्कर : 197 

यासाठी कमीत कमी वय 18 वर्षे, तर जास्तीत जास्त 27 वर्षे इतके आहे. 

शैक्षणिक पात्रता : 
ड्रायव्हर : दहावी पास, वाहन चालविण्याचा परवाना 
इलेक्‍ट्रिशियन : दहावी पास 
मेकॅनिक : दहावी पास, मेकॅनिक प्रमाणपत्र 
मल्टि स्कील वर्कर : दहावी पास 

अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी इथे क्‍लिक करा -
Border Roads Organisation 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vacancies in BRO only for men