Vidhan Sabha 2019 : अशी असतील बीड जिल्ह्यातील 06 मतदारसंघाची राजकीय गणितं !

टीम ई-सकाळ
Monday, 14 October 2019

बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप - शिवसेना महायुती व राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत असली तरी वंचित व एमआयएच्या उमेदवारांनी रंगत आणली आहे.

बीड : बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप - शिवसेना महायुती व राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत असली तरी वंचित व एमआयएच्या उमेदवारांनी रंगत आणली आहे. गेवराईत शिवसेनेची बंडखोरी भाजप उमेदवाराची डोकेदुखी ठरत आहे. तर, बीडमध्ये प्रकाश आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांच्या सभांना भेटलेला प्रतिसाद बीड, माजलगाव व माजलगावच्या राष्ट्रवादी तर गेवराईच्या भाजप उमेदवारांची चिंता वाढविणारा आहे. सहा विधानसभा मतदार संघातून आता ११५ उमेदवार निवडणुक रिंगणात असतील. सर्वाधिक ३४ उमेदवार बीड मतदार संघात तर सर्वात कमी नऊ उमेदवार आष्टीच्या मैदानात आहेत.

जाणून घ्या औरंगाबाद जिल्ह्यातील 09 मतदारसंघाची राजकीय गणितं !

जाणून घ्या पुणे शहरतील 08 विधानसभा मतदारसंघाची राजकीय गणितं !

परळी विधानसभा मतदारसंघ
दिवंगत गोपीनाथराव मुंडेंनी पाच वेळा प्रतिनिधित्व केलेल्या या मतदार संघातून त्यांच्या कन्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तिसऱ्यांदा नशिब आजमावित आहेत. मैदानात त्यांच्यासह १६ उमेदवार असले तरी त्यांची लढत राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासोबत आहेत. सध्या दोघांत निकराची झुंज सुरु आहे. आरोप-प्रत्यारोप, फोडाफोडी असे राजकारण सुरु आहे.

पंकजा मुंडे (भाजप)
Image result for pankaja munde
 

धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
Image result for dhananjay munde

गेवराई विधानसभा मतदारसंघ
गेवराई मतदार संघात १९ उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख लढत राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित, भाजपचे लक्ष्मण पवार व शिवसेनेचे बंडखोर बदामराव पंडित यांच्यात आहे. मात्र, वंचितने येथे मोठा घटक असलेल्या धनगर समाजातील विष्णु देवकते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेची बंडखोरी आणि वंचितची उमेदवारी भाजपसाठी डोकेदुखी असली तरी पारडे मात्र कोणाचे जड आहे हे सांगणे कठीण आहे.

Image result for laxman pawar georai

माजलगाव विधानसभा मतदारसंघ
माजलगाव विधानसभा मतदार संघात २५ उमेदवार रिंगणात असले तरी भाजपचे रमेशराव आडसकर व राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांच्यात सरळ लढत होईल. एमआयएचे अमर शेख यांना मिळणारा प्रतिसाद आणि अपक्ष व बसपा उमेदवारांमुळे सोळंके यांना तोटा होणार आहे. भाजपने विद्यमान आमदार आर. टी. देशमुख यांना प्रकृतीच्या कारणाने विश्रांती देत रमेश आडसकर यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

रमेश आडसकर (भाजप)

Image result for ramesh adaskar

प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी काँग्रेस)
Image result for Prakash Solanke

बीड विधानसभा मतदारसंघ
बीड मतदार संघातून ३४ उमेदवार रिंगणात असले तरी शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर व राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांच्यात सरळ लढत होत आहे. परंतु, एमआएमचे शेख शफिक यांच्यासाठी असदोद्दीन ओवेसी व व वंचितचे अशोक हिंगे यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहता कोणाचे गणित बिघडते हे कळण्यापलिकडे आहे. मागच्या वेळी मोदी लाटेल राष्ट्रवादीकडून एकटेच विजयी झालेले जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत जाऊन मंत्री झाले.
Image result for jaydatta kshirsagar and sandeep kshirsagar

केज विधानसभा मतदारसंघ
केज १२ उमेदवार रिंगणात असले तरी येथून भाजपच्या नमिता मुंदडा व राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे यांच्यात सरळ लढत होत आहे. वंचितकडून पत्रकार वैभव स्वामी रिंगणात आहेत. राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केलेल्या मुंदडांनी भाजपमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळविल्याने राष्ट्रवादीला वंचितकडून उमेदवारी मागणाऱ्या साठे यांना उमेदवारी द्यावी लागली.

नमिता मुंदडा (भाजप)
Image result for namita mundada

पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी काँग्रेस)
Image result for Prithviraj sathe

आष्टी विधानसभा मतदारसंघ 
आष्टी मतदार संघात नऊ उमेदवार रिंगणात असले तरी भाजपचे भिमराव धोंडे व राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांच्यात सरळ लढत होत आहे. या दोघांत लढत असली तरी विजयाची गुरुकिल्ली मात्र भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या हातातच आहे असे मानले जाते.

Image result for Balasaheb ajabe ashti


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Beed District six constituencies analysis