अशी बोलते माझी कविता (विजय माळी)

विजय माळी, vmali२९८@gmail.com ९२०९२५३९७८
रविवार, 9 एप्रिल 2017

धोरण

घामास भाव माझ्या कवडीदरात आहे
सडतो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे

कांद्यास भाव नाही, कापूसही उठेना...
मेल्यास भाव येतो...‘तो’ बुचकळ्यात आहे!

शेतात काय माझ्या शेळी चरून गेली?
बापास जाण होती, ज्वारी खळ्यात आहे!

ओलीच लाकडे ही माझ्या चुलीत होती...
ओल्यासवे जळे मी...जगणे धुरात आहे!

लागे जिवास चिंता अन्‌ रोगही पिकाला...
तारावयास पाणी कुठल्या तळ्यात आहे?

ढग कोरडाच होता एकेक, आसवांचा...
ही कोरडी सुगी मग माझ्या घरात आहे!

केली कधीच नाही पूर्ती वचन दिल्याची
आश्‍वासनेच देणे पण धोरणात आहे!

धोरण

घामास भाव माझ्या कवडीदरात आहे
सडतो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे

कांद्यास भाव नाही, कापूसही उठेना...
मेल्यास भाव येतो...‘तो’ बुचकळ्यात आहे!

शेतात काय माझ्या शेळी चरून गेली?
बापास जाण होती, ज्वारी खळ्यात आहे!

ओलीच लाकडे ही माझ्या चुलीत होती...
ओल्यासवे जळे मी...जगणे धुरात आहे!

लागे जिवास चिंता अन्‌ रोगही पिकाला...
तारावयास पाणी कुठल्या तळ्यात आहे?

ढग कोरडाच होता एकेक, आसवांचा...
ही कोरडी सुगी मग माझ्या घरात आहे!

केली कधीच नाही पूर्ती वचन दिल्याची
आश्‍वासनेच देणे पण धोरणात आहे!

Web Title: vijay mali's poem in saptarang