पुण्यातल्या 'या' ठिकाणची कॉफी पिऊनच बघा!

नेहा मुळे
Saturday, 3 August 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

वीकएंड हॉटेल 
राज्यभरात मॉन्सून स्थिरावतो आहे. दिवसभर काम करून पावसात भिजून आल्यावर, दिवसभराचा शीण काढायला मदत होते ती कॉफीची! अर्थात, अशा वेळी स्वतःच कॉफी करून घ्यायला कंटाळा येतो. म्हणूनच वेगवेगळ्या कॉफी सर्व्ह करणाऱ्या कॅफेजचे असंख्य पर्याय पुण्यात उपलब्ध आहेत.

Related image

कॅपुचिनो, लाते, मोका असे सर्व प्रकारचे कॅफेज उपलब्ध असले, तरी फिल्टर कॉफीची मजा काही वेगळीच. फिल्टर कॉफी किंवा कॉफीचा एक कप किंवा एक ग्लास शरीराचा शीण काही क्षणांतच गायब करतो आणि ऊर्जावानही बनवतो. अनेक वेळा याच एका कपाचे अनेक कप कधी होतात हे मित्र-मैत्रिणी, भावंडं किंवा सहकाऱ्यांसोबत गप्पांच्या ओघात समजतच नाही. तर या वीकएंडला ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने अशाच गप्पा रंगवू शकता, मस्त फिल्टर कॉफी घेत... खालील काही निवडक ठिकाणी... 

हॉटेल रूपाली (एफ. सी. रोड) - रूपालीच्या कॉफीचे फॅन्स असंख्य आहेत. अनेक पुणेकरांचा हा ठरलेला रोजचा अड्डा. कोणाला इथली नॉर्मल, तर कोणाला मीडिअम स्ट्राँग किंवा स्ट्राँग! प्रत्येकाचा चॉइस ठरलेला असतो. इथे अनेक वर्षे काम करणाऱ्या वेटर्सनाही रोज येणाऱ्या लोकांच्या कॉफीची पसंती पाठ असते. 

हॉटेल वैशाली (एफ. सी. रोड) - रूपालीप्रमाणे वैशालीच्या फिल्टर कॉफीचे ही अनेक चाहते आहेत. गर्दी कितीही असो, हातात कॉफीचा ग्लास घेऊन बाहेर किंवा शेजारच्या गल्लीत उभे राहून पिणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

सांबार (विमाननगर, बाणेर, सातारा रोड) - अस्सल साउथ इंडियन स्टाइल, म्हणजेच स्टीलची वाटी आणि ग्लासामध्ये मिळणाऱ्या या कॉफीचा एकच ग्लास पिऊन कधी भागत नाही. दोन राऊंड तर आरामात होतात. अतिशय किफायती दारात उत्कृष्ट कॉफी मिळणारे हे ठिकाण अनेकांच्या आवडीचे आहे.

Image result for filter coffee

वाडेश्‍वर (अनेक शाखा) - फिल्टर कॉफी सोबत रंजक गप्पा मारायचा हा अजून एक पॉप्युलर कट्टा. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी वाडेश्‍वरच्या कॉफीचा आस्वाद घेता येतो.

प्रिया (कॅम्प) - पुण्यातील जुन्या हॉटेल्सपैकी हे लोकप्रिय हॉटेल. एकदम जलद सेवा देणाऱ्या या हॉटेलची फिल्टर कॉफी तुम्हाला परत-परत इथे यायला भाग पाडेल, हे नक्की.

मद्रास कॉफी हाउस (ढोले-पाटील रोड) - साधारणपणे कुठल्याही साउथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये फिल्टर कॉफी ही चांगलीच मिळते, मात्र, मद्रास कॉफी हाउसची कॉफी आणखीनच खास असते. 

अण्णा इडली (अनेक शाखा) - अस्सल साउथ इंडियन स्टाइल फिल्टर कॉफी मिळणारे अजून एक लोकप्रिय ठिकाण. इथल्या लुसलुशीत इडलीवर ताव मारून झाला की यांची स्टीलच्या वाटी आणि कपामध्ये मिळणाऱ्या कॉफीचा आस्वाद घेत गप्पा मारता येतात.

मालगुडी टिफीन (करिष्मा सोसायटी, कोथरूड) - कमी वेळात कोथरूडकरांच्या पसंतीस उतरलेल्या या ठिकाणी फिल्टर कॉफी खासच असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekend Hotel Neha Mule maitrin supplement sakal pune today