
मकर राशीतली शिखरपरिषद!
‘सत्ता’ हा शब्द आपल्या भारतवर्षात अनेक माध्यमांतून, अनेक प्रकारे आणि अनेक अर्थांनी वापरला जातो. व्यक्ती, कुटुंब आणि समाज या त्रिविध पातळ्यांवर कुणाची तरी सत्ता प्रभाव टाकून असते म्हणा किंवा ती तशी कार्यान्वित होऊन हुकमत गाजवत असते म्हणा!
मकर राशीतली शिखरपरिषद!
‘सत्ता’ हा शब्द आपल्या भारतवर्षात अनेक माध्यमांतून, अनेक प्रकारे आणि अनेक अर्थांनी वापरला जातो. व्यक्ती, कुटुंब आणि समाज या त्रिविध पातळ्यांवर कुणाची तरी सत्ता प्रभाव टाकून असते म्हणा किंवा ती तशी कार्यान्वित होऊन हुकमत गाजवत असते म्हणा!
सत्ता ही एक पकड आहे आणि ही सत्ता आली की या सत्तेच्या ताकदीच्या सीमा किंवा परिसीमा या ओघानंच येतात. माणूस सत्तासंपन्न कसा होतो किंवा कोणत्या पद्धतीद्वारा होतो हा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे! मानसिक, बौद्धिक, शारीरिक आणि सध्या आर्थिक अशा विविध घटकमाध्यमांतून मानवी जीवनात सत्ताकेंद्रं निर्माण होत असताना दिसतात. पशू-पक्ष्यांमध्येही असा सत्तासंघर्ष आढळत असतो. अर्थातच हा संघर्ष ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ म्हणजेच ‘बळी तो कान पिळी’ या निसर्गनियमानुसारच होत असतो.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
माणूस हा परिस्थितीचा बळी होतो, हे आपण फार पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. अर्थात्, ही परिस्थिती कशामुळे निर्माण होते हेही महत्त्वाचं ठरतं. माणूस निसर्गाच्या ताब्यात असतो हे जरी खरं असलं तरी माणूस माणसाचा ताबा घेतो किंवा एखादा माणूस पूर्णपणे दुसऱ्या माणसाच्या ताब्यात जातो हेही सध्या तितकंच खरं आहे!
मित्र हो, सध्या सत्तेशी संबंधित मकर या शनीच्या राशीत गुरू-शनी आहेत. या सप्ताहात बुध आणि प्लूटोसुद्धा या शनीच्या राजधानीत दाखल होतील. पुढं मकरसंक्रान्तीला रवीसुद्धा मकर राशीतल्या शिखरपरिषदेला हजर होईल. एकटा मंगळ आपल्या स्वतःच्या मेष राशीत आपली सत्ता सांभाळत हर्षलला जवळ करत सत्ताप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा या सत्तासंघर्षाच्या महाभारताचे शंखनाद सप्ताहाच्या शेवटी निनादू लागणार आहेत. त्यामुळेच आम्ही म्हणतो की आगामी महिनाभराच्या काळात राशिचक्रातल्या राशीराशीमधल्या सत्तासंघर्षाची ठिणगी उडून विचित्र महाभारतही घडू शकतं. विशेषतः राशिचक्रातल्या मेष, मिथुन, कर्क, तूळ, मकर आणि कुंभ या राशींच्या व्यक्तींनी आगामी महिनाभराच्या काळात कोणतंही सत्तेचं राजकारण न करता आपली कुवत किंवा सीमा ओळखून घरात आणि समाजात विवेकानं वर्तावं हेच बरं! आणि हो, वृषभ राशीच्या व्यक्तींनी कुणाचीही बाजू घेऊ नये किंवा कोणतीही मध्यस्थी टाळावी, तरच तुम्ही बळीचा बकरा होण्यापासून वाचाल!
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
झगमगाटी यश मिळेल
मेष : शुक्राच्या राश्यंतरातून लाभ मिळवणारी रास. ता. सात व आठ जानेवारी या दोन दिवसांत अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना झगमगाटी यश मिळेल. कलाकारांचा भाग्योदय. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना परिचयोत्तर विवाहाचा योग. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायात सोमवारी घबाडयोग.
नोकरीत अनुकूल काळ
वृषभ : या सप्ताहात कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना परिस्थितीजन्य लाभ होतील. नोकरीतलं नवी रचना अनुकूल राहील. ता. चार ते सहा हे दिवस अतिशय प्रवाही राहतील. प्रत्येक कामात यश. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवार वैवाहिक जीवनातली मोठी सुवार्ता कळेल. गृहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यतेचा अनुभव.
नव्या ओळखीतून लाभ
मिथुन : शुक्राचं सप्तमस्थानातील आगमन तत्काळ फलदायी होईल. तरुणांनो, विवाहस्थळांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. मृग नक्षत्राच्या व्यक्ती ता. पाच ते सात हे दिवस अक्षरशः गाजवतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी नव्या ओळखीतून लाभ होईल. प्रेमवीरांचं स्वप्न पूर्ण होईल.
व्यवसायात मोठा लाभ
कर्क : सध्या तुमच्यावर गुरू-शनी यांचं सेन्सॉर लागू आहे. प्रामाणिक आणि श्रद्धावंत भक्तांना हे सेन्सॉर अजिबात त्रास देत नाहीये! पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींवर हे सेन्सॉर मेहेरबान आहे. या मंडळींना सप्ताह भावरम्यच राहील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. सात ते नऊ या कालावधीत व्यावसायात मोठा लाभ. भाग्योदय होईल. आश्र्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवार पुत्रोत्कर्षाचा.
परदेशी व्यापार वाढेल
सिंह : या सप्ताहात तुमच्या राशीला अष्टमीपर्यंत चंद्रकलांचा सुंदर ट्रॅक राहील! मघा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळ-शुक्र यांच्या विशिष्ट स्थितीतून जनसंपर्कातून मोठे लाभ. परदेशी व्यापार वाढेल. विशिष्ट वाद सामोपचारानं मिटवाल. तरुण-तरुणींची प्रेमप्रकरणं मार्गी लागतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार लकी!
हुकमी यश मिळेल
कन्या : या सप्ताहात बुध आणि शुक्र यांची राश्यंतरं अनुकूल राहतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांची मंत्रालयही पूर्णतः अनुकूल. ता. पाच ते सात या दिवशी तुमच्या राशीला हुकमी यश मिळेल. हस्त नक्षत्राच्या तरुणांना शुक्रवारी नोकरीच्या मुलाखतीत यश. उद्याच्या सोमवारी चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींच्या सुहृदांशी गाठी-भेटी होतील.
गुंतवणुकीतून लाभ
तूळ : मंगळ-शुक्राच्या राश्यंतरामुळे या सप्ताहात सुंदर ट्रॅक पकडाल! महत्त्वाच्या कामांचं नियोजन कराच. स्वतंत्र व्यावसायिकचं औदासीन्य दूर होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. सात ते नऊ दिवस अतिशय प्रवाही. लाभ घ्याच. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार धनवर्षावाचा. गुंतवणुकीतून लाभ.
नोकरीतलं सावट जाईल
वृश्र्चिक : ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार दैवी चमत्काराचा. नोकरीतलं सावट जाईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा या दिवशी नोकरीच्या मुलाखतीला यश. कायदेशीर कटकट दूर होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार भाग्याचा.
तरुणवर्ग भरारी घेईल!
धनू : मंगळ-शुक्राची राश्यंतरं नवा अध्याय सुरू करणारी. तरुणवर्ग भरारी घेईल. परदेशगमनाचे मार्ग मोकळे होतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ता.सात व आठ हे दिवस अद्भुत! व्यवसायात मोठी अर्थप्राप्ती. बॅंकेची कामं होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं एखादं कोर्टप्रकरण सुटेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरी.
भान ठेवून वावरा!
मकर : सध्या राशीच्या गुरू-शनींचं राज्य आहे. हे एक प्रकारचं सेन्सॉरच आहे! आगामी काळात तुमच्यावर त्यांचे सीसी कॅमेरे रोखले जातील! उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी भान ठेवून वावरावं. बाकी, ता. पाच व सहा हे दिवस राशीच्या गुरूच्या अखत्यारीतले असतील. महत्त्वाची कामं उरकून घ्या. धनिष्ठा नक्षत्रास व्यक्तींना उद्याचा सोमवार नोकरीत प्रसन्नतेचा! श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ.
विशिष्ट वसुली होईल
कुंभ : पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहाच्या सुरुवातीला व्यवसायातल्या धनवर्षावानं आनंदून जातील. विशिष्ट वसुली होईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहाच्या शेवटी मंगळ-शुक्राच्या विशिष्ट स्थितीतून मोठे लाभ होतील. वैयक्तिक कला-छंद-उपक्रमांमुळे प्रकाशात याल. शनिवारी धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गुप्त चिंता.
नोकरीत सन्मानाचा काळ
मीन : सप्ताहात बुध-शुक्रांची राश्यंतरं विशिष्ट ग्रहपार्श्वभूमीवर होत आहेत. अर्थातच ती तुमच्या राशीला धार्जिणी राहतीलच. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी त्यांचा लाभ घेण्याच्या तयारीतच राहावं. ता. पाच व सहा जानेवारीला सुंदर असं यशस्वी पर्व सुरू होईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना अष्टमीचा दिवस नोकरीत सन्मानाचा.
Edited By - Prashant Patil